लिस्बन: पोर्तुगाल देशाची राजधानी

लिस्बन (पोर्तुगीज: Lisboã; लिस्बोआ) ही पोर्तुगाल देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

लिस्बन शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या व ताहो नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली लिस्बन शहराची लोकसंख्या सुमारे ५.४७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३० लाख होती. युरोपियन संघामधील ११व्या क्रमांकाचे मोठे महानगर असलेल्या व ९५८ चौरस किमी भागावर पसरलेल्या लिस्बन क्षेत्रात पोर्तुगालमधील २७ टक्के लोकवस्ती एकवटली आहे.

लिस्बन
Lisboã
पोर्तुगाल देशाची राजधानी

लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था

लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था
ध्वज
लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था
चिन्ह
लिस्बन is located in पोर्तुगाल
लिस्बन
लिस्बन
लिस्बनचे पोर्तुगालमधील स्थान

गुणक: 38°42′50″N 09°08′22″W / 38.71389°N 9.13944°W / 38.71389; -9.13944

देश पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
जिल्हा लिस्बन
स्थापना वर्ष इ.स. ७१९
महापौर आंतोनियो कोस्ता
क्षेत्रफळ ८४.८ चौ. किमी (३२.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,४७,६३१
  - घनता ६,४५८ /चौ. किमी (१६,७३० /चौ. मैल)
  - महानगर ३०.३५ लाख
प्रमाणवेळ यूटीसी±००:००
http://www.cm-lisboa.pt/

लिस्बन हे पोर्तुगालचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९४ साली लिस्बन युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती.

इतिहास

प्रागैतिहासिक काळापासून रोमन साम्राज्याचा भाग असलेले लिस्बन इ.स. ७११ साली उत्तर आफ्रिकेमधील मुस्लिम योद्ध्यांच्या अधिपत्याखाली आले. पुढील ४०० वर्षे अरबांच्या शासनाखाली घालवल्यानंतर इ.स. ११०८ साली नॉर्वेजियन क्रुसेडने लिस्बनवर ताबा मिळवला. इ.स. ११४७ साली पहिल्या अल्फोन्सोच्या नेतृत्वाखालील सैन्याने लिस्बनवर कब्जा करून ह्या भूभागावर ख्रिश्चन धर्म पुन्हा आणला. १२५५ साली लिस्बन नव्या पोर्तुगीज प्रदेशाची राजधानी बनली.

१५व्या शतकामध्ये सुरू झालेल्या शोध युगामध्ये पोर्तुगीज शोधक आघाडीवर होते व ह्यांपैकी अनेक शोध मोहिमांची सुरुवात लिस्बनमधूनच झाली. १४९७ साली येथूनच वास्को दा गामाने भारताकडे प्रयाण केले होते. १८व्या शतकाच्या मध्यात लिस्बन युरोपामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते. परंतु १ नोव्हेंबर १७५५ रोजी येथे झालेल्या एका प्रलयंकारी भूकंपामध्ये लिस्बनमधील सुमारे ३०,००० व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या व जवळजवळ पूर्ण शहराची पडझड झाली. भूकंपानंतर पंतप्रधान सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो ह्याच्या मार्गदर्शनाखाली लिस्बन पुन्हा बांधले गेले.

भूगोल

ताहो नदीच्या मुखाजवळ वसलेले लिस्बन हे युरोपातील सर्वात पश्चिमेकडील राजधानीचे शहर आहे. लिस्बन शहराचे क्षेत्रफळ ८४.९४ चौरस किमी (३२.८० चौ. मैल) इतके आहे.

हवामान

लिस्बनमधील हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य असतात. संपूर्ण युरोपामध्ये लिस्बन येथे हिवाळ्यादरम्यान सर्वात उबदार हवामान अनुभवायला मिळते.

लिस्बन साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 22.6
(72.7)
24.8
(76.6)
29.4
(84.9)
32.2
(90)
34.8
(94.6)
41.5
(106.7)
40.6
(105.1)
41.8
(107.2)
37.3
(99.1)
32.6
(90.7)
25.3
(77.5)
23.2
(73.8)
41.8
(107.2)
सरासरी कमाल °से (°फॅ) 14.8
(58.6)
16.2
(61.2)
18.8
(65.8)
19.8
(67.6)
22.1
(71.8)
25.7
(78.3)
27.9
(82.2)
28.3
(82.9)
26.5
(79.7)
22.5
(72.5)
18.2
(64.8)
15.3
(59.5)
21.34
(70.41)
दैनंदिन °से (°फॅ) 11.6
(52.9)
12.7
(54.9)
14.9
(58.8)
15.9
(60.6)
18.0
(64.4)
21.2
(70.2)
23.1
(73.6)
23.5
(74.3)
22.1
(71.8)
18.8
(65.8)
15.0
(59)
12.4
(54.3)
17.43
(63.38)
सरासरी किमान °से (°फॅ) 8.3
(46.9)
9.1
(48.4)
11.0
(51.8)
11.9
(53.4)
13.9
(57)
16.6
(61.9)
18.2
(64.8)
18.6
(65.5)
17.6
(63.7)
15.1
(59.2)
11.8
(53.2)
9.4
(48.9)
13.46
(56.23)
विक्रमी किमान °से (°फॅ) 1.0
(33.8)
1.2
(34.2)
0.2
(32.4)
5.5
(41.9)
6.8
(44.2)
10.4
(50.7)
14.1
(57.4)
14.7
(58.5)
12.1
(53.8)
9.2
(48.6)
4.3
(39.7)
2.1
(35.8)
0.2
(32.4)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 99.9
(3.933)
84.9
(3.343)
53.2
(2.094)
68.1
(2.681)
53.6
(2.11)
15.9
(0.626)
4.2
(0.165)
6.2
(0.244)
32.9
(1.295)
100.8
(3.969)
127.6
(5.024)
126.7
(4.988)
774
(30.472)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 0.1 mm) 15.0 15.0 13.0 12.0 8.0 5.0 2.0 2.0 6.0 11.0 14.0 14.0 117
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 142.6 156.6 207.7 234.0 291.4 303.0 353.4 344.1 261.0 213.9 156.0 142.6 २,८०६.३
स्रोत: , for data of avg. precipitation days & sunshine hours

अर्थव्यवस्था

सध्या लिस्बन पोर्तुगालमधील सर्वात श्रीमंत प्रदेश असून लिस्बन क्षेत्र पोर्तुगालच्या ४७ टक्के आर्थिक उलाढालीसाठी कारणीभूत आहे. येथील बंदर युरोपामधील सर्वात वर्दळीच्या बंदरांपैकी एक आहे. २०१० सालापासून पोर्तुगालमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे लिस्बनची अर्थववस्था खालावली असून अनेक नवे विकास उपक्रम थांबवण्यात आले आहेत.

वाहतूक

लिस्बनमधील शहरी वाहतूक रेल्वे, रस्ते व जलमार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी लिस्बन मेट्रो तसेच पारंपारिक परिवहनासाठी ट्राम सेवा जबाबदार आहे. १९९८ साली खुला करण्यात आलेला येथील वास्को दा गामा पूल युरोपामधील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. लिस्बन पोर्तेला विमानतळ हा पोर्तुगालमधील सर्वात मोठा विमानतळ लिस्बन शहरामध्ये स्थित असून तो युरोपामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जातो. टी.ए.पी. पोर्तुगाल ह्या पोर्तुगालमधील राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे.

खेळ

फुटबॉल हा लिस्बनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. येथील एस्तादियो दा लुझ ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २००४ तसेच २०१४ युएफा चँपियन्स लीग ह्या स्पर्धांचे अंतिम सामने खेळवले गेले होते. एस्तादियो होजे अल्वालादे हे लिस्बनमधील दुसरे प्रमुख फुटबॉल स्टेडियम आहे. पोर्तुगीज प्रिमेइरा लीगा ह्या लीगमध्ये खेळणारे एस.एल. बेनफीका, स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल व सी.एफ. ओस बेलेनेन्सेस हे तीन प्रमुख क्लब लिस्बनमध्ये स्थित आहेत. पोर्तुगाल फुटबॉल संघ आपले सामने लिस्बन महानगरामधूनच खेळतो.

आंतरराष्ट्रीय संबंध

लिस्बन शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

शहर देश तारीख
बिसाउ लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  गिनी-बिसाउ 1983-05-31
झाग्रेब लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  क्रोएशिया 1977-03-05
काराकास लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  व्हेनेझुएला 1992-10-07
बुडापेस्ट लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  हंगेरी 1992-09-28
गिमार्येस लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  पोर्तुगाल 1993-06-29
साओ टोमे लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  साओ टोमे व प्रिन्सिप 1983-05-26
प्राग लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  चेक प्रजासत्ताक 2011-06-13
लुआंडा लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  अँगोला 1988-10-11
वॉटरबरी लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  अमेरिका 1996-07-14
काचेउ लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  गिनी-बिसाउ 1988-11-14
मकाओ लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  मकाओ 1982-05-20
माद्रिद लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  स्पेन 1979-05-31
मलाक्का लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  मलेशिया 1984-01-19
मापुतो लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  मोझांबिक 1982-03-20
मेक्सिको सिटी लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  मेक्सिको 1982-10-12
ब्राझिलिया लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  ब्राझील 1985-06-28
प्राईया लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  केप व्हर्दे 1983-05-26
रबात लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  मोरोक्को 1980-06-10
रियो दि जानेरो लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  ब्राझील 1985-04-03
ला पाझ लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  बोलिव्हिया 1983-08-02
साल्व्हादोर दा बाईया लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  ब्राझील 2007-07-10
साओ पाउलो लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  ब्राझील 2007-07-10

संदर्भ

बाह्य दुवे

लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

लिस्बन: इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था  विकिव्हॉयेज वरील लिस्बन पर्यटन गाईड (इंग्रजी)

Tags:

लिस्बन इतिहासलिस्बन भूगोललिस्बन अर्थव्यवस्थालिस्बन वाहतूकलिस्बन खेळलिस्बन आंतरराष्ट्रीय संबंधलिस्बन संदर्भलिस्बन बाह्य दुवेलिस्बनअटलांटिक महासागरआयबेरियन द्वीपकल्पताहो नदीपोर्तुगालपोर्तुगीज भाषायुरोपियन संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पवनदीप राजनमाढा विधानसभा मतदारसंघपाणीआनंदराज आंबेडकरआणीबाणी (भारत)साईबाबाबाबासाहेब आंबेडकरसह्याद्रीराज्य निवडणूक आयोगशब्दयोगी अव्ययमहाराष्ट्राचा इतिहासधोंडो केशव कर्वेभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तसनातन धर्महवामानगोवरचवदार तळेईमेलसिकलसेलअष्टांगिक मार्गवाघसचिन तेंडुलकरशिवनेरीगीतरामायणमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीहणमंतराव रामदास गायकवाडफकिराचीनबुलढाणा जिल्हादिशाज्योतिर्लिंगप्रभाकर (वृत्तपत्र)शिवबुद्धिमत्ताकांजिण्यारक्तगटढेकूणमिया खलिफाक्रिकेटवडकुपोषणपरभणी लोकसभा मतदारसंघरक्तनरसोबाची वाडीसूर्यनमस्कारविधानसभाहडप्पा संस्कृतीजागतिक व्यापार संघटनासांगली लोकसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईलोकसभेचा अध्यक्षसंभाजी राजांची राजमुद्राछत्रपती संभाजीनगरकळसूबाई शिखरभारताचे पंतप्रधानमोगरासुप्रिया सुळेआरोग्यमराठी भाषा दिनशाश्वत विकासदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघतुळजापूरभारताची संविधान सभाअहमदनगर लोकसभा मतदारसंघभरती व ओहोटीदहशतवादपळसमहादेव गोविंद रानडेसर्पगंधाउन्हाळाभारतातील जागतिक वारसा स्थानेखडकविहीरलिंगायत धर्म🡆 More