भूगोल

भूगोलाला इंग्रजीमध्ये Geography (जिओग्राफी) हा शब्द आहे.

या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील शब्द -Geo आणि Graphiya या शब्दापासून झालेली आहे. या दोघांचा अर्थ Earth किंवा पृथ्वी असा होतो. graphein या शब्दाचा अर्थ वर्णन करणे किंवा लिहिणे होतो. यो दोन शब्दांचा विचार केल्यास पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा, पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा आणि तिच्या कार्यांचा अभ्यास करणे हा भूगोलाचा उद्देश आहे. मराठीतला भूगोल हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. हा शब्द भूगोलाचा अभ्यास या अर्थानेही वापरला जातो.

भूगोलशास्रद्य चार पारंपारिक विचारातून भूगोलाच्या अध्ययनावर भर देतात.
1.नैसर्गिक आणि मानवी क्रिया
2. भूवैशिष्ट्यांचा अभ्यास
3. मानवआणि पृथ्वी यांचा सहसंबंध
4. भू-शास्त्र यांचा समावेश होतो. पारंपरिकदृष्ट्या भूगोल आणि भू-वैज्ञानिक यांना स्थळांच्या अभ्यासासंदर्भात एकाच वर्गात ठेवले जाते. जरी भू-वैज्ञानिक हे भू-शास्रामध्ये आणि नकाशातंत्रात पारंगत असले तरी फक्त भौगोलिक नकाशे बनविणे एवढाच त्यांचा उद्देश नसतो; त्यांच्या अध्ययनात पृथ्वी व अवकाश यांच्या मानवाशी येण्याऱ्या संबधांचा अभ्यास करणे इत्यादींचा समावेश असतो. प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीत आर्थिक, वैद्यकीय सुविधा, हवामान, वनस्पती तसेच भूगोलाचे अध्ययन या सर्वांचा एकमेकांवर प्रभाव असतो. एखाद्या ठिकाणाचा फक्त अभ्यास करणे म्हणजे भूगोल नव्हे.आजचा जगामध्ये भूगोल हा समाज आणि पर्यावरण यांना जोडण्याचे काम करत असलेले दिसून येते .

दोन मुख्य उपशाखा

भूगोल हे शास्त्र असून त्याच्या मानवी भूगोल व भौतिक किवा प्राकृतिक भूगोल अशा दोन मुख्य उपशाखा आहेत. उल्लेख दोन्ही उपशाखांमध्ये पर्यावरण आणि जीवावरण यांच्या निर्मितीचा अभ्यास होतो. यातील मानवी भूगोलाच्या उपशाखेचा मानवी दृष्टिकोनातून मानवाचा पर्यावरणावर होणारा प्रभाव व मानवाचे पृथ्वीवरील महत्त्व यांचा अभ्यास करणे हा उद्देश आहे; तर भौतिक भूगोलाच्या उपशाखेत पर्यावरण, वातावरण, जलावरण, वनस्पती, जीवन, मृदा किवा माती, जल आणि भूरचना हे सर्व कशाप्रकारे एकमेकांवर प्रभाव टाकतात यांचा अभ्यास केला जातो. या दोन्ही शाखांचा अभ्यास करतांना पर्यावरणीय भूगोल या तिसऱ्याच शाखेची निर्मिती झाली. या शाखेत या दोन्ही शाखांचा एकमेकांवर पडणाऱ्या प्रभावातून निसर्ग व मानवाचा संबध लक्षात येतो.

भूगोलाचा इतिहास

भूगोलाचे अध्ययन प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये केलेले आढळते. ग्रीकांनी शास्त्र व तत्त्वज्ञान म्हणून भूगोलाचे अध्ययन केले आणि पृथ्वीचा आकार व तिची रचना कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. प्राचीन ग्रीक शास्त्रज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने पृथ्वी गोल आहे असे सांगितले व इरॅथोसिसने पृथ्वीच्या परिघाचे मापन केले. रोमनांनी पृथ्वी हे विश्वाचे केंद्र आहे असे मानून नकाशेसुद्धा तयार केले. विश्वाला ३६० अंशांमध्ये विभागून अक्षांक्ष व रेखांशाची कल्पना मांडली.

मध्ययुगाच्या काळात रोमन संस्कृती लयाला गेली आणि भूगोलाची ज्ञानसंपदा युरोपकडून मुस्लिम जगाकडे आली. इद्रिसी (Idrisi), इब्न बतूत, (Ibn Batutta), इब्न खलादुन (Ibn Khaldun) यासारख्या वैज्ञानिकांनी त्यांच्या हाजींना ही माहिती भाषांतरित करून पुरविली. आणि नंतरच्या कालावधीत रोमन व ग्रीकांची सर्व साहित्यसंपदा अनेक शास्त्रज्ञांनी अनुवादित केली व बगदाद येथे विश्वविद्यालयाची स्थापना केली.भूगोल बहुतेकदा दोन शाखांच्या रूपात परिभाषित केले जाते: मानवी भूगोल आणि भौतिक भूगोल. मानवाचा भूगोल लोक आणि त्यांचे समुदाय, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाशी आणि परस्परांशी त्यांचे स्थान आणि स्थान यांच्याशी आणि त्यातील संबंधांचा अभ्यास करून अभ्यासाशी संबंधित आहे. भौतिक भौगोलिक वातावरण, हायड्रोस्फीअर, बायोस्फीअर आणि भूगोल यासारख्या नैसर्गिक वातावरणामधील प्रक्रिया आणि नमुन्यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे.

सोळाव्या व सतराव्या शतकांमध्ये क्रिस्तोफर कोलंबस, मार्को पोलो व जेम्स कूक यांनी पुष्कळ नवीन प्रदेशांचा शोध लावला. त्यांच्या अनुभवांवरून काही नकाशे नव्याने तयार करण्यात आले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकांमध्ये भूगोलाला वेगळ्या अध्ययनशास्त्राचा दर्जा प्राप्त होऊन युरोपमधील प्रमुख विश्वविद्यालयांमध्ये भूगोलाचे अध्ययन होऊ लागले. यात प्रामुख्याने पॅरिस व बर्लिन विश्वविद्यालयांचा समावेश होता. अठराव्या शतकामध्ये भूगोलाच्या अभ्यासाकरिता अनेक भौगोलिक संस्था स्थापन करण्यात आल्या. त्यात १८२१ साली स्थापन झालेली Société de Géographie, १८३० साली स्थापन झालेली रॉयल जियोग्राफिकल सोसायटी, १८४५ साली स्थापन झालेली रशियन जियोग्राफिकल सोसायटी, १८८८ साली स्थापन झालेली नॅशनल जियोग्राफिक सोसायटी यांचा प्रामुख्याने समावेश होता. भूगोलाचा तत्त्वज्ञानाच्या शाखेपेक्षा विज्ञानाच्या शाखेशी संबध जोडण्यासाठी रिम्युल कान्ट, अलेक्झांडर वोन हुम्बोल्ट, कार्ल रिटर आणि पॉल विडाल डीला ब्लैंचे यांनी योगदान दिले.

गेल्या दोन शतकांमध्ये संगणकाच्या नवशोधामुळे भूगोलाच्या अध्ययनात geomatics आणि इतर संबंधित पद्धतींचा वापर प्रभावीपणे होत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये विसाव्या शतकापासून पर्यावरणीय सिद्धान्त, प्रादेशिक भूगोल, परिणामीय क्रांती (आंकड्याच्या साहाय्याने परिणाम-निश्चिती), समालोचनात्मक भूगोल अशा विविध मार्गांनी भूगोलाचे अध्ययन होत आहे. भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, जनसंख्याअध्ययनशास्त्र यांचा भूगोलाशी घनिष्ट असा आंतरसंबध आहे. आणि यामुळे भू-शास्त्राचे सर्वांगाने अध्ययन होण्यास मदत होत आहे.

संबधित क्षेत्र

भौगोलिक तंत्रज्ञान

निवडक भू-वैज्ञानिकांची माहिती

बाह्य दुवे


Tags:

भूगोल दोन मुख्य उपशाखाभूगोल ाचा इतिहासभूगोल संबधित क्षेत्रभूगोल भौगोलिक तंत्रज्ञानभूगोल निवडक भू-वैज्ञानिकांची माहितीभूगोल बाह्य दुवेभूगोलउत्क्रांतीग्रीकपृथ्वी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राकेश बापटशिवाजी महाराजांची राजमुद्रावर्णमालाविहीरविधानसभा आणि विधान परिषदनीती आयोगवंचित बहुजन आघाडीनृत्यशिवकुपोषणगजानन दिगंबर माडगूळकरअमरावती लोकसभा मतदारसंघश्रीकांत शिंदेअयोध्याव्हॉट्सॲपविठ्ठलओटआईमराठी व्याकरणए.पी.जे. अब्दुल कलाममहाराष्ट्राचा इतिहासभारताचे सर्वोच्च न्यायालयमराठी लिपीतील वर्णमालामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीकांजिण्याभारतीय पंचवार्षिक योजनामराठीतील बोलीभाषाऋतुराज गायकवाडसह्याद्रीनगर परिषदनरसोबाची वाडीमहाराष्ट्र विधान परिषदअहमदनगर लोकसभा मतदारसंघआलेप्रकाश आंबेडकरज्योतिबारॉयल चॅलेंजर्स बंगलोरबीड लोकसभा मतदारसंघरावणखासदारभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीहिंगोली लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीरामआंतरराष्ट्रीय नाणेनिधीजवसावता माळीकोरेगावची लढाईस्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)नवरी मिळे हिटलरलाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढारामदास स्वामींनी रचलेल्या आरत्यासर्वनामबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारजायकवाडी धरणमौर्य साम्राज्यजवाहरलाल नेहरूसंगीतरामचरितमानसघोणसमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीरामायणाचा काळनंदुरबार लोकसभा मतदारसंघजागतिक तापमानवाढभारताच्या राष्ट्रपतींची यादीघनकचरामहाराष्ट्र शासनपृथ्वी२०२४ मधील भारतातील निवडणुकातापमानअमरावतीरक्तराशीबिबट्याराणी लक्ष्मीबाईकावीळमहाराष्ट्रातील घाट रस्ते🡆 More