ॲम्स्टरडॅम: नेदरलॅंड्स देशाची राजधानी

अ‍ॅमस्टरडॅम (डच: Amsterdam; उच्चार ) ही नेदरलँड्स देशाची राजधानी व देशातील सर्वात मोठे शहर आहे.

नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तर हॉलंड ह्या प्रांतात वसलेले अ‍ॅमस्टरडॅम शहर उत्तर समुद्राशी एका २५ किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे जोडले गेले आहे. २०१० साल अखेरीस अ‍ॅमस्टरडॅम शहराची लोकसंख्या ७.८० लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या २१.५८ लाख इतकी होती.

अ‍ॅमस्टरडॅम
Amsterdam
नेदरलँड्स देशाची राजधानी
ॲम्स्टरडॅम: इतिहास, भूगोल, शहर रचना
ध्वज
ॲम्स्टरडॅम: इतिहास, भूगोल, शहर रचना
चिन्ह
अ‍ॅमस्टरडॅम is located in नेदरलँड्स
अ‍ॅमस्टरडॅम
अ‍ॅमस्टरडॅम
अ‍ॅमस्टरडॅमचे नेदरलँड्समधील स्थान

गुणक: 52°22′23″N 4°53′32″E / 52.37306°N 4.89222°E / 52.37306; 4.89222

देश Flag of the Netherlands नेदरलँड्स
प्रांत उत्तर हॉलंड
क्षेत्रफळ २१९ चौ. किमी (८५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)
लोकसंख्या  (३१ डिसेंबर २०१०)
  - शहर ७,८०,१५२
  - घनता ३,५०६ /चौ. किमी (९,०८० /चौ. मैल)
  - महानगर २१,५८,५९२
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
amsterdam.nl

१२व्या शतकात मासेमारीसाठी वसवलेले अ‍ॅमस्टरडॅम गाव १७व्या शतकादरम्यान नेदरलँड्सचे सर्वात महत्त्वाचे बंदर बनले. १९व्या व विसाव्या शतकांत अ‍ॅमस्टरडॅमची झपाट्याने वाढ झाली व अनेक नवी उपनगरे बांधली गेली. सध्या नेदरलँड्सचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र असलेल्या अ‍ॅमस्टरडॅममध्ये अनेक मोठ्या जागतिक कंपन्यांची मुख्यालये आहेत. २०१० साली राहणीमानाच्या दर्जासाठी अ‍ॅमस्टरडॅमचा जगात तेरावा क्रमांक होता. येथील १७व्या शतकात बांधलेल्या ऐतिहासिक कालव्यांसाठी अ‍ॅमस्टरडॅमचे नाव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.

इतिहास

बाराव्या शतकात अ‍ॅमस्टरडॅमची स्थापना एक मासेमारीचे गाव म्हणून करण्यात आली.

भूगोल

अ‍ॅमस्टरडॅम शहर नेदरलँड्सच्या पश्चिम भागात उत्तरहॉलंड ह्या प्रांतात अत्यंत सपाट भागात वसले आहे. येथे अनेक नैसर्गिक व कृत्रिम कालवे आहेत. तसेच अ‍ॅमस्टरडॅमची अनेक उपनगरे पाण्यात भराव घालून तयार केलेल्या कृत्रिम जमिनीवर वसवली आहेत.

हवामान

अ‍ॅमस्टरडॅमचे हवामान सागरी स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य असतात.

अ‍ॅमस्टरडॅम साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 5
(41)
6
(43)
10
(50)
14
(57)
18
(64)
21
(70)
23
(73)
23
(73)
20
(68)
16
(61)
10
(50)
6
(43)
15
(59)
दैनंदिन °से (°फॅ) 3.1
(37.6)
3.3
(37.9)
6.2
(43.2)
9.2
(48.6)
13.1
(55.6)
15.6
(60.1)
17.9
(64.2)
17.5
(63.5)
14.5
(58.1)
10.7
(51.3)
6.7
(44.1)
3.7
(38.7)
10.1
(50.2)
सरासरी किमान °से (°फॅ) 1
(34)
0
(32)
3
(37)
4
(39)
8
(46)
11
(52)
13
(55)
13
(55)
10
(50)
7
(45)
3
(37)
1
(34)
6
(43)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 69.6
(2.74)
56.2
(2.213)
66.8
(2.63)
42.3
(1.665)
61.9
(2.437)
65.6
(2.583)
81.1
(3.193)
72.9
(2.87)
78.1
(3.075)
82.8
(3.26)
79.8
(3.142)
75.7
(2.98)
832.8
(32.787)
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 62.3 86.4 121.6 173.6 207.2 194.0 206.0 187.7 138.4 112.4 62.6 48.8 १,६०१
स्रोत:

शहर रचना

ॲम्स्टरडॅम: इतिहास, भूगोल, शहर रचना 
अ‍ॅम्स्टरडॅमचे कालवे

१७व्या शतकात अ‍ॅमस्टरडॅमच्या रचनेसाठी सखोल संशोधन करून मोठी योजना बनवण्यात आली. तिच्यानुसार येथे कृत्रिम कालवे खणले गेले; नैसर्गिक पाण्यात भराव घालून कृत्रिम जमीन उभारली गेली. १६५६ सालापर्यंत चार गोलाकृती आकाराचे कालवे तयार झाले होते. कालव्यांचा उपयोग पुरापासून संरक्षण, पाणी पुरवठा, वाहतूक इत्यादी कारणांसाठी केला गेला. अ‍ॅमस्टरडॅममधील बहुसंख्य ऐतिहासिक इमारती व वास्तू ह्या कालव्यांच्या भोवताली बांधल्या गेल्या आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाढत्या लोकसंख्येमुळे अ‍ॅमस्टरडॅमला जागेची टंचाई जाणवू लागली. ह्यावर उपाय म्हणून नवी उपनगरे वसवली गेली.

अर्थव्यवस्था

जनसांख्यिकी

ऐतिहासिक काळापासून अ‍ॅमस्टरडॅम हे स्थानांतरितांचे शहर राहिले आहे. इ.स. 2015 साली येथील ७,८३,३६४ पैकी ४९.७ टक्के रहिवासी डच वंशाचे तर ५०.३ टक्के विदेशी लोक आहेत. १६व्या व १७व्या शतकांमध्ये अनेक युग्नो, ज्यू, फ्लेमिशवेस्टफालिश लोक येथे दाखल झाले. विसाव्या शतकात इंडोनेशियासुरीनाम ह्या डच वसाहतींमधील लोकांनी, त्याचबरोबर जगभरातील निर्वासितांनी व बेकायदेशीर घुसखोरांनी या शहरात मोठ्या प्रमाणावर वसाहती केल्या.

सध्या ख्रिश्चन (कॅथॉलिकप्रोटेस्टंट) व इस्लाम हे येथील प्रमुख धर्म आहेत.

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १३०० १,०००
इ.स. १४०० ३,००० +२००%
इ.स. १५०० १५,००० +४००%
इ.स. १६०० ५४,००० +२६०%
इ.स. १६७५ २,०६,००० +२८१%
इ.स. १७९६ २,००,६०० −२%
इ.स. १८१० १,८०,००० −१०%
इ.स. १८५० २,२४,००० +२४%
इ.स. १८७९ ३,१७,००० +४१%
इ.स. १९०० ५,२३,५७७ +६५%
इ.स. १९३० ७,५७,००० +४४%
इ.स. २०१० ७,८०,१५२ +३%

वाहतूक

ॲम्स्टरडॅम: इतिहास, भूगोल, शहर रचना 
अ‍ॅम्स्टरडॅममधील ट्राम

नागरी वाहतूकीसाठी अ‍ॅम्स्टरडॅममध्ये बस, भुयारी रेल्वे व ट्राम सेवा उपलब्ध आहेत. येथील अनेक कालव्यांमुळे बोट प्रवास हा देखील महत्त्वाचा वाहतूक प्रकार आहे. सायकल हे वाहन येथे अत्यंत लोकप्रिय आहे. जवळजवळ सर्व प्रमुख रस्त्यांवर सायकल चालकांसाठी स्वतंत्र मार्ग आखले आहेत. येथील ३८ टक्के शहरी प्रवास सायकलवर केला जातो. उत्तम नागरी वाहतूक सुविधा असलेल्या अ‍ॅम्स्टरडॅममध्ये रहिवाशांना वैयक्तिक वाहन वापरण्यापासून निरुत्साहित केले जाते.

अ‍ॅम्स्टरडॅम श्चिफोल हा नेदरलँड्समधील सर्वात मोठा तर युरोपातील पाचवा सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. के.एल.एम. ह्या नेदरलँड्समधील प्रमुख विमान कंपनीचा हब येथेच आहे.

कला

खेळ

ॲम्स्टरडॅम: इतिहास, भूगोल, शहर रचना 
ए.एफ.सी. एयाक्सचे अ‍ॅम्स्टरडॅम अरेना

फुटबॉल हा अ‍ॅम्स्टरडॅममधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ए.एफ.सी. एयाक्स हा १९०० साली स्थापन झालेला स्थानिक फुटबॉल संघ युरोपातील प्रतिष्ठित संघांपैकी एक आहे. एराडिव्हिझी ह्या सर्वोच्च श्रेणीच्या डच फुटबॉल लीगमधील अव्वल संघांपैकी एक असलेला एयाक्स अ‍ॅम्स्टरडॅम अरेना ह्या स्टेडियममध्ये आपले सामने खेळतो.

अ‍ॅम्स्टील टायगर्स हा आइस हॉकी संघ, अ‍ॅम्स्टडॅम पायरेट्स हा बेसबॉल संघ, एबीसी अ‍ॅम्स्टरडॅम हा बास्केटबॉल संघ तसेच अ‍ॅम्स्टरडॅम पँथर्स व अ‍ॅम्स्टरडॅम क्रुसेडर्स हे दोन अमेरिकन फुटबॉल संघ अ‍ॅम्स्टरडॅम शहरात स्थित आहेत.

१९२८ साली अ‍ॅम्स्टरडॅमने उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्यासाठी बांधलेले स्टेडियम सध्या काही सांस्कृतिक व खेळ कार्यक्रमांसाठी वापरले जाते. १९२० सालच्या अँटवर्प ऑलिंपिकमधील काही खेळांचे आयोजन अ‍ॅम्स्टरडॅममध्ये करण्यात आले होते.

शिक्षण

अ‍ॅम्स्टरडॅम विद्यापीठ व फ्रिये युनिव्हर्सिटेट ही अ‍ॅम्स्टरडॅममधील दोन प्रमुख विद्यापीठे आहेत. ह्या व्यतिरिक्त कला, संगीत, भाषा इत्यादींसाठी अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था अ‍ॅम्स्टरडॅममध्ये कार्यरत आहेत.

जुळी शहरे

अ‍ॅमस्टरडॅमचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

संदर्भ

बाह्य दुवे

ॲम्स्टरडॅम: इतिहास, भूगोल, शहर रचना 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

ॲम्स्टरडॅम इतिहासॲम्स्टरडॅम भूगोलॲम्स्टरडॅम शहर रचनाॲम्स्टरडॅम अर्थव्यवस्थाॲम्स्टरडॅम जनसांख्यिकीॲम्स्टरडॅम वाहतूकॲम्स्टरडॅम कलाॲम्स्टरडॅम खेळॲम्स्टरडॅम शिक्षणॲम्स्टरडॅम जुळी शहरेॲम्स्टरडॅम संदर्भॲम्स्टरडॅम बाह्य दुवेॲम्स्टरडॅमNl-Amsterdam.oggउत्तर समुद्रकालवाडच भाषानेदरलँड्सहॉलंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्थानिक स्वराज्य संस्थारमा बिपिन मेधावीबखरगोपाळ गणेश आगरकरकोरेगावची लढाईसेंद्रिय शेतीअश्वत्थामाविधानसभाअजित पवारभारूडरोहित पवारवल्लभभाई पटेलदौलताबादसुतक१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धराजगडजंगली महाराजयेसूबाई भोसलेमहाविकास आघाडीवातावरणलोकसभाभारताची संविधान सभासातारा विधानसभा मतदारसंघहुप्पा हुय्या (मराठी चित्रपट)ब्राझीलसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेकवठभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तमहाराष्ट्रातील किल्लेसंभाजी भोसलेसत्यशोधक समाजविष्णुशास्त्री चिपळूणकरऊसविष्णुमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेमाती प्रदूषणनवग्रह स्तोत्रवंचित बहुजन आघाडीकर्करोगकृष्णा नदीदूधअष्टविनायकश्यामची आईबहिष्कृत भारतकोल्हापूरभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशधर्मनिरपेक्षतानवरी मिळे हिटलरलाभारताचे राष्ट्रपतीभारतातील जागतिक वारसा स्थानेऋग्वेदमहाड सत्याग्रहमानवी प्रजननसंस्थामूळ संख्याविठ्ठलमैदानी खेळशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७रक्षा खडसेबडनेरा विधानसभा मतदारसंघचिपको आंदोलनजगातील देशांची यादी२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानांदेडसंधी (व्याकरण)ब्रिक्सभारतीय संविधानाची उद्देशिकामौर्य साम्राज्यएकविरासंगणकाचा इतिहासहनुमान मंदिरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९श्रीमादीची जननेंद्रियेशरद पवारअजिंठा-वेरुळची लेणीमानवी विकास निर्देशांक२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लातापमान🡆 More