अटलांटा

अटलांटा (इंग्लिश: Atlanta) ही अमेरिका देशातील जॉर्जिया राज्याची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

२०१० साली ४.२ लाख लोकसंख्या असलेले अटलांटा अमेरिकेमधील ४०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अटलांटा-मॅरिएटा-सॅंडी स्प्रिंग्ज ह्या महानगर क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ५२.६९ लाख असून ह्या दृष्टीने ते अमेरिकेमधील नवव्या क्रमांकाचे मोठे महानगर आहे.

अटलांटा
Atlanta
अमेरिकामधील शहर

अटलांटा

अटलांटा
ध्वज
अटलांटा
चिन्ह
अटलांटा is located in जॉर्जिया (अमेरिका)
अटलांटा
अटलांटा
अटलांटाचे जॉर्जिया (अमेरिका)मधील स्थान
अटलांटा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अटलांटा
अटलांटा
अटलांटाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 33°45′18″N 84°23′24″W / 33.75500°N 84.39000°W / 33.75500; -84.39000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य जॉर्जिया
स्थापना वर्ष १८४७
क्षेत्रफळ ३४३ चौ. किमी (१३२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल १,०५० फूट (३२० मी)
किमान ७३८ फूट (२२५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४,२०,००३
  - घनता १,५५२ /चौ. किमी (४,०२० /चौ. मैल)
  - महानगर ५२,६८,८६०
http://www.atlantaga.gov

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस स्थापन झालेले अटलांटा अमेरिकन यादवी युद्धादरम्यान दक्षिणेकडील राज्यांचे एक प्रमुख वाहतूक व लष्करी केंद्र होते. आअज्च्या घडीला अटलांटा अमेरिकेमधील एक प्रमुख शहर आहे. २७० अब्ज डॉलर इतकी उलाढाल असलेल्या अटलांटाचा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अमेरिकेत सहावा तर जगात १५वा क्रमांक लागतो. कोका-कोला, डेल्टा एरलाइन्स, सीएनएन, यूपीएस इत्यादी जगातील अनेक प्रमुख कंपन्यांची मुख्यालये अटलांटा महानगरात स्थित आहेत. येथील हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा १९९८ सालापासून जगातील सर्वात वर्दळीचा विमानतळ राहिला आहे. २०१० साली पर्यटनासाठी अटलांटा अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे लोकप्रिय शहर होते.

१९९६ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा अटलांटामध्ये भरवल्या गेल्या.

इतिहास

युरोपीय लोक उत्तर अमेरिकेत दाखल होण्याआधी ह्या भागात चेरोकी व क्रीक जमातींचे स्थानिक लोक राहत असत. इ.स. १८०२ मध्ये युरोपियन वसाहतकारांनी येथून स्थानिकांना हाकलण्यस सुरुवात केली व इ.स. १८२१ साली क्रीक लोकांनी ह भाग सोडला. त्यानंतर ह्याच भूभागावर अटलांटा शहर वसवले गेले. नंतरच्या काळात सव्हाना ते मिडवेस्ट हा रेल्वेमार्ग अटलांटामधून काढण्यात आला व ह्याच काळात ह्या शहराला अटलांटा हे नाव मिळाले. अमेरिकन यादवी युद्धकाळात अटलांटा हे दक्षिणी राज्यांचे एक महत्त्वाचे स्थान होते. इ.स. १८६८ साली जॉर्जियाची राजधानी अटलांटा येथे हलवण्यात आली. पुढील अनेक वर्षे एक मोठे औद्योगिक व वाहतूक केंद्र म्हणून अटलांटाचा विकास होतच राहिला. मे २१, इ.स. १९१७ रोजी येथे लागलेल्या एका आगीमध्ये सुमारे २००० लाकडी इमारती बेचिराख झाल्या, परंतु शहराची पुनर्बांधणी वेगाने झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान येथील विमाने बनवण्याच्या काराखान्यामुळे तसेच नव्या सुरू झालेल्या रेल्वेमार्गांमुळे अटलांटाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. १९७० च्या दशकापासून आफ्रिकन अमेरिकन लोक अटलांटामध्ये मोठ्या संख्येने स्थायिक होउ लागले. इ.स. १९९६मधील ऑलिंपिक स्पर्धेमुळे अटलांटा जागतिक प्टलावर दाखल झाले.

भूगोल

हवामान

अर्थव्यवस्था

जनसांख्यिकी

वाहतूक

शिक्षण

अमेरिकेमधील सर्वोत्तम संशोधन विद्यापीठांपैकी एक असलेली जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अटलांटा शहरामध्ये स्थित आहे.

खेळ

खालील तीन प्रमुख व्यावसायिक संघ अटलांटामध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान
अटलांटा फाल्कन्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग जॉर्जिया डोम
अटलांटा हॉक्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन फिलिप्स अरेना
अटलांटा ब्रेव्ह्ज बेसबॉल मेजर लीग बेसबॉल टर्नर फील्ड

जुळी शहरे

जगातील खालील १९ शहरांचे अटलांटासोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.

प्रेक्षणीय स्थळे

संदर्भ

बाह्य दुवे

अटलांटा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अटलांटा इतिहासअटलांटा भूगोलअटलांटा अर्थव्यवस्थाअटलांटा जनसांख्यिकीअटलांटा वाहतूकअटलांटा शिक्षणअटलांटा खेळअटलांटा जुळी शहरेअटलांटा प्रेक्षणीय स्थळेअटलांटा संदर्भअटलांटा बाह्य दुवेअटलांटाअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाजॉर्जिया (अमेरिका)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंदू धर्ममहात्मा फुलेमहालक्ष्मीपांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीकासववसंतराव नाईकपूर्व दिशाभारतातील जिल्ह्यांची यादीजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)परभणी विधानसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिताशेतीशिव जयंतीमौर्य साम्राज्यवृत्तपत्रनगर परिषदस्त्री सक्षमीकरणगालफुगीभारताच्या राष्ट्रपतींची यादीकर्ण (महाभारत)संभोग२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकातणावगंगा नदीअश्वगंधामराठा२०२४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमौद्रिक अर्थशास्त्रराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकसुप्रिया सुळेवृषभ रासमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)लोणार सरोवरविराट कोहलीगोपीनाथ मुंडेशरद पवारसातवाहन साम्राज्यघनसावंगी विधानसभा मतदारसंघभारताचे सर्वोच्च न्यायालयअण्णा भाऊ साठेहस्तमैथुनपोलीस पाटीलअकोला लोकसभा मतदारसंघवर्णअलिप्ततावादी चळवळशहाजीराजे भोसलेसातारा लोकसभा मतदारसंघतमाशाशिरसाळा मारोती मंदिरप्रज्ञा विवर्धन स्तोत्रस्त्रीवादजलप्रदूषणछत्रपती संभाजीनगरसोलापूर जिल्हापरभणी जिल्हाराजगडमराठी लोकसीताअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमुळाक्षरसविनय कायदेभंग चळवळसप्त चिरंजीवविष्णुशास्त्री चिपळूणकरम्युच्युअल फंडग्रामदैवतवेदझांजकृष्णा नदीघोरपडउत्तर दिशामहेंद्र सिंह धोनीमटकाजागतिक कामगार दिनभारताचा ध्वज🡆 More