गर्भपात

गर्भपात ही गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात वाढत असलेले बीज बाहेर काढून गर्भावस्थेचा शेवट करण्याची क्रिया आहे.

गर्भपात तांत्रिक गुंतागुंतींमुळे नैसर्गिकपणे देखिल घडू शकतो परंतु बव्हंशी वेळा शस्त्रक्रियेमार्फत घडवून आणला जातो. गर्भधारणा होऊन सहा महिने (२४ आठवडे) पूर्ण व्हायच्या आत गर्भ पडला तर त्याला 'गर्भपात' म्हणतात. असा गर्भ बाहेर पडताना जिवंत असला तरी काही केल्या जगत नाही. (सात महिने पूर्ण असतील तर मात्र खास उपायांनी मूल जगवता येते. म्हणून सात महिन्यांनंतर गर्भ पडला तर अपुऱ्या दिवसांचे बाळंतपण म्हणतात; गर्भपात म्हणत नाहीत.)

गर्भपात
गर्भपात करताना
१: गर्भावरण्
२: गर्भ
३: गर्भपिशवी
५: स्पेक्युलम
५: क्युरेट्
६: सक्शनपंपाला जोडलेले
सूचना
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.

वैद्यकीय चिकित्सा वापरून व वैधपणे केला गेला तर गर्भपात ही वैद्यकशास्त्रातील सर्वात सुरक्षित क्रिया आहे. परंतु जगातील अनेक भागांमध्ये विविध कारणांस्तव असुरक्षित गर्भपात केले जातात ज्यांमध्ये दरवर्षी अंदाजे ६८,००० स्त्रिया मृत्यूमुखी पडतात. ह्यांपैकी ९७ टक्के स्त्रिया विकसनशील वा अविकसित देशांमधील आहेत.

पद्धती

  • वैद्यकीय गोळ्यांच्या साहाय्याने,

कायद्यांतर्गत तरतुदी

जगातील गर्भपाताचे कायदे

  कायदेशीर दृष्ट्या वैध (कालमर्यादा विविध देशांमध्ये वेगळी)
  बलात्कार, स्त्रीच्या जीवाला धोका, स्त्रीची खराब शारिरिक व मानसिक तब्येत, गर्भदोष तसेच सामाजिक व आर्थिक परिस्थिती हे अपवाद वगळता कायद्याने बंदी
  बलात्कार, स्त्रीच्या जीवाला धोका, स्त्रीची खराब शारिरिक व मानसिक तब्येत, गर्भदोष हे अपवाद वगळता कायद्याने बंदी
  बलात्कार, स्त्रीच्या जीवाला धोका, स्त्रीची खराब शारिरिक व मानसिक तब्येत हे अपवाद वगळता कायद्याने बंदी
  स्त्रीच्या जीवाला धोका, स्त्रीची खराब शारिरिक व मानसिक तब्येत हे अपवाद वगळता कायद्याने बंदी
  संपूर्ण बंदी (कोणताही अपवाद नाही)
  प्रदेशानुसार वेगळे कायदे
  माहिती उपलब्ध नाही

गर्भपात हा अनेक समाजांमध्ये मोठा वादग्रस्त मुद्दा आहे. पारंपारिक विचारांचे लोक गर्भपाताला तीव्र विरोध दर्शवतात तर उदारमतवादी लोकांच्या मते गर्भपाताचा निर्णय घेण्याची स्त्रीला संपूर्ण मुभा असावी. जगात अनेक देशांमध्ये गर्भपाताला कायदेशीर मान्यता आहे परंतु तो व्यावसायिक डॉक्टरकडूनच घडवून घेणे बंधनकारक आहे.

भारतातील कायदे

भारतामध्ये गर्भपात कायदेशीर आहे. परंतु लिंगतपासणी करून (पालकांना हव्या त्या लिंगाचे बालक नसले तर) गर्भपात करणे हा शिक्षापात्र गुन्हा (दहा हजार रुपये दंड व/किंवा पाच वर्षे तुरुंगवास) आहे. असे असूनही अनेक लहान व अविकसित गावांमध्ये सर्रासपणे अवैध रित्या लिंगतपासणी केली जाते. तसेच मूल होऊ नये म्हणून एखादे जोडपे कुटुंब नियोजनाच्या पद्धती वापरतात. परंतु त्या पद्धती अपयशी झाल्याने गर्भधारणा राहते. एखादी विधवा किंवा कुमारिका अतिप्रसंगाने गर्भवती होते. अशावेळी अशिक्षित किंवा वैदूकडून गर्भपात करवून घेतला जातो. त्यामुळे स्त्रियांच्या जीवास धोका होऊन बरेचदा स्त्रिया प्राणास मुकत असतात. पूर्वी भारतात गर्भपातास कायद्याने मान्यता नव्हती. त्यामुळे हजारो माता गर्भपातामुळे मुत्युमुखी पडत. यावर उपाय म्हणून वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ केला गेला व तो १ एप्रिल, इ.स. १९७२ रोजी लागू झाला.

वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१

वैद्यकीय गर्भपात कायदा इ.स. १९७१ अंतर्गत पुढील प्रकरणी वैद्यकीय गर्भपाताची मुभा आहे.

  1. जर गर्भधारणा सुरू ठेवल्यामुळे गरोदर स्त्रीच्या जीवाला धोका उदभवत असेल, तिला गंभीर मानसिक किंवा शारिरिक इजा पोहोचण्याची शक्यता असेल.
  2. गर्भात वाढणाऱ्या अर्भकाला गंभीर शारिरिक मानसिक इजा, व्यंग येण्याची शक्यता असेल.
  3. अशा परिस्थितीत गरोदर स्त्रीच्या संमतीने (सज्ञान असल्यास) किंवा तिचे आई वडील - पालक यांच्या संमतीने (अज्ञान-वय १८ वर्षापेक्षा कमी असल्यास ) शासकीय रुग्णालय किंवा शासनमान्य रुग्णालयात आवश्यक पद्धतीने वैद्यकीय गर्भपात करता येईल. गर्भधारणेचा कालावधी १२ आठवडयापेक्षा कमी असल्यास एक नोंदणीकृत वैद्यकीय चिकित्सक आणि कालावधी १२ आवडयापेक्षा जास्त व २० आठवडयापेक्षा कमी असल्यास दोन नोंदणीकृत चिकित्सकांचे मत असणे आवश्यक आहे. या कायद्याअंतर्गत खालील प्रकरणी देखिल गर्भपाताची मुभा देण्यात आलेली आहे.
  4. बलात्कारामुळे झालेल्या गर्भधारणेमुळे मानसिक आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते.
  5. संतती नियमानासाठी वापरलेल्या साधनांच्या अपयशामुळे झालेली गर्भधारणा.
  • या कायद्या अंतर्गत २० आठवडयापेक्षा जास्त कालावधी असल्सास गर्भपाताला मंजुरी नाही. नोंदणीकृत चिकित्सकाच्या मते संबंधित स्त्रीचा जीव वाचविण्यासाठी तातडीने गर्भपात करणे गरजेचे असेल आणि सद्हेतूने अशी कृती करण्यात आली असेल तर या कायद्याअंतर्गत त्याला कोणतेही व्यवधान उत्पन्न होणार नाही परंतु नोंदणीकृत वैद्यकीय चिकित्सक नसलेल्या व्यक्तीने कोणत्याही हेतूने कृती केली तर तो शिक्षेस पात्र राहील.

गर्भपात करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची पात्रता

  • स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र या विषयात पदवी किंवा पदविका
  • सहा महिने प्रसुतिशास्त्र व स्त्री रोग विभागात वैद्यकीय निवासी अधिकाऱ्याचा अनुभव असलेले शासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा खाजगी वैद्यकीय व्यावसायिक.
  • मान्यता प्राप्त वैद्यकीय संस्थेत ६ आठवडयांचे वैद्यकीय गर्भपाताचे प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळविलेले खाजगी किंवा वैद्यकीय चिकित्सक.
  • जागेची तपासणी, शैक्षणिक पात्रता, शस्त्रक्रियागृह व आवश्यक उपकरणांची तपासणी केल्यानंतर अर्ज करणाऱ्या आरोग्य संस्थेला शासनमान्य गर्भपात केंद्राचा दर्जा दिला जातो.

वैद्यकीय गर्भपात नियम १९७५

वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ मधील कालापव्यय करणाऱ्या पद्धती काढून टाकून ही सेवा अधिक तत्परेतेने उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात नियम १९७५ साली बनवण्यात आले.

वैद्यकीय गर्भपात नियम २००३

२००३ साली या कायद्यात अधिक सुधारणा करून वैद्यकीय गर्भपात नियम २००३ तयार करण्यात आले. यात वैद्यकीय गर्भपात केंद्रांना मंजुरी देण्याचे काम राज्य पातळीऐवजी जिल्हा पातळीवर आणण्यात आले. सुरक्षित वैद्यकीय गर्भपात सेवांचे जाळे वाढवण्याचा उद्देश यामागे होता.

भारतामधील गर्भपाताचे आकडे
वर्ष नोंदणी झालेले गर्भपात
१९७२ २४,३००
१९७५ २,१४,१९७
१९८० ३,८८,४०५
१९८५ ५,८३,७०४
१९९० ५,८१,२१५
१९९५ ५,७०,९१४
२००० ७,२३,१४२

संदर्भ

बाह्य दुवे

गर्भपात 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

गर्भपात पद्धतीगर्भपात कायद्यांतर्गत तरतुदीगर्भपात संदर्भगर्भपात बाह्य दुवेगर्भपातगर्भाशयस्त्री

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तुळजाभवानीसायबर गुन्हाराणी लक्ष्मीबाईनीती आयोगऑस्ट्रेलियाबैलगाडा शर्यतकोल्हापूर लोकसभा मतदारसंघसात आसराइन्स्टाग्रामवसंतराव दादा पाटीलडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारजागतिक तापमानवाढवाचनकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघगुप्त साम्राज्यइतर मागास वर्गस्वरपश्चिम महाराष्ट्रआळंदीसलमान खानयोनीनक्षत्रभारताच्या सरन्यायाधीशांची यादीफकिरापुणेदुसरा चंद्रगुप्तकावळाखरबूजईमेलसायाळकुटुंबइराणमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीपोपटलोकसभेचा अध्यक्षगजानन महाराजदशावतारप्राण्यांचे आवाजभारताचे सर्वोच्च न्यायालयस्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)वाल्मिकी ऋषीइ-बँकिंगराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)अग्रलेखसुतकअप्पासाहेब पवारत्रिरत्न वंदनामुंजऋग्वेदजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)मटकातलाठीअमरावतीकृषी विपणनसोळा संस्कारसामवेदअहिल्याबाई होळकरअशोकाचे शिलालेखसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीराकेश बापटधर्मनिरपेक्षताबाबा आमटेगोंधळकाळाराम मंदिरऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघअकलूजस्वादुपिंडकार्ल मार्क्सइतिहाससोलापूर जिल्हाभारताचे राष्ट्रपतीइंदुरीकर महाराजपंजाबराव देशमुखप्रार्थना समाजआर्थिक विकासपर्यटन🡆 More