बेडूक: एक उभयचर प्राणी

बेडूक हा उभयचर प्राणी आहे.

बेडूक आपली श्वसनक्रिया फुफ्फुसे व त्वचेमार्फत करतो. हा नैसर्गिक अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहे बेडूक हे शीतरक्ताचे प्राणी असल्याने त्यांच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते.त्यामुळे ते एकदम थंड किंवा उष्ण तापमान सहन करू शकत नाही. प्रतिकूल वातावरणावर मात करण्यासाठी, अतिशय थंड हवामानात बेडूक जमिनीत गाडून घेतात व दीर्घ निद्रा घेतात. त्याला त्याची शीतकाल समाधी म्हणतात. या कालावधीत ते फुप्फुसाद्वारे श्वसन न करता त्वचेद्वारे श्वसन करतात. आणि शरीरात साठवलेली ऊर्जा वापरतात. तर, काही बेडूक उन्हाळ्यात स्वतःला मातीत गाडून घेतात.पुराणात बेडकावर 'मान्दुकासुक्त' आहे.

बेडूक: स्वरूप, उडता बेडूक, कायदा
बेडूक

स्वरूप

नर बेडकाचा आवाज घोगरा, खोल आणि मोठा असतो. मादी बेडूक क्वचितच आणि हळू आवाज काढते. बेडूक संपूर्ण मांसाहारी असतात. हल्लीच्या काळात तंगड्यांची परदेशी निर्यात करण्याच्या मोहात बेडकांची हत्या जास्त प्रमाणात होते. त्यामुळे बेडकांचे प्रमाण झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. पावसाळ्यात शीतनिद्रा अवस्था संपवून बेडूक प्रजननासाठी बाहेर येतात, तेव्हा अशा मोठ्या बेडकांना प्रजननाआधीच मारले जाते. काही बेडूक शेतात टाकलेल्या आणि नंतर पाण्यात विरघळलेल्या कीटकनाशकांमुळे व रासायनिक खतांमुळे प्रदूषित झालेले पाणी, त्वचेद्वारे श्वसनक्रियेसाठी शोषून घेतो. यामुळेही बेडूक मृत्युमुखी पडत आहेत.

उडता बेडूक

आंबोली तालुक्यात उडता बेडूक आढळतो. पायाच्या बोटांमध्ये पडदे असलेल्या आपल्या शारीरिक रचनेचा वापर करून तो एका झाडावरून उडत दुसऱ्या झाडावर जातो. सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगर परिसरातही या बेडकाची नोंद डॉ. गणेश मर्गज व सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुभाष पुराणिक यांनी घेतली आहे.

कायदा

बेडकांना संरक्षण मिळावे म्हणून त्यांना वन्य प्राणी म्हणून घोषित केले गेले आहे. त्यासाठी १९८५ साली भारताच्या वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बेडकांना पकडण्यावर व मारून खाण्यावर बंदी घातली गेली आहे. दोषी ठरलेल्यांसाठी कायद्याने पंचवीस हजार रुपये दंड व तीन वर्षे कैद अशी कडक सजा दिलेली आहे.

२९ एप्रिल हा जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो.

बाह्य दुवे

ठळक मजकूर

Tags:

बेडूक स्वरूपबेडूक उडता बेडूक कायदाबेडूक बाह्य दुवेबेडूकउभयचर प्राणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंगोली लोकसभा मतदारसंघकरवंदसाहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (मराठी)पद्मसिंह बाजीराव पाटीलमहाड सत्याग्रहविकिपीडियाशिर्डी लोकसभा मतदारसंघस्वामी विवेकानंदगजानन महाराजप्रल्हाद केशव अत्रेध्वनिप्रदूषणमिया खलिफाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रमलहुजी राघोजी साळवेअमेरिकेची संयुक्त संस्थानेईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघयेसूबाई भोसलेजयंत पाटीलगुप्त साम्राज्यज्योतिर्लिंगमोरजगातील सात आश्चर्येब्राझीलविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीलोकमतलक्ष्मणसात आसरासामाजिक समूहस्त्री सक्षमीकरणउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघज्येष्ठमधखो-खोश्रीसर्पगंधावर्णमालाआलेजनमत चाचणीरामकर्करोगहिंदू धर्मअन्नप्राशनभारताचा इतिहाससंगीतगणपत गायकवाडउंटरामटेक लोकसभा मतदारसंघबहिणाबाई पाठक (संत)हिंद-आर्य भाषासमूहपाणीघोरपडछावा (कादंबरी)पारनेर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीमराठी भाषा दिनअक्षय्य तृतीयासुप्रिया सुळेकरमाळा विधानसभा मतदारसंघमानवी शरीरमहेंद्र सिंह धोनीकीर्तनउष्माघातआम्ही जातो अमुच्या गावासिंधुदुर्गमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमराठी संतव्यापार चक्रउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघजागतिक दिवसफ्रेंच राज्यक्रांतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसंवादभारताच्या सरन्यायाधीशांची यादीसूर्यजिजाबाई शहाजी भोसलेभारताची संविधान सभासांगली लोकसभा मतदारसंघतमाशामुंबई उच्च न्यायालय🡆 More