अँड्रॉईड

अँड्रॉईड (इंग्रजी: Android) ही मोबाईल फोनसाठी गूगल कंपनीने विकसित केलेली एक संचालन प्रणाली आहे. ही संचालन प्रणाली लिनक्सवर आधारभूत आहे. गूगलने ही प्रणाली लिनक्सप्रमाणे ठेवण्याचे जाहीर केले आहे. जावा प्रोग्रॅमिंग भाषेसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळाले आहे. २१ ऑक्टोबर २००८ला प्रारंभिक आवृत्ती प्रदर्शित करण्यात आली. सध्या ९ डिसेंबर २०१३ रोजी ४.४.२ (जेली बीन) ही आवृत्ती प्रकाशित करण्यात आली आहे. आता मोबाईल पाठोपाठ टॅबलेट पी.सी. साठीही अँड्रॉईड लोकप्रिय होत आहे. वापरकर्त्यांच्या संख्येच्या दृष्टीने आयफोन (आयओएस) खालोखाल दुसरा क्रमांक लागतो. नोकिया, ब्लॅकबेरी ह्या मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्या वगळता जगभरातील जवळजवळ सर्व मोठ्या मोबाईल फोन उत्पादकांनी (सॅमसंग, एलजी, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एचटीसी, डेल, इत्यादी) चालणारे स्मार्टफोन व टॅबलेट पी.सी. तयार केले आहेत.

ॲंड्रॉईड
अँड्रॉईड
ॲंड्रॉईड (संचालन प्रणाली)
ॲंड्रॉईड (संचालन प्रणाली)
मूळ लेखक गूगल, ओपन हॅन्डसेट अलायन्स
विकासक गूगल
प्रारंभिक आवृत्ती २१ ऑक्टोबर २००८
सद्य आवृत्ती ८.१ (ओरिओ)
(५ डिसेंबर २०१७)
सद्य अस्थिर आवृत्ती ॲंड्रॉईड पी (Android P)
प्रोग्रॅमिंग भाषा सी, सी++, जावा
स्रोत पद्धती मिश्र (मुक्तस्त्रोत आणि गुप्तस्त्रोत)
प्लॅटफॉर्म ३२ आणि ६४ बिट ए.आर.एम, x८६ आणि x८६-६४
भाषा इंग्लिश (प्रमुख), १००+ (भाषांतरीत)
सॉफ्टवेअरचा प्रकार मोबाईल संचालन प्रणाली
सॉफ्टवेअर परवाना अपाचे २.०, ग्नू जीपीएल २.० (लिनक्स गाभा आणि त्यामधील बदलांसाठी)
संकेतस्थळ ॲन्ड्रॉइड.कॉम
अँड्रॉईड
गॅलेक्सी नेक्सस

इ.स. २०१० च्या शेवटी अँड्रॉईड कार्यप्रणाली जगातील सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याद्वारे आधी सुमारे १० वर्षे अधिपत्य गाजवणाऱ्या नोकियाच्या सिंबियन कार्यप्रणालीचे वर्चस्व संपले. कॅनालिस (Canalys) या रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार इ.स. २०१० च्या शेवटी जगभरातून अँड्रॉईड ३३% स्मार्टफोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% स्मार्टफोन विकले गेले.

अँड्रॉईड मुक्त स्रोत असल्यामुळे अँड्रॉईड विकास करण्यासाठी जगभरात खूप मोठ्या संख्येत विकासकांचा समुदाय आहे. अँड्रॉईड फोनसाठी आतापर्यंत २,००,००० पेक्षा जास्त उपयोजने (ऍप्स) उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य उपयोजने मोफत आहेत.

आवृत्त्या

गूगलतर्फे अधिकृतरित्या ग्राहकांसाठी वितरीत केलेल्या अथवा करणार असणाऱ्या अँड्रॉईड आवृत्त्यांची यादी.

नाव आवृत्ती प्रकाशनाची तारीख सद्यस्थिती
कोणतेही सांकेतिक नाव नाही १.० २३/०९/२००८ कालबाह्य
पेटीट फ़ोर १.१ ०९/०२/२००९ कालबाह्य
कपकेक १.५ २७/०४/२००९ कालबाह्य
डोनट १.६ १५/०९/२००९ कालबाह्य
इक्लेअर २.० ते २.१ २६/१०/२००९ कालबाह्य
फ्रोयो २.२ ते २.२.३ २०/०५/२०१० कालबाह्य
जिंजरब्रेड २.३ ते २.३.७ ०६/१२/२०१० कालबाह्य
हनीकोंब ३.० ते ३.२.६ २२/०२/२०११ कालबाह्य
आइस्क्रीम सॅन्‍डविच ४.० ते ४.०.४ १८/१०/२०११ कालबाह्य
जेली बीन ४.१ ते ४.३.१ ०९/०७/२०१२ कालबाह्य
किटकॅट ४.४ ते ४.४.४ ३१/१०/२०१३ कालबाह्य
लॉलीपॉप ५.० ते ५.१.१ १२/११/२०१४ कालबाह्य
मार्शमॅलो ६.० ते ६.०.१ ०५/१०/२०१५ समर्थित
नौगट ७.० ते ७.१.२ २२/१०/२०१६ समर्थित
ओरिओ ८.० ते ८.१ २१/१०/२०१७ समर्थित
पाई ९.० ते - ०६/१०/२०१८ अंतर्गत विकास आवृत्ती

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

अँड्रॉईड आवृत्त्याअँड्रॉईड हे सुद्धा पहाअँड्रॉईड संदर्भअँड्रॉईड बाह्य दुवेअँड्रॉईड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आदिवासीदीपक सखाराम कुलकर्णीराजाराम भोसलेबाबासाहेब आंबेडकरनारळहिंदू कोड बिलगजानन दिगंबर माडगूळकरनगर परिषदविशेषणयूट्यूबलहुजी राघोजी साळवेभारतीय राष्ट्रीय काँग्रेससातव्या मुलीची सातवी मुलगीनरेंद्र मोदीधुळे लोकसभा मतदारसंघक्षय रोगविधानसभामहाराष्ट्रातील किल्लेलेस्बियनशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीरॉयल चॅलेंजर्स बंगलोररमाबाई आंबेडकरमुखपृष्ठसातवाहन साम्राज्ययशस्वी जयस्वालरामटेक लोकसभा मतदारसंघमांजरमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीचिपको आंदोलनदशावतारकापूसवाचनचैत्र पौर्णिमामटकाबावीस प्रतिज्ञावेदकुंभ रासअमरावतीरक्षा खडसेखरबूजपांढर्‍या रक्त पेशीभाऊराव पाटीलहळदसौर ऊर्जाराममहाराष्ट्र केसरीधर्मनिरपेक्षताजंगली महाराजसम्राट अशोक जयंतीमिठाचा सत्याग्रहवसंतराव नाईकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननैसर्गिक पर्यावरणनांदेडभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसमाजशास्त्रकन्या रासनीती आयोगसंत जनाबाईतमाशाताज महालबाळशास्त्री जांभेकरभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकोरफडबौद्ध धर्मत्रिपिटकभारतातील सण व उत्सवकालभैरवाष्टककुलदैवतप्रसूतीपारनेर विधानसभा मतदारसंघशनिवार वाडाखो-खोआत्मविश्वास (चित्रपट)सविनय कायदेभंग चळवळदत्तात्रेयबारामती विधानसभा मतदारसंघमादीची जननेंद्रियेआणीबाणी (भारत)🡆 More