नाझी पक्ष

राष्ट्रीय समाजवादी जर्मन कामगार पक्ष जर्मन: Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei ), किंवा नाझी पक्ष हा जर्मनीमधील इ.स.

१९२० ते इ.स. १९४५ दरम्यान अस्तित्वात असलेला एक राजकीय पक्ष होता. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये वाहणाऱ्या वर्णद्वेषी व कम्युनिस्टविरोधी चळवळींमध्ये ह्या पक्षाची मुळे रोवली गेली.

नाझी पक्ष
नाझी पक्षाचा लोगो

१९२० साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाची सुत्रे ॲडॉल्फ हिटलरने १९२१ साली आपल्या हातात घेतली. वाढती बेरोजगारी, महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हीन वागणूक, ज्यूविरोध व देशप्रेम भावना ह्यांचे भांडवल करून नाझी पक्ष १९३० सालापर्यंत जर्मनीमधील एक बलाढ्य राजकीय पक्ष बनला होता. १९३३ साली हिटलरला जर्मनीचा चॅन्सलर घोषित करण्यात आले. त्यानंतर हिटलर व त्याच्या नाझी सहकाऱ्यांनी जर्मनीमधील इतर सर्व पक्ष बरखास्त केले व राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबले अथवा ठार मारले. ह्याच वर्षी नाझी जर्मनीची स्थापना झाली व ह्या राष्ट्राचा संपूर्ण अंमल नाझी पक्षाच्या हातात आला.

हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी पक्षाने अनेक फॅसिस्ट कायदे लागू केले ज्यामध्ये जर्मन समाजाचे शुद्धीकरण करण्यासाठी आर्य जर्मनेतर सर्व वंशाच्या (मुख्यतः ज्यू) तसेच अपंग, समलिंगी, काळे, मतिमंद इत्यादींचे खच्चीकरण करणाऱ्या योजनांचा समावेश होता. ह्याचे रूपांतर होलोकॉस्टमध्ये झाले ज्यात सुमारे ६० लाख लोकांची कत्तल करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पाडाव झाल्यानंतर नाझी पक्ष नष्ट पावला.

नाझी पक्षाचा मार्क्सवाद, लोकशाही, उद्योगीकरण इत्यादी अनेक राजकीय विचारधारांना पूर्ण विरोध होता व एक-पक्ष हुकुमशाहीवर विश्वास होता.

Tags:

De-Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei.oggDe-Nationalsozialistische_Deutsche_Arbeiterpartei.oggइ.स. १९२०इ.स. १९४५जर्मन भाषाजर्मनीपहिले महायुद्ध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संगीतातील घराणीचलनवाढरायगड (किल्ला)शाश्वत विकासशेतकरी कामगार पक्षसज्जनगडहापूस आंबाशिखर शिंगणापूरशेतीटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीजिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानबहिणाबाई पाठक (संत)झी मराठीराम सुतार (शिल्पकार)विठ्ठल रामजी शिंदेकरएकांकिकामराठी भाषेमधील वृत्तपत्रेसेंद्रिय शेतीकावीळभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशरविकांत तुपकरभारतातील समाजसुधारकगोपीनाथ मुंडेबृहन्मुंबई महानगरपालिकाउद्धव ठाकरेमतदानशिल्पकलासूर्यमालाकोरफडभारतीय प्रजासत्ताक दिनमोबाईल फोनगुकेश डीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय अंतराळ संशोधन संस्थाएकविराकिरवंतखंडोबासंत जनाबाईव्यायाम२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकापश्चिम दिशाईशान्य दिशाआर्य समाजसाताराभारतातील शासकीय योजनांची यादीभारतीय रेल्वेभारतीय संविधानाचे कलम ३७०पाकिस्तानच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची यादीकर्ण (महाभारत)विनोबा भावेप्राथमिक आरोग्य केंद्रतणावहडप्पा संस्कृतीवार्षिक दरडोई उत्पन्नआकाशवाणीनांदेड लोकसभा मतदारसंघजालना लोकसभा मतदारसंघनेतृत्वकाळूबाईकार्ल मार्क्सप्रसूतीक्रिकेटचा इतिहाससंवादिनीभारतीय निवडणूक आयोगलोकसभाजिजाबाई शहाजी भोसलेगजानन दिगंबर माडगूळकरभारतातील जिल्ह्यांची यादीगोरा कुंभारनक्षत्रमुंजा (भूत)गोवामहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीहनुमान जयंतीशीत युद्धमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकनर्मदा नदीशिरसाळा मारोती मंदिर🡆 More