इराक

इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे.

इराकच्या पूर्वेला इराण (कुर्दिस्तान प्रदेश), दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इराक
جمهورية العراق
Republic of Iraq
इराकचे प्रजासत्ताक
इराकचा ध्वज इराकचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: मौतिनी
इराकचे स्थान
इराकचे स्थान
इराकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बगदाद
अधिकृत भाषा अरबी, कुर्दिस्ताननी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ३ ऑक्टोबर १९३२ 
 - प्रजासत्ताक दिन १४ जुलै १९५८ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,३८,३१७ किमी (५८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.१
लोकसंख्या
 -एकूण ३,१२,३४,००० (३९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ७१.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ११४.१५१ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन इराकी दिनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ IQ
आंतरजाल प्रत्यय .iq
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९६४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

१९७९ ते २००३ सालादरम्यान इराक देशाचे शासन सद्दाम हुसेन ह्या हुकुमशहाच्या ताब्यात होते. २००३ साली अमेरिकेने इराकवर लष्करी कारवाई करून सद्दामची राजवट संपुष्टात आणली. नूरी अल-मलिकी हे इराकचे सध्याचे पंतप्रधान आहेत.

इराकचे क्षेत्रफळ ४,३८,३१७ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या ३,१४,३७,००० एवढी आहे. अरबी व कुर्दिश ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तैग्रिस नदी आणि युफ्रेटिस नदी या दोन नद्यांमधील प्रदेश म्हणून पूर्वी या देशाला 'मेसोपोटेमिया' असे म्हणत.

इराकचे अधिकृत चलन दिनार असून या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खनिज तेलावर अवलंबून आहे. बार्ली हे इराकचे प्रमुख धान्य आहे. खजुराची निर्यात करण्यात इराकचा जगात पहिला क्रमांक लागतो.

इतिहास

ऑटोमन साम्राज्य

इराण, सुमेरिया आणि हडप्पा या तीनही समृद्ध संस्कृती साधारण एकाच कालखंडातल्या (तपासून पाहावे!). त्या काळी इराक(मेसोपोटेमिया) हा सुमेरियन संस्कृतीचा हिस्सा होता. हडप्पाचे लोक सुमेरियन लोकांशी व्यापार करण्यास उत्सुक असत.

इसवी सन १५३४ ते १९१८ या कालखंडात इराकमध्ये ऑटोमन साम्राज्य होते. इ‌‌.स. १९१७मध्ये पहिल्या जागतिक युद्धात, ब्रिटनच्या सेनेने बगदादला वेढा घातला, आणि ऑटोमन साम्राज्यावर विजय मिळवला. ब्रिटिश लोकांनी मेसोपोटेमियामध्ये आपले सरकार स्थापन केले आणि त्या देशाचे नाव इराक असे केले.

इ‌.स. १९२१मध्ये मक्का येथील शरीफ हुसेन बीन अलीच्या, फैजल नावाच्या पुत्राला इराकचा पहिला राजा म्हणून घोषित केले गेले. त्यानंतर दीर्घकाल चाललेल्या हिंसक लढायांनंतर इ‌‌.स. १९३२मध्ये इराक स्वतंत्र झाला. त्यानंतरही ब्रिटनने दुसऱ्या जागतिक महायुद्धात परत इराकवर विजय मिळवून त्याला पारतंत्र्यात ढकलले. शेवटी इसवी सन १९५८मध्ये ब्रिटिशांची सत्ता झुगारून इराक स्वतंत्र झाला.

इराकची समृद्ध संस्कृती

असाही एक काळ होता, की जेव्हा बगदाद हे अब्बासी खलिफांचे केंद्र होते. तेव्हा इराकमधील शहरे खूपच समृद्ध आणि आधुनिक असून उर्वरित जगाने आदर्श मानली होती. येथूनच जगभर व्यापार आणि संस्कृतीचा विस्तार होत होता. अब्बासी खलिफांचा सर्व भर शिक्षण, व्यापार, तंत्रज्ञान आणि सामाजिक सुधारणा यांवर होता. याचा साऱ्या अरब जगतावर चांगला परिणाम होत होता. या मध्ययुगात जेव्हा इराक हे ज्ञानाचे केंद्र होते, तेव्हा युरोपात फक्त मालक आणि गुलाम असत. तेथे लोकांना विविध प्रकारचे भरमसाठ कर द्यावे लागत. याउलट इराक हे अरब जगताचे केंद्र होते, आणि येथे कानाकोपऱ्यात विकासाचे वारे होते.

जेव्हा इराक हा देश ब्रि‌टिशांची वसाहत झाला, तेव्हा हिंदुस्थानप्रमाणेच इराकचीही आंतरिक स्थिती बिघडत गेली. ब्रिटिशांनी इराकची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडवून टाकली. शेवटी जेव्हा इराक ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त झाला, तेव्हानंतर आलेल्या १९८० च्या दशकात मात्र इराकमध्ये सुवर्णयुग अवतरले. तत्कालीन राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांच्या नेतृत्वाखाली इराकने भरपूर प्रगती केली व इराकची गणती जगांतल्या उत्तम देशांत होऊ लागली.या देशात खूप जुनी मशीद आहेत.हे त्याच्या संस्कृतीशी निगडीत आहे.

इराकची स्थिती खालावण्याची कारणे

१. इराकच्या बरबादीचा पाया ब्रिटिशांच्या वसाहतकालात घातला गेला. ब्रिटिशांनी इराक दीर्घकाल आपल्या ताब्यात ठेवले, आणि त्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर पुरेपूर डल्ला मारला. इराकच्या अर्थव्यवस्थेशी स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था निगडित केली, स्वतःच्या देशाला समृद्ध केले आणि इराकची वाताहत केली. हेच दुष्कृत्य इंग्रजांनी हिंदुस्थानात केले होते.

२. इराक हा अमेरिकेचा एकेकाळचा दोस्त होता. अमेरिका आणि इराणमध्ये सन १९७९मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीनंतर शत्रुत्व आले आणि ते जपण्यासाठी अमेरिकेला इराकची मदत होत असे. इराण आणि इराकमध्ये इसवी सन १९८० पासून ते १९८८पर्यंत आखाती युद्ध झाले, त्यावेळी अमेरिका इराकच्या बरोबर होता आणि सद्दाम हुसेनची मदत घेत होता. त्या काळात ब्रिटनही इराकच्या बरोबर असे. पण जेव्हा इराकने कुवेत ताब्यात घेण्यासाठी त्या देशावर स्वारी केली, तेव्हा ब्रिटन आणि अमेरिका दोघेही इराकला शत्रू मानू लागले. या दोन्ही देशांनी इतर काही देशांच्या बरोबरीने इराकी सैन्याशी युद्ध करून त्यांना कुवेतमधून बाहेर हकलले. इराकमध्ये जनसंहारक रासायनिक शस्त्रे आहेत असा अमेरिका आणि ब्रिटन यांना संशय होता. केवळ या संशयावरून अमेरिकेने इराकवर इसवी सन २००३मध्ये हल्ला केला आणि इराकला नेस्तनाबूत केले. अमेरिकन सैन्य इराकमध्ये बरीच वर्षे राहिले आणि त्यामुळे तेथे आतंकवाद बळावला. स्त्रियांची परिस्थिती बिघडत गेली. त्यांच्यामधले शिक्षणाचे प्रमाण ७५ टक्क्यांनी खालावले, आणि ते आणखी कमी कमी होत राहिले. इराकमध्ये कोणतीही संहारक शस्त्रे सापडली नाहीतच, पण सद्दाम हुसेनला मात्र अमेरिकनांनी पकडून ठार मारले.

३. खुद्द सद्दाम हुसेन हे देशाला एकसंघ ठेवण्यात कमी पडले. त्यांना इराकला सुन्नी मुसलमानांचे राज्य बनवावयाचे होते, म्हणून त्यासाठी त्यांची देशात हुकूमशाही चाले. परिणामी इराकमधले शिया मुसलमान आणि कुर्द जमातीचे सुन्नी मुसलमान सद्दामच्या विरोधात गेले. कुर्द हे कुर्दिस्तानचे रहिवासी आहेत. सध्या कुर्दिस्तान हा इराकमधलाच एक अर्ध-स्वायत्त प्रदेश आहे. कुर्दिस्तानची राजधानी इरबिल. इराकच्या सध्याच्या राज्यघटनेनुसार कुर्दिस्तानला बरेच अधिकार आहेत. कुर्द जातीचे लोक कट्टर सुन्नी असून बंजारा जमातीचे आहेत. ही जमात तुर्कस्थानच्या आग्नेय भागात, सीरियाच्या ईशान्य भागात आणि इराण-इराकच्या पश्चिम भागातही आहे. इराकमध्ये कुर्दांची लोकसंख्या जवळजवळ ४० लाख आहे. त्यांना इराकपासून फुटून स्वतंत्र कुर्दिस्तान स्थापायचा आहे.

सद्दाम हुसेन आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये कधीही समजूतदारपणा दाखवत नसत. सद्दामनंतर आलेल्या शिया सरकारनेही सुन्नी मुसलमान जनतेकडे दुर्लक्ष केले, आणि परिस्थिती आणखीनच बिघडत गेली.

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतुःसीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

अल्लप्पो.

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

Tags:

इराक इतिहासइराक भूगोलइराक समाजव्यवस्थाइराक राजकारणइराक अर्थतंत्रइराकइराणकुर्दिस्तानकुवेतजॉर्डनतुर्कस्तानदेशबगदादमध्यपूर्वसीरियासौदी अरेबिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ढेकूणबुलढाणा लोकसभा मतदारसंघविष्णुक्रियापदसंधी (व्याकरण)ज्ञानपीठ पुरस्कारराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)महाराष्ट्र शासनपुंडलिकसम्राट हर्षवर्धनराज्यसभाझी मराठीखाशाबा जाधवआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५चलनवाढप्रज्ञा विवर्धन स्तोत्रपांढर्‍या रक्त पेशीसूर्यपोक्सो कायदाप्रीमियर लीगमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहाभारतसमीक्षाहनुमान चालीसानक्षत्रविनयभंगमराठा आरक्षणगांडूळ खतहिंदू कोड बिलकेळभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारतीय निवडणूक आयोगडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनहोमिओपॅथीहॉकीरामदास आठवलेबालकामगार प्रतिबंध कायदा १९८६नामदेवशास्त्री सानपकबड्डीहनुमान जयंतीउदय सामंतब्राझीलची राज्येमधुमेहमुलाखतभारतीय स्टेट बँकओमराजे निंबाळकरपतनियंत्रणगंगा नदीखंडोबास्त्रीवादी साहित्यजैवविविधताशिरूर लोकसभा मतदारसंघगरुडछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसएकनाथरवींद्रनाथ टागोररामटेक विधानसभा मतदारसंघगोवापुरस्कारकोरफडसूर्यकुमार यादवघनकचरातुळजाभवानी मंदिरबाळ सीताराम मर्ढेकरजागतिक वारसा स्थानजय श्री रामऔद्योगिक क्रांतीजी-२०माळीकथाकायदासुषमा अंधारेबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारइस्लामतुकडोजी महाराजवाचनबा.भो. शास्त्रीमाती प्रदूषणकालभैरवाष्टक🡆 More