आयझॅक आसिमॉव्ह

आयझॅक आसिमॉव्ह (रशियन: Айзек Азимов, Исаак Юдович Озимов ; इंग्रजी: Isaac Asimov, Isaak Yudovich Ozimov ;) (जानेवारी २, इ.स.

१९२०">इ.स. १९२० - एप्रिल ६, इ.स. १९९२) हा इंग्लिश भाषेत विज्ञान कथा लिहिणारे अमेरिकन लेखक व बॉस्टन विद्यापीठात जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक होते.

आयझॅक आसिमॉव्ह
आयझॅक आसिमॉव्ह

चरित्र

आसिमॉव्ह यांचा जन्म ४ ऑक्टोबर इ.स. १९१९ आणि २ जानेवारी इ.स. १९२० दरम्यान रशियातील एका ज्यू कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मतारखेबद्दल ग्रेगरियन आणि हिब्रू कॅंलेंडर यातील वादामुळे निश्चित माहिती नाही. आयझॅक स्वतः त्यांचा जन्म २ जानेवारीचा मानून त्या दिवशी वाढदिवस साजरा करीत. आई-वडील नेहमी इंग्लिश आणि यिडीश भाषेत बोलत असल्याने आयझॅक यांना रशियन भाषा येत नव्हती.

आयझॅक ३ वर्षांचे असतांना आसिमॉव्ह कुटुंब अमेरिकेत स्थाईक झाले. वयाच्या ५ व्या वर्षी आयझॅकने शिकण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी इंग्लिश आणि यिडीश भाषांवर प्रभुत्व मिळविले. लहान वयातच आयझॅक यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण झाली. या विषयाचे पुस्तके मिळवून ते वडिलांच्या मनाविरूद्ध वाचीत असत. वयाचा ११व्या वर्षी आयझॅकने लिखाण सुरू केले तर वयाच्या १९व्या वर्षापर्यंत त्यांचे लिखाण मासिकांमध्ये छापून येण्यास सुरुवात झाली. त्यांचे शालेय शिक्षण न्यू यॉर्क पब्लिक स्कूलमध्ये झाले.. १९३९ साली त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कोलंबिया विद्यापीठातून पूर्ण केले. आसिमॉव्ह हे जीवरसायनशास्त्र आणि भौतिकरसायन या दोन विषयात पीएच.डी. होते तर १४ विविध विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली होती. त्याशिवाय अनेक मान्यवर संस्थांनी त्यांचा वेळोवेळी पुरस्कार देऊन सत्कार केला होता. नुकतेच (इ.स. २००९ साली) आसिमॉव्ह यांच्या सन्मानार्थ मंगळ ग्रहावरील एका विवराला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या आसिमॉव्ह यांनी खगोलशास्त्र, जीवशास्त्र, गणित, अमेरिकेचा इतिहास, पुराणकथा, भयकथा, गूढकथा, लघुकथा, निबंध अशा विविध विषयांवर ५१५हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या १९ पुस्तकांची सुजाता गोडबोले यांनी केलेली मराठी भाषांतरे www.arvindguptatoys.com या संकेतस्थळावर आहेत.

एप्रिल ६ इ.स. १९९२ रोजी आयझॅक आसिमॉव्ह यांचे हृदयविकाराने आणि मूत्रपिंडातील दोषामुळे निधन झाले.

बाह्य दुवे

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइ.स. १९२०इ.स. १९९२इंग्लिश भाषाएप्रिल ६जानेवारी २रशियन भाषालेखकविज्ञान कथा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समाज माध्यमेहॉकीदिनकरराव गोविंदराव पवारसंधी (व्याकरण)विनयभंगवेरूळ लेणीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमानवी हक्कराजकीय पक्षभारतीय स्टेट बँक३३ कोटी देवबहुराष्ट्रीय कंपनीदिवाळीब्राझीलची राज्येकुष्ठरोगपत्रगुकेश डीगणपती स्तोत्रेजेजुरीचार आर्यसत्यमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागपोलीस पाटीलछगन भुजबळभाषाभारतीय प्रजासत्ताक दिनभारताची जनगणना २०११संत जनाबाईभारतातील सण व उत्सवश्रीरामवरदायिनी देवी (मौजे पारसोंड)लिंगभावभारताचे सर्वोच्च न्यायालयशिरूर लोकसभा मतदारसंघकल्याण लोकसभा मतदारसंघसंवादपोहणेतुतारीप्राजक्ता माळीबचत गटसाईबाबानारळतिथीपंकजा मुंडेबाराखडीन्यूझ१८ लोकमतअमोल कोल्हेरायगड लोकसभा मतदारसंघश्रीमहाराष्ट्रातील आरक्षणमहाराष्ट्रातील नद्यांची यादीसविनय कायदेभंग चळवळभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याताम्हणभारतीय लोकशाहीअश्वत्थामाभौगोलिक माहिती प्रणालीबाळूमामाच्या नावानं चांगभलंह्या गोजिरवाण्या घरातएकांकिकासंयुक्त महाराष्ट्र चळवळअमरावती जिल्हातिवसा विधानसभा मतदारसंघबाबा आमटेविदर्भभारताच्या पंतप्रधानांची यादीमुंबईइतर मागास वर्गपक्षीसत्यनारायण पूजाशिवाजी महाराजांची राजमुद्रासमासविनोबा भावेविधान परिषददीनानाथ मंगेशकरसप्तशृंगीक्रियापद🡆 More