चिंच: एक उष्णकटिबंधीय वनस्पती

चिंच (शास्त्रीय नाव : Tamarindus indica, टॅमॅरिंडस इंडिका ;) ही मुळातील उष्णकटिबंधीय आफ्रिकेतील वनस्पती आहे.

चिंच चवीला आंबट असते. झाडे शंभर फुटापर्यंत ही वाढतात.

" | चिंच
झाडाला लागलेल्या चिंचा
झाडाला लागलेल्या चिंचा
" | शास्त्रीय वर्गीकरण
वंश: Magnoliophyta
जात: Magnoliopsida
वर्ग: Fabales
कुळ: Caesalpinaceae
जातकुळी: Mangifera
Carolus Linnaeus
जीव

५० पेक्षा जास्त प्रजाती;

उपयोग

खाद्य पदार्थात सांबार, रसम, चटणी आणि विविध प्रकारची आमटी बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो. झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. उद्योगात चिंच बियांचे चूर्ण वापरले जाते. चिंचेच्या बिया वाळवल्या जातात. त्यानंतर गिरणीमध्ये दळून त्याचे चूर्ण बनविले जाते. वस्त्रउद्योगामध्ये याला खूप मागणी असते. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते.

लागवड

१ चिंचेच्या लागवडीविषयी जमिनी स्वरूपाची माहिती:

  • रोपांच्या जाती
  • रोपे मिळण्याचे ठिकाण
  • खड्ड्याचे स्वरूप व खड्डे भरण्याची पद्धत
  • लागवडीचा महिना
  • उन्हाळ्यातील पाण्याची गरज
  • बाजार पेठेविषयी माहिती
  • चिंचलागवड फायदेशिर ठरूशकेल का?
  • चिंचेबंधी महाराष्ट्र सरकारच्या योजना

चिंच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊस मानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडांच्या बियांपासून 9चिंचोक्यांपासून) चिंचेचे रॊप बनते. बियांपासून रोपे तयार करून व शिवाय कलमे तयार करून रोप तयार केले जाते.. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते. चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून भरतात. तळाशी १०-१५ सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकतात. नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरतात. मातीत १०० ग्रॅंम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावतात आणि लगेच पाणी द्देतात..

चिंच जात

प्रतिष्ठान

आवळा जात- एन.ए.-7, चकैया, कृष्णा, कांचन, एन.ए.-10,c सदर जातीची कलमे कृषी विकास प्रतीष्ठानच्या फार्मवर ४० रु. प्रतिकलम दराने उपलब्ध असतात. फोन संपर्क – 02112-254313v किंवा- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, नर्सरी विभागाशी संपर्क साधून रोपे मिळवता येतात.

चिंचेेला लागणाऱ्या काही किडी आणि त्यांचे नियंत्रण

चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही.काही वेळा खोडअळी आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छिद्रांमध्ये रॉकेल अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करतात. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकतात..

फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते. चिंच हे पितळेची भांडी चमकव्याचे काम करते.त्याचप्रमाणे चिंचेची चटणी खूप स्वादिष्ट बनते. चिंचेच्या बीला चिंचोका या नावाने ओळखले जाते. सोललेल्या चिंचोके खाता येतात. चिंचेमध्ये असणारे टार्टारिक आम्ल भेळ, आमटी आदी खाद्यपदार्थाला आंबट चव येण्यासाठी फायदेशीर ठरते.

पहिला चिंच महोत्सव

औरंगाबादमध्ये कृषी विभाग आणि मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चिंच महोत्सवाला पाच आणि सहा मार्च २००८ रोजी सुरुवात झाली.

विलायती चिंच

'विलायती चिंच', 'फिरंगी चिंच' किंवा 'गोरटी इमली' हा चिंचेचा प्रकार (variety) नसून, एक वेगळी वनस्पती आहे.

गुणधर्म

  • चिंच सौम्य रेचक म्हणून काम करते.

साहित्य आणि संस्कृतीतील स्थान

  • प्रसिद्ध गीत : चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी दिसशी तू, दिसशी तू, नवतरुणी काश्मिरी ! (गीतकार - ग.दि.माडगूळकर; चित्रपट - मधुचंद्र १९६७, स्वर महेन्द्र कपूर, संगीत एन दत्ता)

संदर्भ

Tags:

चिंच उपयोगचिंच लागवडचिंच जातचिंच ेेला लागणाऱ्या काही किडी आणि त्यांचे नियंत्रणचिंच पहिला महोत्सवचिंच विलायती चिंच गुणधर्मचिंच साहित्य आणि संस्कृतीतील स्थानचिंच संदर्भचिंचआंबटआफ्रिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रतन टाटामराठा साम्राज्यमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)कळसूबाई शिखरनंदुरबार लोकसभा मतदारसंघरक्तरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघसमाज माध्यमेसमाजशास्त्रविराट कोहलीघनसावंगी विधानसभा मतदारसंघराजगडमराठी भाषा गौरव दिनलसीकरणभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीरामध्वनिप्रदूषणस्त्री सक्षमीकरणमहात्मा गांधीययाति (कादंबरी)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाभोपळाशाहू महाराजसायबर गुन्हाविधानसभासंगणकाचा इतिहासजहाल मतवादी चळवळदर्यापूर विधानसभा मतदारसंघएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीवित्त आयोगराज ठाकरेधर्मो रक्षति रक्षितःमुळाक्षरमोरवंचित बहुजन आघाडीसंभाजी भोसलेजगदीश खेबुडकरपुराभिलेखागारभारतीय संविधानाचे कलम ३७०जास्वंदरामायणभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसाडेतीन शुभ मुहूर्तबुद्धिबळबडनेरा विधानसभा मतदारसंघओशोभाषालंकारटरबूजजायकवाडी धरणऔंढा नागनाथ मंदिरआचारसंहितामाहितीविंचूमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमौर्य साम्राज्यबाबा आमटेफकिरागुढीपाडवाकराड उत्तर विधानसभा मतदारसंघधनगरसमुपदेशनचार आर्यसत्यअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारताचा इतिहासमाळशिरस विधानसभा मतदारसंघनिबंधउंबरराशीकल्की अवतारकोल्हापूर जिल्हान्याययोगलातूर लोकसभा मतदारसंघजववल्लभभाई पटेलजिल्हा परिषदलोणार सरोवर🡆 More