मासिक सदर/जानेवारी २०१९

ऑपरेशन चॅस्टाइझ हे दुसऱ्या महायुद्धदरम्यान १६-१७ मे १९४३ च्या रात्रीत ब्रिटनच्या रॉयल एरफोर्सने जर्मनीच्या धरणांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या कारवाईचे सांकेतिक नाव होते.

मासिक सदर/जानेवारी २०१९

या मोहिमेचे वैशिष्ट्य हे की खास या मोहिमेसाठी प्रथमच उसळणाऱ्या बाँब (bouncing bomb) चा वापर क‍रण्यात आला. या विशिष्ट रचनेच्या बाँबमुळेच ही कारवाई यशस्वी ठरली. लक्ष्यावर आदळल्यावर लगेच स्फोट न होता, उसळ्या घेत काही अंतर कापून फुटणारा हा बाँब बार्न्स वॉलिस यांनी शोधला व विकसित केला होता. या कारवाईअंतर्गत मॉहने आणि एडरसी धरणे उध्वस्त झाली तर सोर्पे धरणास जुजबी नुकसान झाले.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या रूर नदीच्या खोऱ्यातील औद्योगिक भागातून जर्मनीसाठी युद्धविषयक उत्पादन जोमाने होत होते. यात तेथील धरणे व जलविद्युत निर्मितीची केंद्रांचा मोठा वाटा होता. ही धरणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, कालव्यांसाठी पाणी पुरवठा या दृष्टीनेही महत्त्वाची होती. यामुळे ब्रिटनने यांच्यावर हल्ला करणे आवश्यक ठरवलेले होते. या धरणांना शत्रूपासून धोका आहे हे जर्मनीही जाणून होता त्यामुळे धरणांच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेण्यात आलेली होती. पारंपरिक पद्धतीने बाँबहल्ला करून धरणे उडवणे शक्य होते, पण त्यासाठी अचूक मारा आणि तोही सातत्याने योग्य त्या जागी करत राहणे गरजेचे होते. ब्रिटिश वायुसेनेकडे असे अचूक अस्त्र उपबलब्ध नव्हते. असे अस्त्र असल्यासही जर्मनीच्या बचावाची तयारी पाहता उघडउघड हल्ला शक्य नव्हता.

धरणाला अधिकाधिक नुकसान करण्यासाठी बाँबचा स्फोट पाण्याच्या पृष्ठभागाखाली व धरणाच्या भिंतीजवळ होणे आवश्यक होते. यासाठी पाण्याखाली मारा करणारे पाणतीर किंवा टॉर्पेडो वापरता आले असते. याची शक्यता लक्षात घेऊन जर्मनीने आधीच धरणांत पाणतीर विरोधी जाळ्या बसवल्या होत्या. दुसरा मार्ग होता की साधारण १० टन वजनाचा बाँब ४०,००० फूट उंचीवरून सोडून अपेक्षित ठिकाणी मारा करणे. पण त्यावेळी उपलब्ध विमानांची इतका वजनदार बॉम्ब घेऊन इतक्या जास्त उंचीवरून उडण्याच्या क्षमतेची नव्हती.

१६ मेच्या रात्री ९:२८ वाजता पहिल्या विमानाने उड्डाण केले. दुसऱ्या क्रमांकाच्या फळीतील ही विमाने उत्तरेकडून दूरच्या वाटेने लक्ष्याकडे जाणार होती. मॅककार्थीच्या विमानातून तेलगळती झाल्याने त्याने राखीव विमानातून ३४ मिनिटे उशीरा उड्डाण केले. पहिल्या क्रमांकाच्या फळीने ९:३९ पासून तीन विमानांच्या गटांत दहा-दहा मिनिटांच्या अंतराने उड्डाण केले. राखीव फळीने १७ मेच्या पहाटे ००:०९ वाजता उड्डाण केले.

गिब्सन आणि मॅककार्थीने आपले हल्ला जर्मनीच्या विमानविरोधी तोफांची ठाणी चुकवत दोन वेगवेगळ्या मार्गांनी नेले. असे असताही शत्रूच्या प्रदेशांत सगळ्यांनी साधारण एकत्रच प्रवेश करणे अपेक्षित होते. गिब्सनची फळी नेदरलँड्समध्ये घुसून शत्रूची ठाणी चुकवित उत्तरेला वळली आणि रुह्र नदीच्या काठाने पुन्हा दक्षिणेकडे वळत मॉहने धरणाकडे गेली. मॅककार्थीची फळी उत्तरेकडून नेदरलँड्समध्ये गेली व वेसेलजवळ गिब्सनला मिळाली. तेथून त्यांनी मॉहने धरण पार करीत सोर्पेकडे कूच केली.


पुढे वाचा... ऑपरेशन चॅस्टाइझ

Tags:

इ.स. १९४३एडरसी धरणजर्मनीदुसरे महायुद्धबार्न्स वॉलिसमॉहने धरणरॉयल एरफोर्ससोर्पे धरण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जीवनसत्त्वसंयुक्त महाराष्ट्र चळवळजवाहरलाल नेहरूतुकडोजी महाराजभाषाअंशकालीन कर्मचारीकांजिण्याचाफाअश्वगंधाआरोग्यकोविड-१९भारत छोडो आंदोलनघुबडमहाराष्ट्र केसरीघनकचरामुरूड-जंजिरामित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)नर्मदा परिक्रमाअन्नप्राशनथॉमस अल्वा एडिसनसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेॐ नमः शिवायपहिले महायुद्धसोनेइसबगोलआपत्ती व्यवस्थापन चक्रगुलाबतापी नदीमाणिक सीताराम गोडघाटेभिवंडी लोकसभा मतदारसंघरायगड (किल्ला)महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीपांडुरंग सदाशिव सानेझाडशेळी पालनसदा सर्वदा योग तुझा घडावापुणे करारकृष्णा नदीउच्च रक्तदाबपाणपोईरोहित शर्माखडकआंबेडकर कुटुंबतुकाराम बीजनिरीक्षणहत्तीअमेरिकेची संयुक्त संस्थानेनवनीत राणाकृत्रिम बुद्धिमत्तामहाराष्ट्राचे राज्यपालतलाठीलोकशाहीहातकणंगले लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थमातीपक्षीभारूडभारतीय संविधानाची उद्देशिकामावळ लोकसभा मतदारसंघआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावापाणीपुरवठामहाराष्ट्राचा इतिहासमधुमेहऔंढा नागनाथ मंदिरधनंजय चंद्रचूडभारतीय राष्ट्रीय काँग्रेसवाचनस्त्रीवादी साहित्यअस्वलबच्चू कडूकाळभैरवशिव जयंतीमराठा साम्राज्यसोलापूर जिल्हासह्याद्रीमहाराणा प्रतापजातिव्यवस्थेचे निर्मूलनभारतीय निवडणूक आयोगगाय🡆 More