छऊ नृत्य: ओरिसा व बिहारमधील नृृत्य

छाऊ नृत्य हा भारताच्या ओडिसा व बिहारमधील हा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे.

बिहारच्या सराईकेला या भागात या नृत्याचा विशेष प्रचार आहे.

स्वरूप

छाऊ म्हणजे मुखवटा. मुखवटा घालून हे नृत्य केले जाते. यामध्ये नृत्याची एक साखळी असून वसंतोत्सवात हे नृत्य केले जाते. अर्धनारीनटेश्वर ही या नृत्याची देवता असल्याने तीन दिवस तिचे पूजन करून या नृत्याला प्रारंभ केला जातो. सुपीकपणा व सर्जन यांचे प्रतीक म्हणून या देवतेकडे पाहिले जाते. हे नृत्य तीन रात्री चालते.याच्या साथीला नगारा,मृदंग,बासरी इ.वाद्ये असतात.यात साध्या नृत्याबरोबर पौराणिक व रामायण महाभारतातील प्रसंगावर आधारलेली नृत्यही असतात. या नृत्यात गती,उत्प्लवन भ्रमरी व पदन्यास यांना महत्त्व असते.

वैशिष्ट्ये

प्रत्येक छाऊ नर्तकाला वाघ, सिंह, हरीण, मोर, घोडा, हंस यांच्या गती माहिती असाव्या लागतात. अंगविक्षेप व हावभाव यांच्याद्वारे नार्त्काने नृत्याची कथा सादर करायची असते. या नृत्यापैकी शिवतांडव हे नृत्य फार प्रभावी असते. या नृत्याच्या पठडीतील मयूरनृत्य, सागरनृत्य, सर्पनृत्य, धीवरनृत्य, नाविकनृत्य इ. नृत्ये उल्लेखनीय आहेत. हे नृत्य केवळ पुरुषांचे आहे.

ओडिसातील नृत्य

ओडिसात प्रचलित असलेल्या छाऊ नृत्यात नर्तक मुखवटे घालत नाहीत. दोन व्यक्ती मिळून जी नृत्ये सादर करतात, त्यात राधाकृष्णांच्या लिला दाखविणे हा प्रकार प्रमुख असतो. यात पुरुषच राधेचे सोंग घेतो. नृत्याच्या गतीबरोबर चेहऱ्यावरील भावमुद्राही बदलत असतात. आणि हेच या नृत्याचे वैशिष्ट्य आहे.

संदर्भ

Tags:

छऊ नृत्य स्वरूपछऊ नृत्य वैशिष्ट्येछऊ नृत्य ओडिसातील नृत्यछऊ नृत्य संदर्भछऊ नृत्यओडिसाबिहार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दक्षिण दिशाआनंद शिंदेमराठी भाषा गौरव दिनमेळघाट विधानसभा मतदारसंघविराट कोहलीअमित शाहविमाअन्नप्राशननंदुरबार लोकसभा मतदारसंघभारतीय राष्ट्रीय काँग्रेसहवामानहॉकीजे.आर.डी. टाटामहाराष्ट्र केसरीअध्यापनजहांगीरदौलताबादविद्यमान भारतीय राज्यपालांची यादीज्योतिबासुभाषचंद्र बोसटरबूजत्र्यंबकेश्वरपश्चिम दिशाजास्वंदसुशीलकुमार शिंदेराज्य निवडणूक आयोगटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीयशवंत आंबेडकरब्रिक्समलेरियामिठाचा सत्याग्रहकुलदैवतनागपूरभारत छोडो आंदोलनट्विटरअमरावती जिल्हापानिपतची तिसरी लढाईपिंपळकल्याण लोकसभा मतदारसंघवर्धा लोकसभा मतदारसंघजिल्हा परिषदमहात्मा गांधीवंजारीजागतिक महिला दिनबहुराष्ट्रीय कंपनीकासारनितंबजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)रमा बिपिन मेधावीशरद पवारशेतकरीआमदारविजयसिंह मोहिते-पाटीलपुणे लोकसभा मतदारसंघज्ञानपीठ पुरस्कारशिव जयंतीपंजाबराव देशमुखमहिला अत्याचारअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९वल्लभभाई पटेलकर्ण (महाभारत)गुरू ग्रहपुरंदरचा तहभारताचे उपराष्ट्रपतीअश्वगंधाराणी लक्ष्मीबाईअंजनेरीमहाविकास आघाडीकृष्णबाळूमामाच्या नावानं चांगभलंचंद्रगुप्त मौर्यबखरशेतीहस्तमैथुनपुरंदर किल्लामहाराष्ट्रातील पर्यटनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीशाळा🡆 More