फुलपाखरू: एक कीटक

फुलपाखरू हा एक आकर्षक रंगांचा पंख असलेला एक कीटक आहे.

कीटकांना डोके, पोट आणि छाती हे अवयव असतात. फुलपाखराला या जोडीने पंख आणि मिशा असतात. फुलपाखरे मिशानी वास घेतात तर पायाने चव ओळखतात. फुलपाखरू वेगवेगळ्या रंगाची, आकाराची ही असतात.

फुलपाखरू: फुलपाखरांचे जीवनचक्र, जाती, चित्रदालन
भारतात सापडणारे ब्लू टाईगर फुलपाखरू

फुलपाखरांचे जीवनचक्र

फुलपाखरांचे आयुष्य हे १४ दिवसांच असते. मोनारक जातीच्या फुलपाखराचे आयुष्य १४ दिवस असू शकते.

फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोष व फुलपाखरू या अवस्था असतात.

अंडे/अंडी - विशिष्ट जातींची फुलपाखरे ही काही विशिष्ट प्रकारच्या झाडांवर अंडी घालतात. प्रत्येक जातीच्या फुलपाखरांचे होस्ट प्लांट ठरलेले असते. फुलपाखराची मादी ही मिलनानंतर लगेचच तिला हवे असलेले झाड शोधते व त्यावर अंडी घालते. काही फुलपाखरे ही एका वेळी एक अंडे घालतात तर काही समुहाने अंडी घालतात. ही अंडी पानांच्या मागे किंवा पानांच्या बेचक्यात अशी घातलेली असतात. जेणेकरून ती कोणत्याही परिस्थितीत भक्ष्य होऊ नयेत. यांचा रंग पानांशी मिळताजुळता असतो. यांचा आकार खूप लहान म्हणजे अगदी मोहरीच्या दाण्याएव्हढा असतो. फुलपाखराचे रंग वेगवेगळे असतात.

अळी किंवा सुरवंट-अंडे अथवा अंडी घातल्यानंतर त्यातून एका आठवड्याच्या आसपास अळी किंवा सुरवंट त्याच अंड्याचे कवच खाऊन बाहेर पडतो. सुरवंट खूप खादाड असतो. कोवळ्या पानांचा, कळ्यांचा, फुलांचा, कोवळ्याड्याचा फडशा पाडायला तो सुरुवात करतो. परंतु सगळे सुरवंट शाकाहारी नसतात. काही मावा किडीवर तर काही मुंग्यांचे लार्व्हा खातात.ही अवस्था साधारण १५ ते २० दिवस असते. सुरवंटाचा आकार मोठा होतो. या अवस्थेत तो ३ ते ४ वेळा वरचे आवरण काढून टाकतो. यांचेही रंग आसपासच्या वातावरणातील रंगांशी मिळतेजुळते असतात. काही मांसल तर काही केसाळ असतात.

कोष - अळीची वाढ पूर्ण झाली की ती एखादी सुरक्षित जागा शोधते आणि त्या जागी स्थिर होते. कोष करताना ती तिची त्वचा, पाय आणि मुख हे अवयव गळून पडतात. त्यानंतर अळी स्वतःभोवती कोष तयार करते. काही कोष झाडांवर तर काही जमिनीच्या आत असतात. कोषामध्ये राहण्याचा काळ हा सहा दिवस ते काही महिने असा असू शकतो. हा काळ सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो.

फुलपाखरू कोषात असतानाच अळीचे रूपांतर फुलपाखरात होऊ लागते. पूर्ण वाढ झाली आणि अनुकूल वातावरण मिळाले की फुलपाखरू त्या कोषाला भेग पाडून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर त्याचे पंख ओलसर आणि दुमडलेले असतात. तास ते दीड तासात त्या पंखांची हालचाल सुरू होते. यामुळे पंख कोरडे होण्याची आणि ते सरळ करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. यानंतर पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू आपली झेप घेऊन जीवनास सिद्ध होते.

जाती

बिबळ्या कडवा

बिबळ्या कडवा या जातीच्या फुलपाखपाराची मादी रुईच्या पानांवर अंडी घालते. अंड्यामधून सहा ते आठ दिवसांनी अळी बाहेर पडते. या अळीलाच सुरवंट म्हणतात. या फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतेवेळी भुकेने वखवखलेला असतो. मोनार्क जातीची फुलपाखरे लांब प्रवासासाठी प्रसिद्ध आहेत.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

फुलपाखरू फुलपाखरांचे जीवनचक्रफुलपाखरू जातीफुलपाखरू चित्रदालनफुलपाखरू हे सुद्धा पहाफुलपाखरू संदर्भफुलपाखरूरंग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाशिकधाराशिव जिल्हागुप्त साम्राज्यताराबाईजागतिक तापमानवाढबाराखडीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रमसंत जनाबाईआग्नेय दिशासातारा विधानसभा मतदारसंघरावणअमरावती जिल्हामैदान (हिंदी चित्रपट)शाळाहृदयनवरी मिळे हिटलरलारामयेशू ख्रिस्तइ-बँकिंगपुणे करारभारताचे पंतप्रधानभारताचा ध्वजमुख्य उपनिषदेहापूस आंबाकबड्डीलक्ष्मणजवाहर नवोदय विद्यालयजत विधानसभा मतदारसंघमाहिती तंत्रज्ञान कायदाभीमाशंकरभारतातील शासकीय योजनांची यादीकालभैरवाष्टकमांगगजानन महाराजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेराहुल गांधीसम्राट अशोक जयंतीए.पी.जे. अब्दुल कलामगुंतवणूकढेकूणपैठणसचिन तेंडुलकरनाटकाचे घटकमराठी व्याकरणविधान परिषदधर्मनिरपेक्षताबायो डीझेलराजकारणगजानन दिगंबर माडगूळकरउमाजी नाईकजागतिक व्यापार संघटनामहाविकास आघाडीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीनदीदुसरे महायुद्धदिंडोरी लोकसभा मतदारसंघशिवम दुबेमहावीर जयंतीमहाराष्ट्र शासनसंवादभाषामहाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्रातील पर्यटनजगातील देशांची यादीआणीबाणी (भारत)नांदेड लोकसभा मतदारसंघमुक्ताबाईभारतातील मूलभूत हक्ककृष्णपौगंडावस्थाजायकवाडी धरणगणपती स्तोत्रेतूरमाण विधानसभा मतदारसंघन्यूझ१८ लोकमतईशान्य दिशा🡆 More