भीती

धोक्याची स्पष्ट जाणीव असणे व त्या बद्दलची मानवी मनात निर्माण होणारी शारीरिक हानीची ,धोक्याची,वा इजा होणारी संकल्पना व अनुभवास येणारी भावना म्हणजे भीती होय.

एखाद्या वस्तू व प्रसंगा पासून व्यक्तीला अत्यल्प धोका असताना किवा अजिबात धोका नसताना त्या वस्तूबद्दल व प्रसंगा बद्दल सातत्याने व प्रमाणा बाहेर वाटणारी अनामिक संकल्पना म्हणजेच भीती होय


भीती ही एक मानसिकता किवा भावना आहे जी वेगवेगळ्या कारणामुळे निर्माण होते. बराच वेळा प्रसंगानुरूप भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक असते. उदाहरणार्थ अपघात पाहिल्यावर किंवा भीतीदायक चित्रपट पाहिल्यावर, स्वतः सोबत अपघात झाल्यावर इत्यादी. परंतु जर ही भीती बराच वेळा काही कारण नसताना उत्पन्न झाली अथवा आधीच्या भीतीदायक प्रसंगाचे मनावरील दडपण गेले नाही किंवा त्याचा निचरा झाला नाही तर मात्रा आणि ह्याचं हीच भीती मानसिक त्रासाचे , मानसिक रोगाचे कारण देखील बनू शकते.

मानवेतर प्राण्यातील भिती

मानवा प्रमाणे प्राण्यात ही भीती असते धोकादायक परिस्थितीत समायोजक प्रतिक्रिया मानून भीतीचा उपयोग होत असतो परंतु असा उपयोग होण्या करिता भीतीची प्रतिक्रिया झटकन कार्यान्वीत व्हावी लागते. दैनंदिन जीवनात आपणाला आधी खरोखरच भीतीचा लवलेश नसतानाही क्षणार्धात एखादा धोका उत्पन्न झाल्या क्षणी आपण तीव्र भीती अनुभवू लागतो भीतीचे हे समायोजन मूल्य लक्षात घेतले तर भीती ही केवळ मानवातच अनुभवला येणारी भावना नसून, मानवेतर प्राण्यातही भिती अनुभवास येते.

भीतीच्या अनियंत्रित भावनेचे परिणाम

'भीतीच्या अनियंत्रित भावनेमुळे

व्यक्तीचे स्वत;चे विचार ,वर्तन आणि दैनंदिन कामे तसेच नोकरी, सामाजिक व्यवहार, कुटुंब, वैवाहिक नातेसंबंध, इत्यादी सर्व गोष्टींवर विपरीत परिणाम होताना दिसून येतो. त्या मुळे मानवी मनावर काही लक्षणे दिसून येतात. सतत मनात भीतीची भावना निर्माण होणे, एका प्रकारचे दडपण जाणवणे, वारंवार भीती निर्माण होणाऱ्या प्रसंगांना दुर्लक्षित करणे, समाजापासून दुरावणे तसेच ठराविक परिस्थितीमध्ये घाम फुटणे, हदयात धडकी भरणे, रक्तदाब वाढणे, इ वरील लक्षणे दिसू लागतात.काही ठराविक व्यक्तिमत्त्वाच्या लोकांमध्ये याचे प्रमाण इतरांपेक्षा अधिक दिसून येते.

घटक

भीती या घटका मध्ये तीन प्रकारचे घटक समावेशित होतात

१ व्यक्ती निष्ठ घटक किंवा बोधात्मक

उद्द- मला भीती वाटते आहे असे जाणवणे

२ शारीरिक घटक

उद्द-श्वास वाढणे व छातीचे ठोके जलद पणे पडणे वा वाढणे

३ वर्तनात्मक घटक

उद्द- सुटके साठी तीव्र धडपड करणे

वरील तिन्ही घटक प्रत्येक व्यक्तीत दिसतीलच असे नाही काही व्यक्तीत दोन तर काही व्यक्तीत सर्व दिसतील ,व्यक्तीपरत्वे भिन भिन घटक अनुभवास येतात ..

संदर्भ

साचा:चिकित्सा मानसशास्त्रज्ञ

Tags:

भीती मानवेतर प्राण्यातील भितीभीती च्या अनियंत्रित भावनेचे परिणामभीती घटकभीती संदर्भभीती

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वायुप्रदूषणजॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरकोलंबसाचे गर्वगीतजायकवाडी धरणमराठी वाक्प्रचारडोळाभारताच्या अधिकृत भाषांची यादीपियानोकेंद्रशासित प्रदेशपुणेकेवडासुरेश भटसेवालाल महाराजसंभोगहिंदू धर्मनर्मदा नदीतणावपुणे जिल्हारायगड जिल्हामोटारवाहनअप्पासाहेब धर्माधिकारीमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीगॅलेलियो गॅलिलीचंद्रग्रहणविशाखा (कवितासंग्रह)ऊर्जाधुलिवंदनकांदासमुद्रमंथनपुरस्कारयकृतजी-२०रामन परिणामकावळामदर तेरेसाज्ञानेश्वरीचिमणीनृत्यव.पु. काळेदादासाहेब फाळके पुरस्कारमराठी साहित्यसूरज एंगडेकृषि दिन (महाराष्ट्र)सम्राट अशोकमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गअफझलखानमहाराष्ट्रातील धरणांची यादीअभिजात भाषासंत तुकारामशेतीची अवजारेहिंदू कोड बिलभारताच्या पंतप्रधानांची यादीविष्णुशास्त्री चिपळूणकरशेवगाभारतीय रुपयाची नाणीविधिमंडळबिरसा मुंडाविरामचिन्हेभारतीय संविधान दिनबेलसप्तशृंगी देवीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीखंडोबालाल बहादूर शास्त्रीबहिणाबाई चौधरीजाहिरातनाशिकरक्तगटरामशेज किल्लाभारतीय अंतराळ संशोधन संस्थामहाराष्ट्र भूषण पुरस्कारअर्थसंकल्पपी.टी. उषा🡆 More