ऑपेरा

ऑपेरा (Opera) हे प्रामुख्याने एक संगीत नाटक असते ज्यामध्ये एक किंवा अनेक गायक व संगीतकार रंगमंचावर संवाद व संगीताने रचलेली एक कथा सादर करतात.

ऑपेरामध्ये पारंपारिक नाटकाचे अभिनय, पार्श्वभूमीवरील देखावे, रंगभूषा, नृत्य इत्यादी अनेक घटक वापरले जातात. ऑपेराचे प्रयोग साधारणपणे ऑपेरागृहांमध्ये (Opera house) भरवले जातात. ऑपेरा हा पश्चिमात्य संस्कृतीमधील शास्त्रीय संगीताचा एक भाग मानला जातो.

ऑपेरा
पॅरिस ऑपेराचे प्रयोग भरवण्यासाठी वापरले जाणारे पॅरिसमधील पाले गानिये हे जगातील सर्वात प्रसिद्ध ऑपेरागृहांपैकी एक आहे.
ऑपेरा
सिडनी येथील ऑपेरागृह

१६व्या शतकाच्या अखेरीस ऑपेराचा इटलीमध्ये उगम झाला. जगातील पहिला ऑपेराचा प्रयोग फ्लोरेन्स येथे इ.स. १५९८ साली भरवण्यात आला. १७व्या शतकामध्ये ऑपेरा झपाट्याने युरोपभर पसरला व जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड येथे ऑपेराचे अनेक प्रकार निर्माण झाले. जॉर्ज फ्रीडरिक हान्डेलमोझार्ट हे १८व्या शतकामधील सर्वात लोकप्रिय ऑपेरा संगीतकारांपैकी होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात ज्योआकिनो रोसिनी, गाएतानो दॉनिझेत्ती इत्यादी इटालियन ऑपेराकारांनी ऑपेरावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. १९व्या शतकाच्या मध्यकाळात जर्मनीचा रिचर्ड वॅग्नर व इटलीचा ज्युझेप्पे व्हेर्दी हे युरोपातील सर्वात लोकप्रिय ऑपेरानिर्माते होते. प्यॉतर इल्यिच चैकोव्स्की हा १९व्या शतकातील एक लोकप्रिय रशियन ऑपेराकार होता. एक्तॉर बर्लियोझने फ्रेंच भाषेमध्ये अनेक ऑपेरा लिहिले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ज्याकोमो पुचिनीने ऑपेराची लोकप्रियता वाढवली.

बाह्य दुवे

ऑपेरा 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

अभिनयगायकनाटकनृत्यशास्त्रीय संगीतसंगीतसंगीत नाटकसंगीतकार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढामहाराष्ट्रातील लोककलाघोरपडअहवाल लेखनमण्यारमहाराष्ट्राची हास्यजत्राफणससूर्यमालाभोपाळ वायुदुर्घटनावडभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हशेळी पालनवल्लभभाई पटेलएकांकिकाकेंद्रीय लोकसेवा आयोगकार्ल मार्क्सगिटारभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसिंधुताई सपकाळन्यूटनचे गतीचे नियमइंडियन प्रीमियर लीगसोळा संस्कारअर्थसंकल्पजायकवाडी धरणगांडूळ खतरावणजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)रामरक्षाव्हॉट्सॲपदशावतारगडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघमृत्युंजय (कादंबरी)गोवाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपाठ्यपुस्तकेभारतातील सण व उत्सवॐ नमः शिवायसुरेश भटभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तआंतरराष्ट्रीय नाणेनिधीआदिवासीअभंगसोनारभारतातील जागतिक वारसा स्थानेमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीअतिसारराजकारणभारताची जनगणना २०११प्राणायामविष्णुमानवी विकास निर्देशांककांदाभारताचे राष्ट्रपतीसूर्यगोकर्णीभारताचा स्वातंत्र्यलढाशिवसेनामहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीहिंद-आर्य भाषासमूहसमासगडचिरोली जिल्हाकळसूबाई शिखरशिव जयंतीएकनाथ शिंदेनाशिक लोकसभा मतदारसंघभारतचंद्रयान ३राजकीय पक्षनक्षत्रपरभणी लोकसभा मतदारसंघज्योतिबास्वरठाणे जिल्हासातवाहन साम्राज्यउदयनराजे भोसले🡆 More