विशेषण

नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.

तर ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जात आहे त्यास विशेष्य म्हणतात. उदा. चांगली मुलगी, काळा कुत्रा, पाच टोप्या वगैरे. यांत चांगली, काळा, पाच ही विशेषणे आणि मुलगी, कुत्रा, टोप्या ही विशेष्ये आहेत.

विशेषणांचे प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे आहेत:

  • गुणवाचक विशेषण
  • संख्यावाचक विशेषण
  • सार्वनामिक विशेषण

गुणवाचक विशेषण

नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला “गुणवाचक विशेषण” असे म्हणतात. उदा० हिरवे रान शुभ्र ससा निळे आकाश. यांत हिरवे, शुभ्र आणि निळे ही गुणविशेषणे आहेत.

संख्यावाचक विशेषण

ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. संख्यावाचक विशेषणांचे पाच प्रकार आहेत.

  • गणनावाचक संख्या विशेषण,
  • क्रमवाचक संख्या विशेषण,
  • आवृत्तीवाचक संख्या विशेषण,
  • पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण
  • अनिश्चित संख्या विशेषण

गणना वाचक संख्या विशेषण

ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात. उदा०. दहा मुले, तेरा भाषा, एक तास, पन्नास रुपये यांत दहा, तेरा, एक, आणि पन्नास ही गणनावाचक विशेषणे आहेत. गणनावाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात : १. पूर्णांक वाचक – पाच, सहा, अठरा, बारा. २. अपूर्णांक वाचक – पावशेर, अर्धा, सव्वा, दीड. ३. साकल्य वाचक – पाचही मैत्रिणी, दोन भाऊ.

क्रमवाचक संख्या विशेषण

वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात. उदा. पहिले दुकान, सातवा बंगला, पाचवे वर्ष ह्यातील पहिले, सातवा, पाचवे ही क्रमवाचक संख्या विशेषणे आहेत.

आवृत्तिवाचक संख्या विशेषण

वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते त्यास आवृत्तिवाचक विशेषण असे म्हणतात. उदा. तिप्पट मुले, दुप्पट रस्ता, दुहेरी रंग

पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण

जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्ववाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदा. मुलींनी पाच-पाचचा गट करा, प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा.

अनिश्चित संख्या विशेषण

ज्या विशेषणाद्वारे नामांची निश्चित संख्या किंवा प्रमाण व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. उदा. काही मुले, थोडी जागा, भरपूर पाणी

सार्वनामिक विशेषण

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदा. हे झाड, ती मुलगी, तो पक्षी

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अश्यावेळी नेहमीच मूळ स्वरूपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढीलप्रमाणे बदल होतो. मी – माझा, माझी, तू – तुझा, तो-त्याचा, आम्ही – आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा, हा – असा, असला, इतका, एवढा, अमका, तो – तसा, तसला, तितका, तेवढा, तमका, जो – जसा, जसला, जितका, जेवढा, कोण – कोणता, केवढा.

हे सुद्धा पहा

Tags:

विशेषण गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण हे सुद्धा पहाविशेषण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अक्षय्य तृतीयासईबाई भोसलेन्यायालयीन सक्रियतापन्हाळाग्राहक संरक्षण कायदायवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघविनायक दामोदर सावरकरज्ञानेश्वरीराष्ट्रकूट राजघराणेखो-खोमैदान (हिंदी चित्रपट)लक्ष्मणक्रियाविशेषणकोरफडमहाराष्ट्राची हास्यजत्रासिंहगडभारताची जनगणना २०११विमाराजकारणनाणेज्योतिबा मंदिरआंबासकाळ (वृत्तपत्र)पाठ्यपुस्तकेफ्रेंच राज्यक्रांतीवर्णचीनईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघजागतिक व्यापार संघटनाभारतरत्‍नसातारा लोकसभा मतदारसंघआईगोपाळ कृष्ण गोखलेभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेशब्दयोगी अव्ययपुराणेकोहळागांडूळ खतपसायदानसर्वनामशाळासूर्य वंश (श्रीरामाची वंशावळी‌)नितीन गडकरीभारतातील जातिव्यवस्थामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाखडकवासला विधानसभा मतदारसंघजवरस (सौंदर्यशास्त्र)यवतमाळ जिल्हामाण विधानसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीगोत्रभीम जन्मभूमीयेसूबाई भोसलेवेदक्रिकेटपूर्व दिशाभारताचा ध्वजशिखर शिंगणापूरसिकलसेलडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रमप्रेमानंद गज्वीपोलीस पाटीलश्रेयंका पाटीलगुरू ग्रहप्राजक्ता माळीफलटण विधानसभा मतदारसंघकबड्डीगणपती स्तोत्रेविधानसभासांगली जिल्हा३३ कोटी देवचिमणीभरड धान्यरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघकुळीथश्रीराम सातपुतेफुटबॉल🡆 More