मासिक सदर/मार्च ८ २०१९

मांगते चुंगनेजंग मेरी कोम १ मार्च, १९८३:कांगाथेई, मणिपूर, भारत - ) ही एक भारतीय बॉक्सिंगपटू आहे.

मासिक सदर/मार्च ८ २०१९

मेरी कोमने महिला जागतिक अव्यावसायिक बॉक्सिंग अजिंक्यपद सहावेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर आहे. या स्पर्धेमधील फ्लायवेट प्रकारामध्ये कोमने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले.

२०१३ साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले. २०१४ साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्या चित्रपटात आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.

मणिपूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एका गरीब कुटुंबात मेरी कोमचा जन्म झाला. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात कां उतरू नये, असे वाटू लागले. घरचा विरोध असतानाही इ.स. २००० मध्ये १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचॆ बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पर्धेचे जेतेपद मिळवले; वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिने विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग तिचा जागतिक स्पर्धेतील विजेतेपदांचा धडाका सुरू झाला. अर्थात, अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुधा त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते. २००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेर्मध्ये, २००५मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने अजिंक्यपद पटकावले. तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिस्पर्ध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८ मध्ये तिने चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले होते.

पुढे वाचा... ऑपरेशन चॅस्टाइझ

Tags:

इ.स. १९८३बॉक्सिंगभारतमणिपूर१ मार्च२०१२ उन्हाळी ऑलिंपिक२०१४ आशियाई खेळ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाथ संप्रदायसमीक्षामांगसुशीलकुमार शिंदेप्रेमनंदुरबार लोकसभा मतदारसंघ३३ कोटी देवमहाराष्ट्र पोलीसजालियनवाला बाग हत्याकांडकुलदैवतशिवाजी महाराजकेंद्रीय लोकसेवा आयोगसोयराबाई भोसलेबिबट्यासोलापूरमुहूर्ततरसमुरूड-जंजिराजिल्हाधिकारीमतदानहनुमान जयंतीमेष रासदुसरे महायुद्धसंत जनाबाईअर्जुन पुरस्कारजागतिक तापमानवाढअण्णा भाऊ साठेबीड लोकसभा मतदारसंघसुनील नारायणहिंगोली विधानसभा मतदारसंघहंसनिवडणूकदशावताररक्तगटघोडापु.ल. देशपांडेजय श्री रामअजिंठा-वेरुळची लेणीविष्णुकाळभैरवशक्तिपीठेवर्तुळमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागगोरा कुंभारकुत्राबृहन्मुंबई महानगरपालिकाहोळीअर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिककोयना धरणदत्तात्रेययवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमुखपृष्ठलोकगीतपारू (मालिका)एकविरामहाराष्ट्र विधानसभा अध्यक्षकासारइतिहासव्यवस्थापनसर्वनामसूर्यनमस्कारचंद्रसाडेतीन शुभ मुहूर्तप्रार्थना समाजमांजरमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीवल्लभभाई पटेललिंगभावसुभाषचंद्र बोसभारतीय संविधानाची उद्देशिकाफणसढेकूणपांडुरंग सदाशिव सानेहवामानशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते🡆 More