इबोला

इबोला विषाणू रोग (ईव्हीडी) किंवा इबोला रक्तस्त्रावी ताप (ईएचएफ) (संक्षिप्त नाव: एबोला, इबोला) हा मनुष्य व इतर सस्तन प्राण्यांना होणारा एक रोग आहे.

हा रोग एबोला नावाच्या विषाणूची लागण झाल्यामुळे होतो. ताप, घसादुखी, स्नायूदुखी, उलट्या इत्यदी एबोला रोगाची लक्षणे विषाणूबाधा झाल्याच्या दोन दिवस ते ३ आठवड्यांदरम्यान दिसू लागतात. त्यानंतर ६ ते १६ दिवसांत रोगी मृत्यूमुखी पडण्याची शक्यता आहे. हा रोग संसर्गजन्य असून एका मनुष्याद्वारे दुसऱ्यामध्ये पसरू शकतो. एबोला रोगावर सध्या कोणताही अधिकृत उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, प्रादुर्भाव झालेल्या प्राणी व माणसांना अन्य प्राणी व माणसांपासून वेगळे ठेवत प्रचंड काळजी घ्यावी लागते.

इबोला
वर्गीकरण व बाह्यदुवे
इबोला
आय.सी.डी.-१० A98.4
आय.सी.डी.-९ 065.8
मेडलाइनप्ल्स 001339
इ-मेडिसिन med/626
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D019142


इबोला
इबोलाची काही लक्षणे
इबोला
इबोला विषाणू

ह्या विषाणूचा शिरकाव एखाद्या बाधित प्राण्याच्या (सामान्यत: माकडे किंवा वटवाघळे) रक्त किंवा शारीरिक द्रवपदार्थ यांच्याशी संपर्काद्वारे होतो. नैसर्गिक वातावरणात हवेतून पसरण्याबद्दल अद्याप खात्री नाही. बाधित नसताना देखील वटवाघळे हा विषाणू वाहून नेऊ शकतात आणि पसरवू शकतात असे मानले जाते. मानवी संसर्ग झाल्यानंतर मात्र, हा रोग लोकांमध्ये देखील पसरू शकतो.

बाधित माकडे आणि रुग्णांपासून माणसांमध्ये या रोगाचा फैलाव कमी करणे याचा प्रतिबंधात समावेश होतो. अशा प्राण्यांना संसर्गासाठी तपासून आणि जर रोग आढळला तर त्यांना मारून आणि त्यांचे शरीर व्यवस्थित नष्ट करून हे केले जाऊ शकते. मांस व्यवस्थित शिजवणे आणि मांस हाताळताना संरक्षणात्मक कपडे घालणे, तसेच रोग्याच्या आसपास असताना संरक्षणात्मक कपडे घालणे आणि हात धुणे हे सुद्धा उपयोगी ठरू शकते.

एबोला रोगाला उच्च मृत्यूदर आहे: विषाणूने बाधित झालेले 50% ते 90% बऱ्याचदा मृत्यू पावतात. ईव्हीडीची ओळख १९७६ साली पहिल्यांदा आफ्रिका खंडातील सुदान आणि झैर येथे झाली. तेव्हापासून २०१३ पर्यंत आफ्रिकेमध्ये एबोलाचे १,७१६ व्यक्तींना एबोलाची बाधा झाली होती.

२०१४ इबोला साथ

२०१४ साली प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेमधील गिनी, लायबेरियासियेरा लिओन ह्या देशांमध्ये तसेच नायजेरियामध्ये एबोलाची तीव्र साथ आली असून या वर्षी एबोलाचे २०,०८१ रुग्ण आढळून आले. ह्यांपैकी ७,८४२ रुग्ण एबोलामुळे मरण पावले आहेत. या वर्षी ह्या रोगाची लागण झालेल्या सहा व्यक्ती माली देशात व एक व्यक्ती अमेरिकेत दगावली. स्पेन या प्रगत देशामध्ये देखील या रोगाचा रुग्ण आढळून आल्यामुळे जागतिक आरोग्य आणिबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या रोगाचा प्रादुर्भाव वेळीच रोखला नाही तर दर आठवड्याला १० हजार नवे रुग्ण ह्या वेगाने एबोलाची साथ वाढेल असा इशारा विश्व स्वास्थ्य संस्थेने दिला आहे.

आकडे

लागण / मृत्यू (१२ ऑक्टोबर २०१५)

संदर्भ

बाह्य दुवे

इबोला 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इबोला २०१४ साथइबोला संदर्भइबोला बाह्य दुवेइबोलातापरोगविषाणू

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संयुक्त महाराष्ट्र चळवळमहाराष्ट्र पोलीसनैसर्गिक पर्यावरणबुद्धिमत्ताभारतीय पंचवार्षिक योजनादिशाखंडोबाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रशिवा (मालिका)रामराणी लक्ष्मीबाईतुतारीमौर्य साम्राज्यफणसमांजरनवनीत राणामृत्युंजय (कादंबरी)व्यवस्थापनबडनेरा विधानसभा मतदारसंघमीठमहाराष्ट्रातील घाट रस्तेशरीफजीराजे भोसलेमराठा घराणी व राज्येविष्णुअर्जुन पुरस्कारमराठी साहित्यपर्यावरणशास्त्रकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघहातकणंगले लोकसभा मतदारसंघबिबट्याअर्थशास्त्रचिकुनगुनियारायगड लोकसभा मतदारसंघराज्यशास्त्रहिंदू धर्मअष्टविनायककासारमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीअभिव्यक्तीपाऊसशनिवार वाडापुणे जिल्हाकेदारनाथ मंदिरवर्धा लोकसभा मतदारसंघभारतीय संस्कृतीसंवादिनीकर्करोगउष्माघातपुणे लोकसभा मतदारसंघडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारबहावामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभारत छोडो आंदोलनकांजिण्यासप्तशृंगी देवीभारताची अर्थव्यवस्थादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघउपभोग (अर्थशास्त्र)अक्षय्य तृतीयाभूगोलप्रीमियर लीगइंडियन प्रीमियर लीगनाटकहिंदू विवाह कायदादक्षिण दिशामुहूर्तभारताचे उपराष्ट्रपतीभारताचे पंतप्रधानशेतकरीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)रमाबाई आंबेडकरमराठी भाषा गौरव दिनविहीररावेर लोकसभा मतदारसंघहॉकीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळखरबूज🡆 More