जागतिकीकरण

जागतिकीकरण म्हणजे स्थानिक वस्तूंची किंवा घडामोडींची जागतिक स्तरावर स्थानांतरणाची प्रक्रिया.

ह्या संज्ञेचा उपयोग बहुधा आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात केला जातो. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे, २०व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे, एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे, त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांसाठी खुले केले जाते. विश्व बँकेच्या अहवालानुसार जागतिकीकरण म्हणजे - १) उपभोग्य वस्तुंसह सर्व वस्तुंच्या आयातीवरील नियंत्रण हळूहळू समाप्त होणे. २) आयात शुल्काचा दर कमी करणे. ३) सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे होय. दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय. डॉ. यशवंत मनोहर यांच्या मते जागतिकीकरण म्हणजे जगातील वेगवेगळ्या देशांनी परस्पर व्यापार करणे होय.

भारतातील जागतिकीकरण

भारतात १९९० च्या सुमारास जागतिकीकरणाला सुरुवात झाली. ह्या काळात देशावरचे विदेशी कर्ज एवढे वाढले होते की जागतिक बँक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणे निधी (International Monetary Fund) ह्या खाजगी जागतिक संघटनांनी भारताला आणखी कर्ज देणे नाकारले व कर्ज मिळवण्यासाठी भारतावर काही अटी लादल्या. ह्या अटींमध्ये भारताने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करून तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले करणे समाविष्ट होते. अर्थव्यवस्थेमधील ह्या बदलांना "आर्थिक सुधारणा" असे म्हटले गेले. त्यात जागतिकीकरणासोबतच उदारीकरण व खाजगीकरण ह्यांचा पण समावेश होतो. ह्यांनाच एकत्रितपणे खा.ऊ.जा. धोरण असे संबोधले जाते. संजय भास्कर जोशी यांच्या मते, मुख्यत: व्यापारासाठी विविध देशांनी एकमेकांना जोडून घेत एकमेकांच्या भूमीत खुलेपणाने व्यापार करण्यासाठीची व्यवस्था निर्माण करणे म्हणजे जागतिकीकरण होय. मो. वि. भाटवडेकर यांनी नोंदविल्याप्रमाणे, 'देशात खुला व्यापार, गुंतवणुकीसाठी मोकळी बाजारपेठ आणि तंत्रज्ञान व कुशल व्यावसायिकांना देशांतर करण्यास सुलभ कायदे कानून अशी जागतिक व्यवस्था म्हणजे जागतिकीकरण होय.'

जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीयकरण

जग ही एक बाजारपेठ असणे जागतिकीकरणाचे ध्येय आहे. परकीय क्षेत्राचे उदारीकरण केल्यास औदयोगिक उत्पादने आपोआप परकीय क्षेत्राशी जोडली जातात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे बँकिंग आणि सेवाक्षेत्रही परकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात. विविध देशांची परकीय क्षेत्रे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थाही एकमेकांशी संलग्न होतात; जागतिकीकरण होऊ लागते. उत्पादनाचे वितरण स्थानिक स्तरापर्यंत होत असेल तर त्याला स्थानिकीकरण असे संबोधतात. याउलट उत्पादनाचे वितरण देशादेशामध्ये होत असेल, तर त्याला आंतरराष्ट्रीयकरण असे म्हणतात. परंतु जागतिकीकरण आंतरराष्ट्रीयीकरणापेक्षा मोठी आणि व्यापक संकल्पना आहे. जागतिकीकरणात फक्त उत्पादनाचे वितरणच नाही तर त्यासोबत बाजार, नियम, कररचना, आयातशुल्क, साहाय्य, विक्री , व्यापार संघटन, तोडगा अशा व्यवसायाशी निगडीत सेवांचा देखील समावेश असतो. आंतरराष्ट्रीयकरणात राष्ट्र एकक मानून उत्पादनांची देवाणघेवाण होते. जागतिकीकरणात व्यापाराच्या दृष्टीने राष्ट्रांच्या सीमा फिकट होतात. त्या इतक्या फिकट होतात की, व्यापाराच्या दृष्टीने स्थलांतर आणि भांडवलाचे मुक्त वहन होऊ लागते. जागतिकीकरण हे दळणवळण आणि तंत्रज्ञानामुळे तीव्र होत जाते. ते रोखणे कठीण असते.

जागतिकीकरण म्हणजे:

१) ज्या ठिकाणी स्वस्त आणि रास्त कच्चा माल आणि इतर स्रोत उपलब्ध असतील , अशा जगातील कोणत्याही ठिकाणी उत्पादन घेणे .

२) जगातील कोणत्याही कोपऱ्यापर्यंत वस्तू आणि सेवा पुरविणे , संपूर्ण जग हीच बाजारपेठ असणे .

३)देशाच्या बृहतलक्षी घटकांपैकी 'परकीय क्षेत्र' हे सर्वात महत्त्वाचे क्षेत्र असणे .

जागतिकीकरणाच्या व्याख्या:

१. हेराड, टाथेल आणि रॉबर्ट:- "जागतिकीकरण ही आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे एका काल्पनिक विश्व अर्थ व्यवस्थेकडे होणारे संक्रमण दर्शवणारी संकल्पना आहे."

२. एडवर्ड हार्मन:- " जागतिकीकरण ही सीमापार उत्पादने, भांडवल सेवा आणि आर्थिक क्रिया प्रक्रियांच्या वाढत्या प्रवाहाला लक्ष करणारी प्रक्रिया आहे."

३. बायलिस आणि स्मिथ: - "जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणा-या लोकांमध्य वाढते सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व्यापारी, सांस्कृतिक संबंध दर्शविणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय."

४. कॉक्स आणि कॉटन;- " जागतिक भांडवलशाही मधुन निर्माण झालेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या, संस्था यांचा प्रभाव असणारी, आंतररष्ट्रीय आणि आर्थिक व्यवस्थेत राष्ट्राची भूमिका मर्यादित करणारी प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय.'

स्मिथ:- " आंतरराष्ट्रीय आणि सर्वांसाठी स्वातंत्र्य या मूल्यांचा समावेश असणारी आणि मुक्त व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे फायदे सर्वांना मिळून देणारी सर्वसमावेशक प्रक्रिया आहे."

6 जागतिक बँक:- जागतिकीकरण म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करण्याची प्रक्रिया होय.

जागतिकीकरण आणि साहित्य

या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :-

  • जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न (उत्तम कांबळे)
  • जागतिकीकरण आणि भारत (नलिनी पंडित)
  • जागतिकीकरण आणि मराठी ग्रामीण साहित्य (प्रा.डॉ. राजेंद्र हावरे)
  • जागतिकीकरण आणि वंचित समाज (रमेश पतंगे)
  • जागतिकीकरण आणि मराठी भाषा (डॉ.सौ. सूर्यकांता अजमेरा, प्रा.विनोद उपर्वट)
  • जागतिकीकरण की नवीन गुलामगिरी (नीरज जैन)
  • जागतिकीकरण आणि मराठी साहित्य : प्रा.डॉ. सौ. नलिनी महाडिक यांचा गौरव ग्रंथ (डॉ.शरद गायकवाड, डॉ.सुनील शिंदे)
  • जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य (संपादक रवींद्र शोभणे)
  • जागतिकीकरणाचा मराठी भाषा व साहित्यावरील प्रभाव (डॉ. वासुदेव वळे)
  • जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य (डॉ. प्रल्हाद लुलेकर गौरव ग्रंथ, संपादक नागनाथ कोतापल्ले, दत्ता भगत)
  • साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण (भालचंद्र नेमाडे), वगैरे वगैरे.

संदर्भ

Tags:

जागतिकीकरण भारतातील जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीयकरणजागतिकीकरण ाच्या व्याख्या:जागतिकीकरण आणि साहित्यजागतिकीकरण संदर्भजागतिकीकरण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)परभणी विधानसभा मतदारसंघअसहकार आंदोलनवृद्धावस्थाभारताचे पंतप्रधानपानिपतची तिसरी लढाईविष्णुसहस्रनाममहाराष्ट्राची हास्यजत्राताराबाईचंद्रयान ३महाराष्ट्रातील राजकारणवर्णनात्मक भाषाशास्त्रभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यारेणुकापथनाट्यनगर परिषदसुजात आंबेडकरहोमरुल चळवळएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)नाथ संप्रदायॲडॉल्फ हिटलरभारत सरकार कायदा १९३५जागतिक महिला दिनब्रिक्ससंधी (व्याकरण)उदयनराजे भोसलेविठ्ठल रामजी शिंदेक्रिकबझभारताचा स्वातंत्र्यलढामराठी व्याकरणकेंद्रीय लोकसेवा आयोगउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघतूळ रासशिरूर लोकसभा मतदारसंघजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येट्विटरगजानन महाराजदूधगांडूळ खतवचनचिठ्ठीबाळशास्त्री जांभेकरग्रामदैवतसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेक्रांतिकारकमराठी भाषेमधील वृत्तपत्रेकाळूबाईभारतीय रिझर्व बँकव्यंजनपहिले महायुद्धक्रियाविशेषणहरितक्रांतीकुणबीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघउंबरकाळाराम मंदिर सत्याग्रहबहिणाबाई चौधरीवंचित बहुजन आघाडीगुप्त साम्राज्यनारळप्रज्ञा विवर्धन स्तोत्रहंपीसेवालाल महाराजभारतातील समाजसुधारकसाडेतीन शुभ मुहूर्तवि.वा. शिरवाडकरसंगीत नाटकव्हॉट्सॲपशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळदुसरे महायुद्धपश्चिम दिशाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसटोपणनावानुसार मराठी लेखकनांदेडपर्यटनअहिराणी बोलीभाषानागपूरमृत्युंजय (कादंबरी)अमित शाहमाती प्रदूषण🡆 More