पाकिस्तान: आशिया खंडातील देश

पाकिस्तान एक देश असून , भारताच्या वायव्य सिमेवरील देश आहे.

पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून, पाकिस्तानात चार सुभे (परगणा) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानाची राजधानी तर कराची हे सर्वात मोठे शहर आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सुमारे १६ कोटी असून लोकस॓ख्येच्या बाबतीत पाकिस्तानचा सहावा क्रमांक लागतो. इंडोनेशिया पाठोपाठ जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या पाकिस्तानमध्ये आढळते. बोलीभाषा, वंश, भूगोल, वन्यप्राणी यात प्रचंड विविधता पाकिस्तानात आढळते. पाकिस्तान हा एक विकसनशील देश असून, उद्योगीकरण हे उर्जितावस्तेत आहेत. लष्करी राजवट, राजकीय अस्थिरता, शेजारी भारतासोबत असलेले क्रमांकाव संबंध यामुळे सतत अस्थिरतेला पाकिस्तानी जनतेला सामोरे जावे लागले. देश अजूनही गरिबी, दारिद्र्य, निरक्षरता आणि भ्रष्टाचार अशा समस्यांशी झगडत आहे.

पाकिस्तान
اسلامی جمہوریۂ پاکستان
Islamic Republic of Pakistan
पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: ईमान, इत्तेहाद, तन्जिम
(इमान, ऐक्य आणि शिस्त)
राष्ट्रगीत: क़ौमी तराना
पाकिस्तानचे स्थान
पाकिस्तानचे स्थान
पाकिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी इस्लामाबाद
सर्वात मोठे शहर कराची
अधिकृत भाषा उर्दू, इंग्लिश
इतर प्रमुख भाषा -
 - राष्ट्रप्रमुख ममनून हसन
 - पंतप्रधान इम्रान खान
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश इफ्तिकार चौधरी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (युनायटेड किंग्डमपासून)
ऑगस्ट १४, इ.स. १९४७ 
 - प्रजासत्ताक दिन मार्च २३, इ.स. १९५६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८,८०,२५४ किमी (३४वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.१
लोकसंख्या
 -एकूण २०,४०,१३,५०० (६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २११/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ४०४.६ अब्ज अमेरिकन डॉलर (२६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,६२८ अमेरिकन डॉलर (१२८वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन पाकिस्तानी रुपया (PKR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पाकिस्तानी प्रमाणवेळ (PST) (यूटीसी +५:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ PK
आंतरजाल प्रत्यय .pk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

पाकिस्तानी सैन्य हे जगातील सातव्या क्रमांकाचे मोठे सैन्य आहे. पाकिस्तान हे एक स्वघोषित अण्वस्त्रसज्ज राष्ट्र घोषित झाले असून अण्वस्त्रसज्जता असलेले हे मुस्लिम जगतातील पहिले आणि एकमेव राष्ट्र असून, दक्षिण आशियातील दुसरे राष्ट्र आहे. पाकिस्तान हे अमेरिकेचे नाटोबाहेरील मित्रराष्ट्र आहे आणि चीनसोबत राजनैतिक मित्रसंबंध आहेत. पाकिस्तान हे इस्लामिक व्यवस्थापन संघटनेचे (सध्याची इस्लामिक सहयोग संघटना) जनक राष्ट्र आहे. पाकिस्तान संयुक्त राष्ट्रे, राष्ट्रकुल आणि जी-२० संघटनांचे सदस्य आहे. आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश होय. सुरुवातीला भारताचाच एक भाग असलेला भूप्रदेश 1947ला विभागला गेला आणि भारत आणि पाकिस्तान असे दोन राष्ट्र निर्माण झाली.एक स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र म्हणून पाकिस्तानची ओळख निर्मााण झालेली आहे

भारतीय पंतप्रधानांचे पाकिस्तान दौरे

  • जवाहरलाल नेहरू : १९५३ (काश्‍मीर मुद्यावर चर्चेसाठी)
    • १९६० (सिंधू पाणीवाटप करार)
  • राजीव गांधी : १९८८ (सार्क परिषदेसाठी)
    • १९८९ (द्विपक्षीय चर्चेसाठी)
  • अटलबिहारी वाजपेयी : १९९९ (लाहोर-दिल्ली बससेवेच उद्घाटन )
    • २००४ (सार्क परिषदेसाठी)
  • नरेंद्र मोदी : २०१५ (अनौपचारिक भेट)

इतिहास

कालानुक्रमे भारतातील साम्राज्ये, हखामनी साम्राज्य (इराण), खिलाफत, मंगोल, मुघल,मराठा साम्राज्य, दुराणी साम्राज्य, शीख आणि ब्रिटिश वसाहत यांची पाकिस्तानावर सत्ता होती. इ.स. १९४७ मध्ये पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली झाली. भारतीय स्वातंत्र्यलढयाच्याशेवटी ब्रिटिश भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या मुस्लिमबहुल स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली, भारताच्या वायव्येला पश्चिम पाकिस्तान आणि पूर्वेला पूर्व पाकिस्तान यांचा मिळून पाकिस्तान देश बनला. हे दोन्ही विभाग भौगोलिकदृष्ट्या मध्ये असलेल्या भारतामुळे विलग झाले होते. इ.स. १९६५ मध्ये पाकिस्तानच्या राज्यघटनेला जनमान्यता मिळाल्यानंतर पाकिस्तान हे इस्लामी प्रजासत्ताक झाले. इ.स. १९७२ मध्ये सशस्त्र क्रांतीनंतर पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली.

नावाची व्युत्पत्ती

पाकिस्तान हा शब्द पाक (अर्थ: पवित्र) व स्तान (अर्थ: भूमी) या दोन उर्दू शब्दां‍चा संधी आहे. इ.स. १९३३ मध्ये चौधरी रहमत अली, पाकिस्तान चळवळीचे सदस्य, यांनी प्रकाशित केलेल्या, नाऊ ऑर नेव्हर या नावाने परिचित असलेल्या प्रसिद्धिपत्रकात सर्वप्रथम पाकस्तानची मागणी केली गेली. पाकस्तान हा शब्द पंजाब, अफगाण प्रांत, काश्मीर, सिंध आणि बलुचिस्तान या प्रांतांच्या नावांमधील अक्षरांवरून निर्माण झाला. भाषेच्या नियमांमुळे आणि बोलण्याच्या सोयीसाठी त्या दोन घटकशब्दांत हा स्वर घालण्यात आला.

भूगोल

चतुःसीमा

पाकिस्तानच्या पूर्वेला भारत, वायव्येला अफगाणिस्तान, नै‌ऋत्येला इराण, ईशान्येला चीन आहे. पाकिस्तानच्या उत्तरेचा ताजिकिस्तान त्याला वाखानच्या भूभागाने जोडला गेला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेला अरबी समुद्र व ओमानचे आखात असून देशाला १०४६ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पाकिस्तान देश ओमानशी सागरी सरहद्दीने जोडलेला आहे. पाकिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या दक्षिण आशिया, मध्य आशिया आणि मध्यपूर्व आशिया यांच्यामधल्या अत्यंत महत्त्वाच्या जागेवर आहे. आधुनिक पाकिस्तान हे नवपाषाण युग (नियोलिथिक) मेहरगढ़ आणि कांस्य युग सि॓धू संस्कृती याचा मिलाप आहे. याशिवाय वेळोवेळी झालेल्या आक्रमणांमुळे आणि वसाहतींमुळे पाकिस्तानात, हि॓दू, पर्शिअन, इंडो-ग्रीक, इस्लामिक, तुर्की-मंगोल, अफगाणी आणि शीख संस्कृतींचा प्रभाव आढळतो. पाकिस्तानचा भूभाग नेहमीच वेगवेगळ्या राजवटी आणि साम्राज्यांचा हिस्सा राहिला आहे.

राजकीय विभाग

पाकिस्तान चार प्रशासकीय विभागांमध्ये विभागलेले आहे; पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान, तसेच राजधानी प्रदेश आणि केंद्रीय अखत्यारीतील आदिवासी प्रदेश ज्यात सीमावर्ती भागाचा समावेश आहे. पाकिस्तानी सरकारचे वादग्रस्त पश्चिमी काश्मीर भागावर, जे आझाद काश्मीर आणि गिलगीट-बाल्टिस्तान या दोन विभागात विभागलेले आहे, आभासी सरकार आहे. गिलगीट-बाल्टिस्तान भागाला प्रांताचा दर्जा देत २००९ मध्ये हा प्रांत स्वयंशासित केला गेला.

स्थानिक पातळीवर प्रशासकीय संस्था तीन पातळ्यांवर विभागलेली आहे, जिल्हे, तालुका आणि गाव पातळी (Union councils).

मोठी शहरे

समाजव्यवस्था

संस्कृती

शासन आणि राजकारण

पाकिस्तान एक लोकशाहीवादी संसदीय संघीय प्रजासत्ताक आहे, इस्लाम हा राष्ट्राचा धर्म आहे. सर्वप्रथम इ.स. १९५६ मध्ये संविधान स्विकारले गेले पण १९५८ मध्ये जनरल यांनी ते रद्दबादल केले. इ.स. १९७३ मध्ये स्विकारलेले संविधान झिया-उल-हक यांनी पुन्हा इ.स. १९७७ मध्ये रद्द केले. इ.स. १९८५ मध्ये पुनर्जिवीत केलेली संविधानची प्रत ही देशातील अत्यंत महत्त्वाची आणि मुलभूत कायदेपत्रिका आहे. पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात पाकिस्तानी लष्कराणे मुख्य प्रवाहातील राजकारणात प्रभावशाली भूमिका निभावली आहे. ९५८-१९७१, १९७७-१९८८ आणि १९९९-२००८ या कालखंडात लष्कराणे सत्ता काबीज करून लष्करी राजवट लागू केली व लष्करी अधिकारी राष्ट्रपती म्हणून काम करू लागले. आज पाकिस्तानकडे बहुपक्षीय संसदीय प्रणाली आहे ज्यात शासनाच्या शाखांमध्ये शक्ती स्पष्ट विभाजन आहे. पहिला यशस्वी लोकशाही सत्तांतर मे २०१३ मध्ये झाला. पाकिस्तानमधील राजकारण मुख्यत्वेकरून समाजसुधारणा, रूढीतत्त्ववाद आणि तिसरा मार्ग असलेल्या विचारांचा मिश्रित असलेला एक स्वयंनिर्मित  सामाजिक तत्त्वज्ञान आहे. २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे, देशाच्या तीन मुख्य राजकीय पक्षांमध्ये: पुराणमतवादी पक्ष मुस्लिम लीग-एन; डावा आणि समाजवादी पक्ष पीपीपी; आणि तिसरा पर्याय म्हणून पाकिस्तान मुव्हमेंट फ़ॉर जस्टिस (पीटीआय) आहे. इम्रान खान हे सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.

लष्कर

जगात पाकिस्तानी लष्कराचा सातवा क्रमांक लागतो. पायदळ, नौसेना आणि वायुदल हे प्रमुख विभाग असून अंतर्गत सुरक्षा आणि सीमावर्ती टेहाळणीसाठी निमलष्करी दलाचा वापर केला जातो. नॅशनल कमांड ऑथोरिटी ही संस्था लष्करभरती, प्रशिक्षण, आण्विक शस्त्रनिर्मिती करणाऱ्या संस्थांचा विकास तसेच पाकिस्तानी आण्विक कार्यक्रम यांच्या नियोजनासाठी जबाबदार आहे.

अर्थतंत्र

पाकिस्तान एक विकसनशील देश मानला जातो आणि "नेक्स्ट इलेव्हन", या अकरा देशांच्या गटामध्ये मोजला जातो जो BRICS (ब्राझील, रशिया, भारत, चायना आणि दक्षिण आफ्रिका) सोबत 21 व्या शतकात जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची उच्च क्षमता ठेवतो.

अलिकडच्या काळात, अनेक दशकांच्या सामाजिक अस्थिरते मुले, २०१३ मध्ये, स्थूलता आणि असंतुलित मॅक्रोइकॉनॉमिक्स मधील मूलभूत सेवा जसे की रेल्वे वाहतूक आणि विद्युत उर्जा निर्मितीची गंभीर कमतरता विकसित झाली आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला अर्धउद्योगयुक्त मानले जाते जिच्या प्रगतीचे केंद्र हे सिंधू नदीच्या काठावर असलेले प्रदेश आहेत. विविध प्रकारच्या अर्थव्यवस्थांच्या कराची आणि पंजाबच्या शहरी केंद्रासोबत कमी विकसित बलुचिस्तान सारखे प्रदेश या देशात आहेत. आर्थिक गुंतागुंत निर्देशांकानुसार, पाकिस्तान हा जगातील ६७ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्यात करणारी अर्थव्यवस्था आहे आणि १०६ व्या क्रमांकाचे सर्वात जटिल अर्थव्यवस्था आहे. २०१५-१६ च्या आर्थिक वर्षात पाकिस्तानची निर्यात २०.८१  अब्ज अमेरिकी डॉलर होती आणि आयात ४४.७६ अब्ज अमेरिकी डॉलर होती, परिणामी २३.९६ अब्ज अमेरिकी डॉलरचा नकारात्मक व्यापार शिल्लक राहिला.

पाकिस्तान नैसर्गिक वस्तूंचे सर्वात मोठे उत्पादक देश आहे, आणि त्याचे श्रमिक बाजार जगातील दहाव्या क्रमांकावर आहे. ७ कोटी रुपयांचे अनिवासी पाकिस्तानी यांनी  २०१५-१६ मध्ये अर्थव्यवस्थेत १९.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे योगदान दिले. पाकिस्तानला पैसे पाठविणारे प्रमुख स्रोत म्हणजे संयुक्त अरब अमिरात, अमेरिका, सौदी अरेबिया, आखाती देश (बहरीन, कुवैत, कतार, ओमान); ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, युनायटेड किंग्डम, नॉर्वे, आणि स्वित्झर्लंड. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मते, संपूर्ण जगभरातील निर्यातीचा पाकिस्तानचा वाटा कमी होत आहे; २००७ मध्ये तो केवळ ०.१२८ % एवढा होता.

खेळ

पाकिस्तान: भारतीय पंतप्रधानांचे पाकिस्तान दौरे, इतिहास, भूगोल 
२००८ ऑलिम्पिक खेळात पाकिस्तानचा हाॅकी संघ

हॉकी हा पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ असून क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. इ.स. १९९२ मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानने दुसरे स्थान पटकावले. इ.स. १९८७ आणि इ.स. १९९६ मध्ये पाकिस्तानने यजमानपद भूषविले. इ.स. २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रथमच खेळल्या गेलेल्या आयसीसी ट्वेंटी-२० विश्वकरंडकामध्ये उपविजतेपद पटकावले, इ.स. २००९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी ट्वेंटी-२० विश्वकरंडकामध्ये पाकिस्तान विजेते ठरले. दहशतवादाच्या सावटाखाली जगभरातील क्रिकेट संघांनी पाकिस्तान जाणे सुरक्षित न समजल्याने पाकिस्तानी क्रिकेट विश्वाला खूप मोठी किंमत चुकवावी लागली. इ.स. २००९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकन क्रिकेट संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे कोणत्याही क्रिकेट संघाने पाकिस्तान दौरा केलेला नाही.

जागतिक पातळीवर जहांगीर खान आणि जानशेर खान यांनी अनेक वेळा स्क्वाश विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. जहांगीर खान यांनी दहा वेळा ब्रिटिश ओपन जिंकून विश्वविक्रम स्थापन केला आहे. किरण खान यांनी जलतरण आणि ऐसम-उल्-हक कुरेशी यांनी टेनिसमध्ये जागतिक पातळीवर नैपुण्य प्रदर्शित केले आहे. पाकिस्तानने ऑलिंपिक खेळांमध्ये हॉकी, मुष्टियुद्ध, अ‍ॅथलेटिक्स, जलतरण आणि नेमबाजीमध्ये भाग घेतलेला आहे.

पाकिस्तानवरील पुस्तके

  • अल् काईदा ते तालिबान |अनुवादित, मूळ लेखक - सईद सलीम शाहजाद; मराठी अनुवाद - अरविंद गोखले)
  • असाही पाकिस्तान (अरविंद गोखले)
  • आके पाक (अरविंद गोखले)
  • कारगिल : अनपेक्षित धक्का ते विजय (वेदप्रकाश मलिक)
  • कारगिल : एका सैनिकाची रोजनिशी (मूळ इंग्रजी, लेखक हरिंदर बवेजा; मराठी अनुवादक - चंद्रशेखर मुरगुडकर)
  • काश्मीरची ५००० वर्षे (मूळ इंग्रजी, लेखक बलराज पुरी; मराठी अनुवादक - संजय नहार/प्रशांत तळणीकर)
  • कुंपणापलीकडला देश पाकिस्तान (मनीषा टिकेकर)
  • चिनारच्या ज्वाळा (मूळ इंग्रजी, लेखक शेख अब्दुल्ला; मराठी अनुवादक - सुवर्णा बेडेकर)
  • ज्वालाग्राही पाकिस्तान ((मूळ इंग्रजी, लेखक एम.जे. अकबर; मराठी अनुवादक - रेखा देशपांडे)
  • ट्रेन टु पाकिस्तान (मूळ इंग्रजी, लेखक [[खुशवंतसि; मराठी अनुवादक - अनिल किणीकर)
  • पाकिस्तानची घसरण (निळू दामले)
  • पाकिस्तानची राज्यघटना (त्र्यं.र. देवगिरीकर)
  • पाकिस्ताननामा (अरविंद गोखले)
  • भुत्तो, रक्तरंजित कहाणी (मूळ लेखिका फातिमा भुत्तो; मराठी अनुवादक चिंतामणी भिडे)
  • युद्ध आणि शांतताकाळातील भारत पाकिस्तान (मूळ इंग्रजी, लेखक जे.एन. दीक्षित; मराठी अनुवादक सुवर्णा बेडेकर)
  • राजतरंगिणी (मूळ संस्कृत, लेखक पंडित कल्हण; मराठी अनुवादक अरुणा ढेरे/प्रशांत तळणीकर)
  • सिंधची दर्दभरी कहाणी (मूळ इंग्रजी, लेखक के.आर. मलकानी; मराठी अनुवादक अशोक पाध्ये)

Tags:

पाकिस्तान भारतीय पंतप्रधानांचे दौरेपाकिस्तान इतिहासपाकिस्तान भूगोलपाकिस्तान समाजव्यवस्थापाकिस्तान शासन आणि राजकारणपाकिस्तान लष्करपाकिस्तान अर्थतंत्रपाकिस्तान खेळपाकिस्तान वरील पुस्तकेपाकिस्तानइंडोनेशियाइस्लामाबादकराचीदारिद्र्यदेशभारतभूगोलभ्रष्टाचारमुस्लिमराजधानीलोकसंख्यावायव्यविकसनशील देशशहर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ड-जीवनसत्त्वअरविंद केजरीवालकीर्तनसुतकराष्ट्रकूट राजघराणेअकोला लोकसभा मतदारसंघआंब्यांच्या जातींची यादीशहाजीराजे भोसलेचिमणीशेतीअष्टमीशिवम दुबेभारतातील शासकीय योजनांची यादीभारतातील घोटाळ्यांची यादीतानाजी मालुसरेईशान्य दिशाराशीस्त्री सक्षमीकरणसीतामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीपाटीलरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमानसशास्त्रनवग्रह स्तोत्रराकेश बापटपोहरादेवीस्वादुपिंडभारतामधील उच्च न्यायालयांची यादीबौद्ध धर्मशिवनेरीचंद्रपूर लोकसभा मतदारसंघनांदेडजीवनसत्त्वरक्तभारतातील शेती पद्धतीलोकगीतगजानन दिगंबर माडगूळकरसदा सर्वदा योग तुझा घडावाभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मरविकांत तुपकरआर्थिक विकासजंगली महाराजमहाराष्ट्रामधील जिल्हेजैन धर्मदूरदर्शनमहात्मा फुलेदशक्रियाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघईमेलअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीशिव जयंतीपुरंदर किल्ला१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धशिवाजी महाराजभारतरत्‍नमहिलांसाठीचे कायदेकरमाळा विधानसभा मतदारसंघपंचांगद्रौपदी मुर्मूखडकवासला विधानसभा मतदारसंघमराठी व्याकरणमराठा आरक्षणफलटण विधानसभा मतदारसंघसायाळतुळजापूरपंचायत समितीसातारा जिल्हाअष्टविनायकपंजाबराव देशमुखराजगृहथोरले बाजीराव पेशवेसहकारी संस्थालहुजी राघोजी साळवेनिवडणूक३३ कोटी देवगोंधळमहाराणा प्रतापसुजात आंबेडकरसंशोधन🡆 More