तालिबान: Afghanistan -taliban crises

तालिबान आशियातील काही देशांतून असलेली दहशतवादी संघटना आहे.

पाकिस्तान

तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान या दहशतवादी संघटनेची स्थापना बैतुल्ला मसूद या कडव्या दहशतवाद्याने २००७ साली पाकिस्तानमध्ये केली. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील 'फेडरली ॲडमिनिस्टर्ड ट्राइबल एरिया' अर्थात फटा क्षेत्रात १९८० च्या दशकापासून फोफावलेल्या अनेक इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटना एकत्र करून त्याने या संघटनेची स्थापना केली. या संघटनेची तीन मुख्य उद्दिष्टे होती. एक म्हणजे अमेरिकेचा कट्टर विरोध करणे. दोन, पाकिस्तानमध्ये शरियतवर आधारित असेलेले कट्टर इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि तीन, अफगाणिस्तान, चीन व भारतातील जिहादी संघर्षाला समर्थन, सहकार्य करणे.

विशेष म्हणजे ही संघटना पाकिस्तानी लष्कराला पहिल्यापासूनच इस्लामचा शत्रू मानत आली आहे. पाकिस्तान जरी इस्लामिक राष्ट्र असले, तरी कट्टर इस्लामी राज्याची फार कमी वैशिष्ट्ये पाकिस्तानात आहेत. असे कडवे इस्लामिक राज्य पाकिस्तानात आणण्यात सर्वात मोठा अडथळा पाकिस्तानचे लष्कर असल्याचे या संघटनेचे मत आहे. पाकिस्तानमधील राजकीय नेतृत्व लष्कराच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे या संघटनेने आपल्या स्थापनेनंतर लगेचच पाकिस्तानातील राजकीय नेतृत्व आणि लष्कराला लक्ष्य करायला सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने या संघटनेविरुद्ध लष्करी कारवाई केली व त्यासाठी अमेरिकेची मदत घेतली.

२००९ साली पाकिस्तान तालिबान व लष्कर यांच्यात पहिला संघर्ष झाला. त्यात मसूद मारला गेला. १५ जून २०१४ रोजी या संघटनेविरुद्ध पाकिस्तानने दुसरी लष्करी कारवाई सुरू केली.

या दुसऱ्या लष्करी मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही कारवाई केवळ 'तहरिक-ए-तालिबान-पाकिस्तान'च्या विरोधात आहे. ती पाकिस्तानमधील इतर दहशतवादी विशेषतः पाकिस्तानच्या पूर्वेकडे सक्रिय असणाऱ्या 'जमात-उल-दवा', 'लष्कर-ए-तैय्यबा' यांसारख्या संघटनांच्या विरुद्ध नाही. या संघटनांना सूट देण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे, जर या संघटना पश्चिमेकडील पाकिस्तान तालिबानला जाऊन मिळाल्या, तर पाकिस्तानसाठी तो सर्वात मोठा धोका असेल. त्यामुळे या संघटनांविषयी मवाळ धोरण स्वीकारण्यात आले, तसेच या संघटनांचा फायदा भारतविरोधी देखील करता येत असल्यामुळे त्यांच्याविषयी सहकार्याचे धोरण पाकिस्तानी लष्कराचे राहिले आहे. हाफिज सईदचा पाकिस्तानातील मुक्त संचार किंवा नुकतेच मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधार लखवीला मिळालेला जामीन या गोष्टी 'जमात-उल-दवा' व 'लष्कर-ए-तैय्यबा'विषयीचा 'सॉफ्ट कॉर्नर' स्पष्ट करतात. एवढेच नाही तर पाकिस्तान तालिबानला नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर हाफिज सईदची मदतही घेऊ शकते.

तालिबानची दहशतवादी कृत्ये

  • पेशावरमधील शाळेवर केलेला अमानुष दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात .... मुले मृत्युमुखी पडली.

तालिबानची साद्यंत माहिती सांगणारी पुस्तके

  • तालिबान (मूळ लेखक - पत्रकार अहमद रशीद, मराठी अनुवाद - भारती पांडे)
  • माझे तालिबानी दिवस (मूळ इंग्रजी, लेखक -सलाम झैफ, मराठी अनुवाद - डॉ. प्रमोद जोगळेकर)

Tags:

आशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जय भीमअहमदनगर लोकसभा मतदारसंघसलमान खाननालंदा विद्यापीठस्त्री सक्षमीकरणमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपोक्सो कायदासामाजिक कार्यकर्म (बौद्ध धर्म)भारताचे संविधानगोवरताराबाई शिंदेकोहळाभूकंपरामरक्षासंगम साहित्यरामटेक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीवित्त आयोगभारतातील घोटाळ्यांची यादीभारतातील जातिव्यवस्थाआदिवासीशनिवार वाडामिरज विधानसभा मतदारसंघगोरा कुंभारआंब्यांच्या जातींची यादीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीछत्रपती संभाजीनगरवर्णमालासिंधुताई सपकाळअजिंठा-वेरुळची लेणीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)उन्हाळाब्राझीलबारामती लोकसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीसेंद्रिय शेतीविहीरस्थानिक स्वराज्य संस्थाअर्थशास्त्रनाटकाचे घटकदत्तात्रेयलातूर लोकसभा मतदारसंघशाहू महाराजश्रीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीआरोग्यजळगाव लोकसभा मतदारसंघनर्मदा परिक्रमाजागरण गोंधळफणसविदर्भमराठीतील बोलीभाषाकाळभैरवनाशिक लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमुळा नदी (अहमदनगर जिल्हा)रामायणज्ञानेश्वरठाणे जिल्हाभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीनिसर्गमहाराष्ट्र शासनअग्रलेखज्योतिर्लिंगसातव्या मुलीची सातवी मुलगीचंद्रभारतीय राष्ट्रीय काँग्रेससात आसराअष्टविनायकरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघयोगतोरणावातावरणमहाराष्ट्राचा भूगोलज्ञानेश्वरीआषाढी वारी (पंढरपूर)लहुजी राघोजी साळवेमुंज🡆 More