मासिक सदर/१० मार्च २०१८

चंदा कोचर (१७ नोव्हेंबर, इ.स.

मासिक सदर/१० मार्च २०१८

१९६१">इ.स. १९६१:जोधपूर, राजस्थान, भारत - हयात) या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.

कोचर यांचा जन्म जोधपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट अँजेला सोफिया स्कूल, जयपूर येथे झाले. नंतर त्या मुंबईला आल्या व मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयातून कला शाखेतून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी आय.सी.डब्ल्यू.ए.आय.चा कोर्स पूर्ण केला. कॉस्ट अकाउंटिंग विषयातील प्राविण्यासाठी त्यांना जे.एन. बोस सुवर्ण पदक मिळाले.

जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेतून एम बी ए पूर्ण केले. व्यवस्थापन शास्त्रात त्यांना वोकहार्ड सुवर्णपदक मिळाले.

१९८४ साली व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी म्हणून भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (तेव्हाची आय सी आय सी आय आताची आयसीआयसीआय बँक) येथे रुजू झालेल्या कोचर २००१ मध्ये याच बँकेच्या संचालक म्हणून निवडल्या गेल्या. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळातील सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्या कागद, कपडा आणि सिमेंट उद्योगातील प्रकल्प मूल्यमापनाचे काम करीत.

१९९० च्या दशकात कोचर यांनी आयसीआयसीआय बँक स्थापन करण्यात मोठा भाग घेतला. १९९३ मध्ये ही बँक स्थापन करणाऱ्या अंतरक गटामध्ये कोचर यांची निवड झाली. १९९४ मध्ये सहायक महाव्यवस्थापक आणि १९९६ मध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांची पदोन्नती झाली. १९९६ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या उर्जा , दूरसंचार आणि परिवहन अशा पायाभूत उद्योगांची वाढ करणाऱ्या समूहाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. १९९८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या २०० प्रमुख ग्राहकांशी संबंध ठेवणाऱ्या मुख्य ग्राहक समूहाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. २००० साली कोचर यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय बँकेने किरकोळ बँकिंग व्यवसायाचे वितरण आणि परिमाण वाढवण्याच्या दृष्टीने नवप्रवर्तन, तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचे पुनर्गठन सुरु केले. एप्रिल २००१ मध्ये कोचर कार्यकारी संचालक बनल्या.२००६ मध्ये त्यांची उप व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक झाली. २००६-०७ मध्ये त्यांनी बँकेचे आंतरराष्ट्रीय तसेच निगमित व्यवसाय हाताळले.

कोचर यांच्या नेतृत्वाखाली, २०१७ साली आयसीआयसीआय बँकेने सलग चौथ्या वर्षी भारतातील सर्वोत्तम किरकोळ बँक हा द एशियन बॅंकर या मासिकाचा किताब पटकावला.

२००९ मध्ये कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली.

आयसीआयसीआय समूहाबरोबरच कोचर जपान बिझनेस फोरम च्या तसेच युएस इंडिया सीईओफोरम व्यापार मंडळाच्या सदस्य आहेत. भारतीय बँक संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. आय.आय.आय.टी. वडोदरा संचालक मंडळाच्या त्या प्रमुख आहेत .इन्स्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स तसेच नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट या संस्थांच्या संचालक मंडळावर आहेत.

पुढे वाचा... चंदा कोचर

Tags:

आयसीआयसीआय बँकइ.स. १९६१जोधपूरभारतराजस्थान१७ नोव्हेंबर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नागपूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीदिशासोयाबीनडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारजळगाव जिल्हाबाबासाहेब आंबेडकरराज्य निवडणूक आयोगस्वादुपिंडमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थावेरूळ लेणीताम्हणशिखर शिंगणापूरसावित्रीबाई फुलेगुढीपाडवारक्तराम सातपुतेओशोसाईबाबाबहिणाबाई पाठक (संत)धनगरफुफ्फुसनाटकाचे घटकमहानुभाव पंथतूळ राससहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारतीय संविधानाचे कलम ३७०चार धाममहाराष्ट्र विधान परिषदकुणबीहवामान बदलमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९पंजाबराव देशमुखवस्तू व सेवा कर (भारत)समुपदेशनऑस्ट्रेलियालातूर लोकसभा मतदारसंघचंद्रयान ३मुळाक्षरसंयुक्त महाराष्ट्र चळवळसूर्यवृद्धावस्थाखंडोबाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)मतदानबंगालची फाळणी (१९०५)कासवकाळूबाईमानवी विकास निर्देशांकपोहणेखडकवासला विधानसभा मतदारसंघभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)अमेरिकेची संयुक्त संस्थानेआवळामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगअर्थसंकल्पसम्राट अशोक जयंतीकुष्ठरोगयशवंत आंबेडकरचंद्रगुप्त मौर्यबौद्ध धर्मराजाराम भोसलेगोविंद विनायक करंदीकरमानसशास्त्रमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीआयतसाम्राज्यवादआकाशवाणीबाळूमामाच्या नावानं चांगभलंलोकसभा सदस्यअसहकार आंदोलनघाटगेभारतीय आडनावेवल्लभभाई पटेलगोवरकवठजन गण मन🡆 More