जलप्रदूषण: ाची माहिती

जलप्रदूषण म्हणजे पाण्याच्या विविध स्रोतांचे प्रदूषण होय.

जलप्रदूषण ही एक मानवनिर्मित समस्या आहे. "हवा,पाणी आणि अन्न" या माणसाच्या तीन गरजांपैकी पाणी ही दुसऱ्या क्रमांकाची गरज आहे. आपल्याला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रदुषित पाण्यामुळे पोटाचे विकार आणि इतर बरेचसे रोग होतात. पाणी प्रदूषित होण्याची अनेक कारणे आहेत आणि याला माणसे जबाबदार आहेत. जलप्रदूषण ही संपूर्ण जगाला भेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे. मानवी कृती आणि अन्य कारणांमुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अश्या प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जलप्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते. या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात. पाण्याचे प्राकृतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व इतर सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जल प्रदूषण ही प्रक्रिया आहे. नैसर्गिक पाण्यात एखादा बाह्य पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याचा मानव, इतर प्राणी आणि जलीय जीव यांना अपाय होतो. जगातील बहुतेक देशांत जलप्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. कॅनडा, चीन, भारत, जपान, रशिया, अमेरिका इ. देशांत ही समस्या तीव्रतेने जाणवते. या वर उपाय योजना करणे अतिशय महत्वाचे आहे.

उपाययोजना

जल प्रदूषण रोखण्‍यासाठी त्याची कारणे माहीत करून योग्य ती उपाययोजना योजली पाहीजे व यासंबंधी कडक कायदे तयार करावे लागतील. १९७४ मधील Water Act या कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे.

शुद्धीकरण

जलप्रदूषण: ाची माहिती 
तलावातील कचरा, प्लास्टिक पिशव्या इत्यादी काढतानाचा एक क्षण
जलप्रदूषण: ाची माहिती 
गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.
जलप्रदूषण: ाची माहिती 
गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.
जलप्रदूषण: ाची माहिती 
गणेश विसर्जनानंतरचे जलप्रदूषण.

जगभरातील साधारणतः २५ टक्के लोकसंख्येला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकत नाही.[ संदर्भ हवा ] पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरीनचा वापर सर्वाधिक केला जातो. पण त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जंतू मरत नाहीत. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी शुद्धीकरणाच्या अन्य पद्धतींची गरज पडते.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोलापूरमहाराष्ट्राची हास्यजत्रापंचायत समितीसातवाहन साम्राज्यमतदानसातारामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभूतपारू (मालिका)भारताचे राष्ट्रपतीश्रीकांत शिंदेगुळवेलमूळ संख्याबंजारानकाशादिंडोरी लोकसभा मतदारसंघपर्यावरणशास्त्रभारताचे सर्वोच्च न्यायालयबौद्ध धर्मयादव कुळअष्टविनायकपृथ्वीच्या अंतरंगाची रचनास्त्री नसबंदी शस्त्रक्रियापुष्यमित्र शुंगकेंद्रीय लोकसेवा आयोगवासुदेव बळवंत फडकेचेतासंस्थाजिल्हाधिकारीभारतातील जातिव्यवस्थाक्रियापदचिमणीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघअर्थशास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनज्योतिबा मंदिरअकोला लोकसभा मतदारसंघप्रणिती शिंदेउष्माघातरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी लेखककोरफडहिंद-आर्य भाषासमूहहिंदू कोड बिलऋग्वेदगिटारसूर्यमालालॉरेन्स बिश्नोईस्थानिक स्वराज्य संस्थाग्रीसमहाराष्ट्र नवनिर्माण सेनालावणीमराठी भाषासेवालाल महाराजअयोध्यागोंधळपन्हाळास्वरअक्षय्य तृतीयानिबंधआळंदीपश्चिम महाराष्ट्रराजू शेट्टीमौर्य साम्राज्यभारतीय रिझर्व बँकबँकरामजी सकपाळप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसनातन धर्ममूलद्रव्यहनुमानमहाराष्ट्रातील लोककलाखाजगीकरणसम्राट अशोकभारताचे पंतप्रधानक्लिओपात्राभारतातील राजकीय पक्ष🡆 More