ईस्टर

ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे.

ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो.

ईस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजते मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार (इंग्लिश: Good Friday) व होली सॅटर्डे होत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो.

ईस्टरची तारीख दरवर्षी बदलते कारण वसंत संपात पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे ईस्टर असे इसवी सन ३२५ मध्ये भरलेल्या ख्रिस्ती बिशप लोकांच्या संमेलनात ठरवले गेले. यहुदी लोकांच्या पासोव्हर या सणाच्या ऐवजी ईस्टर साजरा केला जातो असे काहींचे म्हणणे आहे. कारण बऱ्याच युरीपियान भाषांमध्ये ईस्टर हा शब्द पासोव्हरचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

ईस्टर साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकात "प्रभू उठला आहे" असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस " हो खरच प्रभू उठला आहे" असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो. काही देशात ईस्टर अंडी सजवण्याची प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे. आणि प्रभू मृतातून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. काही पंथात सूर्योदयाच्या वेळी प्रार्थना केली जाते.

अंड्यांचे महत्त्व

ईस्टर 
सणानिमित्त अंड्यांवर केलेली चित्र सजावट

या दिवशी अंडी रंगविणे विशेष मानले जाते. अंडे हे नव्या आनंदी दिवसाच्या प्रारंभाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी आई वडील रंगीत अंडी लपवून ठेवतात आणि लहान मुलांनी ती शोधायची अशी पद्धती रूढ आहे.


ईस्टर दिवशी सुवार्ता वाचन

ईस्टर 
राफेलचे चित्र

योहान २०:१-९

  • १ मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले.
  • २ म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीति होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, “त्यांनी प्रभुला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हांला माहीत नाही.”
  • ३ मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले.
  • ४ तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला.
  • ५ आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही.
  • ६ मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून आला व थडग्यात आत गेला.
  • ७ तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला.
  • ८ शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तोसुद्वा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला.
  • ९ येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते.

हे पण पहा

संदर्भ

Tags:

ईस्टर अंड्यांचे महत्त्वईस्टर दिवशी सुवार्ता वाचनईस्टर हे पण पहाईस्टर संदर्भईस्टरख्रिश्चनगुड फ्रायडेनवा करारयेशू ख्रिस्तलेन्ट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बीड जिल्हाराम मंदिर (अयोध्या)चैत्र पौर्णिमातुळजाभवानी मंदिररेणुकारामटेक लोकसभा मतदारसंघलावणीअक्षय्य तृतीयाप्रतिभा पाटीलराजकीय पक्षजलप्रदूषणरिंकू राजगुरूप्राणायामश्रीशेकरूनैसर्गिक पर्यावरणसुजात आंबेडकरगुरवसोलापूरसंयुक्त राष्ट्रेरत्‍नागिरी जिल्हाभारतीय जनता पक्षकाशी विश्वनाथ मंदिरकबूतरनागरी सेवाफेसबुकमुरूड-जंजिरापुराणेभारतीय संसदमण्यारमहाराष्ट्राची हास्यजत्राउजनी धरण२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाभारताचे उपराष्ट्रपतीजागतिक पुस्तक दिवसदादासाहेब फाळके पुरस्कारकुळीथभारतीय संविधानाचे कलम ३७०प्रेमसमासगायमाती प्रदूषणनाममहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीमहानुभाव पंथसरपंचवर्तुळवसुंधरा दिनजैवविविधताबेलभारतातील समाजसुधारकछत्रपती संभाजीनगरराज ठाकरेक्रिकेटचे नियमपानिपतची तिसरी लढाई३३ कोटी देवसविता आंबेडकरमनुस्मृतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगसुनील नारायणविष्णुसहस्रनामबहिणाबाई पाठक (संत)सुतकलोकमान्य टिळकताराबाईनामदेवशास्त्री सानपनेट (परीक्षा)अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)क्रियाविशेषणहरीणमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागयकृतफुटबॉलघोणसहॉकीजवसप्रदोष व्रत🡆 More