प्रदूषण: पर्यावरणात होणारे नकोसे बदल

वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात.

प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाहीत. या गोष्टींकडे आता अजून दुर्लक्ष केले तर आपल्या भावी पिढयांना याचा खूप त्रास होऊ शकतो.

प्रदूषण ही आजच्या काळातील एक खूप गंभीर समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर अश्या अनेक कारणामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे. प्रदूषण ही समस्या आता फक्त भारतापुरती मर्यादित नसून जगभरात देखील ही समस्या खूप वाढत आहे.

वाढते प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. उदाहरणार्थ, हवेमध्ये डीझेल, पेट्रोल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असताना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात.

प्रदूषणाची काही महत्त्वाची उदाहरणे -

  • पाणी प्रदूषण:अशुद्ध पाणी म्हणजे पाणी प्रदूषण, कारखान्यातील रसायने मिसळेले पाणी तलाव, नदी इत्यादी मध्ये सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती ही सांडपाणी व्यवस्थापनाची आहे.
  • हवाप्रदूषण: हवा प्रदूषण हे प्रामुख्याने कारखान्यांमधून निघणारा धूर तसेच गाड्यांमधून निघणारा धूर यांमुळे होते.
  • ध्वनिप्रदूषण: वाहनांचा ,कारखान्यातील यंत्र , वाहनाचा मोठा कर्कश आवाज तसेच गाण्यांचा मोठा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण होते.ध्वनिची तीव्रता मोजण्याचे परिणाम “डेसिबल” हे आहे. एका विशिष्ट डेसिबलपेक्षा अधिक ध्वनि असल्यास हे ध्वनि प्रदूषणाचे कारण ठरते. ८० ते १२० डेसिबल पर्यंतच्या तीव्रतेचा ध्वनि किंवा आवाज हानिकारक ठरू शकतो.

ओळख

वाढ़त्या प्रदूषणामुळे जगात दरवर्षी एक कोटीहून अधिक मृत्यू होतात. हवा, डोंगरदऱ्या, जंगल, त्यातील प्राणी वनस्पती, सूक्ष्मजीव, कीटक याशिवाय वाळवंट, बर्फाने आच्छादलेली हिमशिखरे, समुद्र, नद्या त्यातील सर्व प्रकारचे जीव हे सर्व पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत. तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे, कारखाने त्यामुळे होणारे प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या, कर्णकर्कश हॉर्न त्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.प्रदूषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात.व् यातून वेगवेगळे रोग निर्माण होतात

ध्वनीप्रदूषण

मोठा आवाज म्हणजे ध्वनिप्रदूषण. मनुष्य, प्राणी किंवा यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनिप्रदूषण. ध्वनिप्रदूषणाने माणसाची चिडचिड वाढते, रक्तदाब वाढतो, डोकेदुखी सुरू होते. पुण्यात तसेच मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर हे प्रमाण खूप वाढते. जुन्या व वापरलेल्या बॅटरीतील शिसे हा धातू मानवी स्वास्थ्याला व पर्यावरणाला हानिकारक असतो.

ध्‍वनि हा हवेच्‍या माध्‍यमाने प्रवास करतो आणि म्हणूनच ह्याचे मापन हवेच्या व्‍यापक गुणवत्ता पातळीमध्‍ये केले जाते. ध्‍वनिचे मापन डेसिबलमध्‍ये करतात. 90 डेसिबलपेक्षा जास्‍त जोराच्या आवाजामुळे बधिरत्‍व (बहिरेपण) येते किंवा शरीराच्‍या नाडीतंत्रात कायमस्वरूपी बदल होऊ शकतो आणि ऍन्‍ड्रॅलिनचा प्रवाह वाढतो. ह्यामुळे ह्रदयाच्‍या कार्याची गति वाढते. सतत येत असलेल्‍या आवाजामुळे शरीरातील कोलेस्‍ट्रॉलची पातळी वाढते ज्‍यामुळे रक्‍तवाहिन्‍या कायमच्‍या संकुचित होऊन ह्रदयाघात आणि हार्ट स्‍ट्रोकचा धोका फार प्रमाणात वाढतो. प्रमाणापेक्षा जास्‍त ध्‍वनि किंवा आवाजामुळे न्‍यूरोसिस आणि नर्व्‍हस ब्रेक डाउनदेखील होतो असे तज्ञांचे मत आहे. साधारणतः यामुळे कानात आवाज येतो।.

प्रदूषणाचे प्रकार

पाणी प्रदूषण - सांडपाणी,केमिकॅल्स ,व इतर काही घटक पाण्यात मिसळून पाणी प्रदूषण होते

प्रदूषणावरचे नियम

नियम २००१मध्ये प्रसिद्ध केले आहेत. [ संदर्भ हवा ] ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका, तर नागरिकांनी जागरूकता दाखवणे आवश्यक असते. हॉस्पिटल्स, शाळा आदीं परिसरांमध्ये सायलेन्स झोन उपाय. १. ध्वनी प्रदूषण बंद करा २. आपल्या टीव्ही, संगीत प्रणाली उपकरणांचा आवाज कमी ठेवा . ३.गरज नसताना गाडीचा होर्न वाजवू नका. ७० डेसि बलपेक्षा जास्त आवाजाचे हॉर्न बसवू नयेत. कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यावर मोटार अधिनियम १९८८ अंतर्गत नियमानुसार कारवाई करून दोषींकडून ५०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.

मुंबई पोलिसांनी नोंदवलेली एकूण प्रकरणे व गोळा केलेला दंड वर्ष २००८ -

  • ताणलेला/संगीतमय/प्रवर्तित हॉर्न व आवाज करणारा सायलेन्सर - रुपये - १९,४४,८००/-
  • अनावश्यकपणे हॉर्न वाजवणे - रुपये - ६,०१,०००/-हवा प्रदुषण

४. लाउडस्पीकरच्या वापरापासून इतरांना परावृत्त कर

प्रत्येक वेळी कायदा उपयोगी पडेल असे नाही. लोकांमध्ये याविषयी जागृती निर्माण केली पाहिजे . यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे

धोके

उच्चरक्तदाब असणाऱ्या लोकांसाठी हानिकारक आहे . वृद्ध लोकांसाठी हानिकारक आहे. वेगवेगळे आजार होण्यासाठी प्रदूषण कारणीभूत ठरते.लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो.प्रदूषण कोणतेही असो ते मानवी आरोग्यासाठी हानिकारकच असते. त्यासाठी आधीच काळजी घेतली गेली तर आपल्याला निश्चितच आरोग्यदायी भविष्य आपल्या स्वागतसाठी तयार असेल.

समाजाचे सहकार्य

प्रदूषण थांबवण्यासाठी समाजाचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे.यासाठी समाजातील लोकांनी काही गोष्टीना आळा घालणे आवश्यक आहे.यासाठी आपल्याला प्लास्टिकचा वापर करणे कमी करावे लागेल.

संदर्भ

Tags:

प्रदूषण ओळखप्रदूषण ध्वनीप्रदूषण ाचे प्रकारप्रदूषण ावरचे नियमप्रदूषण धोकेप्रदूषण समाजाचे सहकार्यप्रदूषण संदर्भप्रदूषण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्मृती मंधानाहोमी भाभा१९९३ लातूर भूकंपनागपुरी संत्रीविधानसभागालफुगीजिल्हा परिषदमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळगावइतर मागास वर्गखरबूजफुफ्फुसअनुदिनीभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेमुक्ताबाईक्षय रोगएकनाथलिंगभावचंद्रकांत भाऊराव खैरेशिवसेनाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)मानवी विकास निर्देशांकभिवंडी लोकसभा मतदारसंघहैदराबाद मुक्तिसंग्रामभौगोलिक माहिती प्रणालीभारताच्या राष्ट्रपतींची यादीअजिंक्यताराथोरले बाजीराव पेशवेसूर्यमालाघोडाजिजाबाई शहाजी भोसलेतबलागुढीपाडवा२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लासांडपाणीमराठी संतछत्रपती संभाजीनगरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकआर्थिक विकासप्रेरणासातवाहन साम्राज्यउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघपर्यटनपेरु (फळ)कबीरउभयान्वयी अव्ययबाबा आमटेपेशवेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनखो-खोहातकणंगले लोकसभा मतदारसंघनितीन गडकरीत्र्यंबकेश्वरदुग्ध व्यवसायउंटआयझॅक न्यूटनहार्दिक पंड्यारावेर लोकसभा मतदारसंघनवग्रह स्तोत्रनरहरी सोनारपाराना नदीभाऊराव पाटीलशिवाजी महाराजवाचनइंदिरा गांधीरोहित (पक्षी)उन्हाळासायबर गुन्हामल्लखांबपन्हाळाज्ञानेश्वरीसापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकसिंधुदुर्गसह्याद्रीरवींद्रनाथ टागोरग्रामपंचायत🡆 More