फेसबुक

फेसबुक (इंग्लिश: Facebook) हे अमेरिकेतील एक लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे.

सर्वसामान्यतः १३ वर्षांहून मोठ्या वयाच्या कोणालाही फेसबुकवर सदस्य म्हणून नोंदणी करता येते. सदस्यांना आपल्या ओळखीच्या (व फेसबुक सदस्य असलेल्या) इतर व्यक्तींच्या खात्याशी 'मित्र/मैत्रीण' म्हणून जोडणी करता येते. आपल्या मित्रमंडळींना संदेश अथवा फोटो (छायाचित्रे) पाठवणे, सर्व मित्रमंडळींना दिसेल / कळेल अश्या रितीने एखादी घोषणा करणे, ह्या व इतर अनेक सोयी फेसबुकवर उपलब्ध आहेत.

फेसबुक
प्रकार खाजगी कंपनी
उद्योग क्षेत्र इंटरनेट, संगणक सॉफ्टवेअर
स्थापना केंब्रिज, मॅसेच्युसेट्स सन २००४
संस्थापक मार्क झुकरबर्ग
मुख्यालय मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया, अमेरिका89
महत्त्वाच्या व्यक्ती मार्क झुकरबर्ग, सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, डस्टिन मॉस्कोविट्झ, उपसंस्थापक
महसूली उत्पन्न अंदाजे ८०० दशलक्ष अमेरिकन डॉलर (२००९)
मालक मार्क झुकरबर्ग
कर्मचारी ८३४८ (२०१४)
पोटकंपनी इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, ऑक्युलस व्ही आर
संकेतस्थळ www.facebook.com

फेसबुक वर प्रवेश करताच पहिले पान उघडते ते म्हणजे होम पेज (मुखपृष्ठ). ह्या पानावर सदस्याच्या मित्रमंडळींनी प्रकाशित केलेल्या घोषणा व फोटो दिसतात. ह्या घोषणा व फोटोंवर सदस्य आपली मते लिहू शकतो. सदस्याने जर आपल्या घोषणा तसेच फोटो सर्वांकरिता प्रकाशित केला तर त्या सदस्याच्या सर्व मित्रमंडळींना त्यांच्या मुखपृष्ठावर त्या घोषणा दिसतात.

फेसबुक वरील दुसरे पान आहे "प्रोफाईल पेज". हे पान चार भागात विभागले आहे. ह्यातील माहिती पानावर सदस्याची महिती आढळते. उदा० सदस्याचे नाव, जन्म तारीख, निवास स्थान, राजकीय कल, आवडी/निवडी इत्यादी. सदस्याचे फोटो "अल्बम" ह्या पानावर दिसतात. सदस्याच्या फेसबुकवरील मित्रमंडळींची सूची "फ्रेन्ड्‌स" ह्या पानावर दिसते. तर सदस्याच्या मित्रांनी सदस्याकरिता लिहिलेल्या घोषणा "वॉल" ह्या पानावर दिसतात.

२०१२ साली फेसबुक ने इंस्टाग्राम ही प्रणाली विकत घेतली, या प्रणालीमद्धे असंख्य छायाचित्रे, आणि व्हीडिओ (१ मिनिटांपर्यंतचे) टाकता येतात, युवकांमध्ये ही प्रणाली अतिशय लोकप्रिय आहे.

२०१४ साली फेसबुकने व्हॉट्सॲप ही लोकप्रिय त्वरित संदेशन प्रणाली विकत घेतली. तीही युवावर्गात फारच लोकप्रिय आहे. बहुतेक युवक-युवती तसेच कोणतीही व्यक्ती यावरच दिवसभर चॅटिंग करतांना दिसून येतात. फेसबुकने चॅटिंगसाठी स्वतंत्र ॲंप बनवले आहे. त्यास मॅसेजर म्हणून ओळखले जाते. ह्या ॲंपने कमी वेळात जास्त प्रसिद्धी मिळवली आहे.

पुस्तक

मार्क झकरबर्गची यशोगाथा सांगणारे The facebook effect नावाचे पुस्तक डेव्हिड कर्कपॅट्रिक याने लिहिले आहे, त्याचा द facebook इफेक्ट मराठी नावाचा मराठी अनुवाद वर्षा वेलणकर यांनी केला आहे.

फेसबुकचा खरा चेहरा

  • हा चेहरा दाखवणारे 'फेसबुकचा भारतातील खरा चेहरा (प्रचारयंत्रणेचे शास्त्र आणि अपप्रचाराच्या तंत्राकडे झालेल्या सामाजमाध्यमांच्या वाटचालीची कहाणी)' नावाचे पुस्तक परंजय गुहा ठाकुरता आणि सिरि सॅम यांनी लिहिले आहे. पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रियांका तुपे यांनी केला आहे. पुस्तकात फेसबुक कसा अपप्रचार करते त्याचा सांगोपांग आढावा घेतला आहे.

बाह्यदुवे

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वामी विवेकानंदनक्षत्रसावता माळीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमराठी भाषा दिनवंजारीनागपूर लोकसभा मतदारसंघव्यवस्थापनसमाज माध्यमेवाल्मिकी ऋषीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीउन्हाळानरेंद्र मोदीमधुमेहलातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभांडवलबाबा आमटेशिव जयंतीपी.व्ही. सिंधूभारतीय रेल्वेभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमौर्य साम्राज्यसम्राट हर्षवर्धननांगरलोकसंख्याआईऔद्योगिक क्रांतीकपिल देव निखंजसात बाराचा उतारारायगड (किल्ला)महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेमहात्मा गांधीआंग्कोर वाटउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील किल्लेअन्नप्राशनआदिवासीभारतीय निवडणूक आयोगसुभाषचंद्र बोससामना (वृत्तपत्र)बाराखडीऋतूमैदानी खेळवर्णमालाजेजुरीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९दुधी भोपळाघोणससातवाहन साम्राज्यसुप्रिया श्रीनाटेनिसर्गआर्थिक उदारीकरणनातीभारतातील शेती पद्धतीज्वालामुखीकुत्रास्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)संदेशवहनचंद्रग्रहणब्राझीलसांडपाणीकोरफडनरनाळा किल्लासमीक्षामोबाईल फोनकर्करोगजीवनसत्त्वओझोनजागतिक पर्यावरण दिनसत्यशोधक समाजकोल्हापूर लोकसभा मतदारसंघराखीव मतदारसंघहिंदू कोड बिलहवामानखो-खोध्वनिप्रदूषणपवन ऊर्जाचीन🡆 More