रामनवमी

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे.

या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात.

रामनवमी
श्री रामनवमीची मिरवणूक

स्वरूप

दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२:०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो.श्रीरामाच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. श्री रामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमवेतच गाठीपण घालतात. श्री रामांची पूजा करताना त्यानां करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्री रामांना हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहतात. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांत रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो.

श्रीरामनवमीच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे सर्व लहान थोर मंडळी ह्या उत्सवात भाग घेतात.

रामनवमी 
श्रीरामपंचायतन - राजा रवि वर्म्याचे एक कल्पनाचित्र

राम जन्म कथा

हिंदू धर्मग्रंथानुसार, त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्री राम म्हणून अवतार घेतला. श्री रामचंद्रजींचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क राशीत राजा दशरथाच्या घरी झाला. रामायणानुसार, अयोध्येचा राजा दशरथ याला तीन बायका होत्या, परंतु फार काळ राजा दशरथला संततीचे सुख कोणीही देऊ शकले नाही, त्यामुळे राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याची कल्पना दिली होती. यानंतर राजा दशरथाने आपल्या जमाई महर्षी ऋषिश्रृंगासोबत यज्ञ केला. त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खीरची वाटी घेऊन बाहेर आला. यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषीशृंगाने दशरथाच्या तीन पत्नींना खीरची वाटी खायला दिली. खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यांनी तिन्ही राण्या गरोदर राहिल्या. बरोबर ९ महिन्यांनंतर, राजा दशरथाची ज्येष्ठ राणी कौशल्याने राम, भगवान विष्णूचा सातवा अवतार, कैकेयी यांनी भरत आणि सुमित्रा यांना लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. भगवान रामाचा जन्म दुष्ट प्राण्यांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला होता.

देवतेचे महत्व

कबीर साहेब जी आदिरामाची व्याख्या स्पष्ट करतात की आदिराम हा अविनाशी देव आहे जो सर्वांचा निर्माता आणि पालनकर्ता आहे. ज्याच्या एका इशाऱ्यावर पृथ्वी आणि आकाश कार्य करतात, ज्याच्या स्तुतीमध्ये तेहतीस श्रेणी देवी-देवता नतमस्तक होतात. जो पूर्णपणे मोक्ष आणि आत्मस्वरूप आहे.

अगहन पंचमी

भारतभर रामजन्म हा चैत्र शुक्ल नवमीला झाला असे समजले जात असले तरी, ज्या अयोध्येत रामाचा जन्म झाला, त्या अयॊध्येतील वैश्य समाज रामाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पंचमीला झाला असे मानतात. त्या पंचमीला अगहन पंचमी म्हणतात. (मार्गशीर्षाला हिंदीत अगहन म्हणतात!)

याला आधार म्हणजे तुळशीदासाच्या 'राम चरित मानसा'मधील खालील उल्लेख:-
मंगल मूल लगन दिनु आया|
हिम रिपु अगहन मासु सुहावा||
ग्रह तिथि नखतु जोगु वर बारू|
लगन सोधि विधि कीन्ह विचारू||

रामनवमीचे महत्त्व

रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. तेलंगणातील भद्राचलम मंदिर हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. चैत्र नवरात्रीचीही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते. हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान श्री रामजींचा जन्म या दिवशी झाला होता, म्हणून भक्त ही शुभ तिथी राम नवमी म्हणून साजरी करतात आणि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात.

संदर्भ

Tags:

रामनवमी स्वरूपरामनवमी राम जन्म कथारामनवमी देवतेचे महत्वरामनवमी अगहन पंचमीरामनवमी चे महत्त्वरामनवमी संदर्भरामनवमीचैत्र शुद्ध नवमीराम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नगर परिषदगुकेश डीमकबूल फिदा हुसेनज्ञानपीठ पुरस्कारगौतम बुद्धयोगासनश्रीज्वालामुखीभारतीय लष्करकुटुंबमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसमाजशास्त्रमहाभियोगवि.वा. शिरवाडकरमोबाईल फोनअश्वत्थामातलाठीभारतीय तत्त्वज्ञानमहिलांसाठीचे कायदेग्रामपंचायतप्रकाश आंबेडकरबुलढाणा विधानसभा मतदारसंघकबड्डीराज्यसभापृथ्वीबीड जिल्हाजी.ए. कुलकर्णीमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकराजा राममोहन रॉयभारतातील समाजसुधारकमराठासुप्रिया सुळेभारत छोडो आंदोलनकासारवेदउपभोग (अर्थशास्त्र)जैन धर्मशब्दयोगी अव्ययसकाळ (वृत्तपत्र)दहशतवादरवींद्रनाथ टागोरअभंगसात आसराअहमदनगर लोकसभा मतदारसंघभारतीय संस्कृतीयोनीपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीनक्षत्रकुटुंबनियोजनमुखपृष्ठलोणार सरोवरहिरडामहाराष्ट्र लोकसेवा आयोगकेळसातारास्वादुपिंडगाडगे महाराजहनुमान चालीसाभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीत्रिरत्न वंदनाआणीबाणी (भारत)नर्मदा नदीकैलास मंदिरवस्तू व सेवा कर (भारत)राजकीय पक्षनेहरू युवा केंद्र संघटनहिंदू धर्मातील अंतिम विधीसंगीतएकनाथ खडसेपोवाडाकल्याण (शहर)महाबलीपुरम लेणीशेतीबाळशास्त्री जांभेकरस्वच्छ भारत अभियानजगदीश खेबुडकरभारताचा स्वातंत्र्यलढा🡆 More