शिन्जो आबे: जपान चे पंतप्रधान

शिन्झो आबे (जपानी: 安倍 晋三; २१ सप्टेंबर १९५४ - ८ जुलै २०२२) हे एक जपानी राजकारणी होते त्यांनी २००६ ते २००७ आणि पुन्हा २०१२ ते २०२० पर्यंत जपानचे पंतप्रधान आणि लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले.

जपानच्या इतिहासात ते सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले. इ.स. २०२०चा पद्मविभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शिन्जो आबे

安倍 晋三, Abe Shinzō

शिन्जो आबे: कारकीर्द, मृत्यू, हे देखील पहा

जपान ध्वज जपानचे पंतप्रधान
कार्यकाळ
२६ डिसेंबर २०१२ – १६ सप्टेंबर २०२०
राजा नारुहितो (२०१९ पासून)

अकिहितो (२०१९ पर्यंत)

उपपंतप्रधान तारो असो
मागील योशिहिको नोदा
पुढील योशिहिदे सुगा
कार्यकाळ
२६ सप्टेंबर २००६ – २६ सप्टेंबर २००७
राजा अकिहितो
मागील जुनिचिरो कोइझुमी
पुढील यासुओ फुकुदा

जन्म २१ सप्टेंबर १९५४ (1954-09-21)
टोकियो, जपान
मृत्यू ८ जुलै, २०२२ (वय ६७)
जपान
राष्ट्रीयत्व जपान ध्वज जपान
राजकीय पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष
पत्नी अकी आबे
सही शिन्जो आबेयांची सही

कारकीर्द

शिंजो आबे यांचा जन्म टोकियो येथे झाला, त्यांचे वडील शिंतारो आबे हे जपानचे परराष्ट्र मंत्री होते, तर आजोबा ही राजकारणी होते. त्यांच्या आईचे वडील नोबुसुके किशी हे जपानचे पंतप्रधान (१९५७-६०) होते. टोकियोमधील सेकी विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर, १९७७ मध्ये दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात तीन सेमिस्टरसाठी सार्वजनिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी ते अमेरिकेला गेले, पण अभ्याक्रम न पूर्ण करता सोडून दिले. १९७९ मध्ये आबे यांनी कोबे स्टील कंपनीत कामाली सुरुवात केली पुढे ते १९८२ मध्ये कंपनी सोडून राजकारणात आले, त्यावेळी त्यांना परराष्ट्र मंत्रालयात व सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात काही पदे सुद्धा देण्यात आली होती. १९९३ मध्ये यामागुचीच्या दक्षिण-पश्चिम प्रांताचे प्रतिनिधी म्हणून प्रथमच आबे निवडून आले. आबे पक्षाच्या सिवाकाई गटातील होते, ज्याचे नेतृत्व त्यांच्या वडिलांनी केले होते. आबे हे पुराणमतवादी होते त्यांचे मोठ्या प्रमाणावर राजकीय समालोचकांनी उजव्या विचारसरणीचे जपानी राष्ट्रवादी म्हणून वर्णन केले आहे.

२००५ मध्ये आबे यांची पंतप्रधान जुनिचिरो कोइजुमी यांच्या सरकारमध्ये मुख्य कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नंतर २००६ मध्ये ते लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि २६ सप्टेंबर २००६ रोजी आबे प्रथमच जपानचे पंतप्रधान झाले. २००७ मध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचा वरिष्ट सभागृहाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. ५२ वर्षांत प्रथमच लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाने नियंत्रण गमावले होते. पराभवानंतर आबे यांनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला.

२०१२ मध्ये आबे पुन्हा एलडीपीच्या अध्यक्षपदी निवडून आले आणि दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. २०१३ मध्ये आबे यांनी त्यांची 'आबेनॉमिक्स' (Abenomics) धोरणं सुरू केली, आर्थिक पुनरुज्जीवन आणि चलनवाढ ही जपानसमोरील "सर्वात मोठी आणि तातडीची समस्या" होती त्यासंबंधीची ती धोरणे होती. जपानच्या आर्थिक सुधारणे सोबत त्यांनी जपानचे परराष्ट्र संबंध सुधारण्यावर ही भर दिला. २०१४ मध्ये आबे पुन्हा एकदा एलडीपीचे नेते निवडले गेले त्यानंतर त्यांनी दोन अतिरिक्त कार्यकाळ (२०१४-१७ आणि २०१७-२०) पंतप्रधान हे पद भूषवले. ऑगस्ट २०२० मध्ये त्यांनी प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

मृत्यू

८ जुलै २०२२ रोजी नारा येथे निवडणुकीच्या प्रचाराचे भाषण देताना आबे यांच्यावर 'यामागामी तेत्सुया' या ४१ वर्षीय पुरुषाने बंदुकीने गोळी झाडली आणि त्याच दिवशी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे देखील पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

शिन्जो आबे कारकीर्दशिन्जो आबे मृत्यूशिन्जो आबे हे देखील पहाशिन्जो आबे संदर्भशिन्जो आबे बाह्य दुवेशिन्जो आबेजपानी भाषापद्मविभूषण पुरस्काररामनाथ कोविंद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समर्थ रामदास स्वामीराशीमहादेव गोविंद रानडेमहानुभाव पंथचंद्रपूर लोकसभा मतदारसंघप्रणिती शिंदेभौगोलिक माहिती प्रणालीझाडऋग्वेदउष्माघातभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हमानवी हक्कबंजारामहाराष्ट्ररोहित शर्मान्यायालयीन सक्रियतागोकर्णीउद्योजकमुलाखतनाशिक लोकसभा मतदारसंघसिंहगडएकनाथ शिंदेव्यापार चक्रसुतकसंगीतातील रागमराठा घराणी व राज्येतबलाराजरत्न आंबेडकरभारतातील जिल्ह्यांची यादीतरसभारतातील समाजसुधारकअमरावती लोकसभा मतदारसंघआंबारावेर लोकसभा मतदारसंघज्योतिबा मंदिरपुष्यमित्र शुंगमहाभियोगभूकंपमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)मुळाक्षरमाती प्रदूषणजागतिक तापमानवाढनितीन गडकरीबाबासाहेब आंबेडकरवेरूळ लेणीअण्णा भाऊ साठेरामरक्षाकोरफडधर्मनिरपेक्षतानंदुरबार जिल्हामहात्मा गांधीहनुमान जयंतीब्राझीलपवनदीप राजनभगतसिंगमहाराष्ट्रातील खासदारांची यादीरमाबाई आंबेडकरहळदशिवसेनाहिंदू धर्मशेतीनाथ संप्रदायइतिहासाच्या अभ्यासाची साधनेरत्‍नागिरी जिल्हापाणीमराठी संतपहिले महायुद्धजागतिक दिवसमहाराणा प्रतापमराठी भाषा दिनमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीपोलीस पाटीलनियतकालिकभारतीय संविधानाची उद्देशिकाजवस🡆 More