मासिक सदर/२०१९०४०६

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो.

मासिक सदर/२०१९०४०६

शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.

या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते.सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.

काठीपूजन तसेच उत्सवी काठी ही मानवी इतिहासात विविध समुदायात केली गेलेली एक प्राचीनतम पूजा-परंपरा आहे. 'इव्होल्यूशन ऑफ गॉड' या ग्रंथातील ग्रँट ॲलेन यांच्या नोंदीनुसार सायबेरीयातील 'सामोयीड्स' ते दक्षिण आफ्रिकेतील 'दामारा' या जमातींमध्ये काठीपूजेची परंपरा होती. इस्रायलमधील अशेराह पोल या काठी पूजा परंपरा ज्यू धर्माच्या स्थापनेपूर्वीच्या काळात प्रचलित पूजन पद्धती होत्या. युरोपात नॉर्वेजियातील Mære चर्च उत्खननामध्ये काठीपूजेच्या परंपरेचे दाखले मिळालेले दिसतात, युरोपातील मेपोल हा काठी उत्सव ख्रिश्चनपूर्व काळापासून ख्रिश्चन धर्मीय विरोधाचा सामना करीत साजरा करताना दिसतात. पॅसिफिक क्षेत्रात माओरी मिथकातून 'व्हाकापोकोको आतुआ' नावाने शेती-पिकांचा देव रोंगोची पूजा होत आली आहे. कुक बेटांवरील आदिवासी 'आतुआ राकाऊ' नावाने काठीपूजा करतात. चीनच्या युनान प्रांतातील मिआओ आणि अनशूनमधील येलांग संस्कृती, व्हिएतनाम मधीले 'के न्यू', कोरियातील 'जाँगशाँग' आणि 'सोटडे',म्यानमार देशातील 'के होते बो' उत्सव ही जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या ठिकाणी साजऱ्या झालेल्या अथवा होत आलेल्या काठी उत्सवांची अथवा पूजांची उदाहरणे आहेत. अमेरिका खंडात देवक-स्तंभाच्या स्वरूपात प्राचीन काठ्यांचे वा स्तंभांचे जतन केले जाते.

भारतीय उपखंडात नेपाळमध्ये काठी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो, आसाममध्ये काही समुदाय वैशाख महिन्यात बास पूजा साजरी करतात, त्रिपुरा आणि मणिपूर राज्यांत मेरावा युंग्बा या काठी उत्सव परंपरा दिसून येतात; तसेच बलुचिस्तानच्या हिंगलाज देवीस काठी सोबत यात्रेने जाण्याची प्रथा आहे. राजस्थानात गोगाजी मंदिर येथे व मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात गुढीपाढव्याशिवाय जतरकाठी, काठीकवाडी, नंदीध्वज हे काठी-उत्सव साजरे केले जातात. डॉ. बिद्युत लता रे यांच्या मतानुसार ओरिसा राज्याच्या आदिवासींमध्ये खंबेश्वरी देवीची पूजा हा काठी पूजेचा प्रचलित प्रकार असून खंबेश्वरीची पूजा अर्वाचीन काळात हिंदू धर्मात उत्क्रांत झालेल्या मूर्तिपूजांपेक्षा प्राचीन असावी.

पुढे वाचा... गुढी पाडवा

Tags:

चैत्र शुद्ध प्रतिपदारामवसंत ऋतूशालिवाहन संवत्सरसाडेतीन मुहूर्तहिंदू दिनदर्शिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कर्कवृत्तवस्तू व सेवा कर (भारत)सविता आंबेडकरपरभणी जिल्हाअजित पवारलिंग गुणोत्तरऔंढा नागनाथ मंदिररामसायाळशेतकरीगोंधळकार्ल मार्क्सभौगोलिक माहिती प्रणालीकरमाळा विधानसभा मतदारसंघप्रार्थनास्थळमावळ लोकसभा मतदारसंघअश्वगंधामहाराष्ट्रातील लोककलाभारताचे राष्ट्रपतीअतिसारआकाशवाणीहोमरुल चळवळरामायणाचा काळमेरी आँत्वानेतउदयभान राठोडयशवंत आंबेडकरबँकमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीगालफुगीलोकमान्य टिळकइसबगोलविमाथोरले बाजीराव पेशवेरावेर लोकसभा मतदारसंघभारताचा स्वातंत्र्यलढाअर्जुन वृक्षखो-खोबहिणाबाई चौधरीस्वरदत्तात्रेयकल्याण लोकसभा मतदारसंघजवकाळाराम मंदिर सत्याग्रहबचत गटदक्षिण दिशाबाळ ठाकरेतापी नदीउद्योजकगंगा नदीनेपाळकृत्रिम बुद्धिमत्ताविशेषणशाश्वत विकासउत्तर दिशारतन टाटाराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भाषाशिर्डी विधानसभा मतदारसंघज्योतिबाकोहळाम्हणीहिरडायोनीआदिवासीमराठी भाषा दिनभारताची संविधान सभाहृदयहनुमान जयंतीपुणे लोकसभा मतदारसंघसेवालाल महाराजयवतमाळ जिल्हास्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)कादंबरीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९ज्योतिर्लिंगपर्यावरणशास्त्रनक्षत्रमहाराष्ट्र केसरी🡆 More