कलि युग

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ हा चार युगांत विभागलेला आहे.

त्यातील चौथा भाग म्हणजे कलि युग. भाद्रपद वद्य त्रयोदशी, प्रमादी नाम संवत्सर, मंगळवार दि. १६ जुलै इ.स.पु. -३१०१ ला कलियुगाला सुरुवात झाली.

नवीन युगाची कल्पनाच

वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. पहिल्या महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरूष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदापैकी ८ व्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापार आणि कली. या युगात अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलीयुगात आहोत आणि याचा प्रारंभ इ.स.पू. ३१०२ मध्ये झाला असे मानले जाते.

कलियुग लक्षणे

नारद म्हणाले पृथ्वी सर्वोत्तम आहे, असे समजून मी येथे आलो. पृथ्वीवरील पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिद्वार, कुरुक्षेत्र, श्रीरंगम, रामेश्वरम (सेतुबंध) इत्यादी अनेक तीर्थक्षेत्री मी संचार केला. परंतु मला कोठेही मनःशांती प्राप्ती झाली नाही. सध्या अधर्माला साहाय्य करणाऱ्या कलियुगाने सर्व पृथ्वी दुःखित झाली आहे. येथे आता सत्य, तप, पावित्र्य, दया, दान राहिलेले नाही. मनुष्यप्राणी केवळ उपजीविकेत व्यग्र आहेत. ते असत्य भाषण करणारे, आळशी, मंदबुद्धी, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणविणारे दांभिक आहेत, वरकरणी विरक्त दिसणारे संचय करीत आहेत. घराघरात स्त्रियांची सत्ता चालते. पत्‍नीचा भाऊ सल्लागार झाला आहे. लोक धनलोभाने कन्याविक्रय करू लागले आहेत आणि नवरा-बायकोमध्ये कलह होत आहे. महात्मा पुरुषांचे आश्रम, तीर्थक्षेत्रे, नद्या इत्यादींवर परधर्मीयांचा अधिकार आहे. येथे दुष्टांनी बरीचशी देवालये नष्ट केली आहेत. यावेळी इथे कोणी योगी नाही, सिद्धपुरुष नाही, ज्ञानी नाही की सत्कर्म करणारा नाही. सर्व पुण्य साधने यावेळी कलिरूपी वणव्याने भस्मसात करून टाकली आहेत. या कलियुगात बहुतेक देशवासी बाजारात अन्न विकू लागले आहेत. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवीत आहेत आणि स्त्रिया सदाचारहीन झाल्या आहेत. (२८-३६)

संदर्भ

श्रीमद् भागवत महापुराण

श्रीमद्भागवत महात्म्य (पहिले )प्रारंभ

माहात्म्य-अध्याय १ला (२८-३६)

संदर्भ आणि नोंदी

Tags:

कलि युग नवीन युगाची कल्पनाचकलि युग संदर्भ आणि नोंदीकलि युगहिंदू धर्म

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र विधानसभामेष रासहिंगोली लोकसभा मतदारसंघमाती प्रदूषणसायाळपोवाडालिंग गुणोत्तरज्वारीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीविजयसिंह मोहिते-पाटीलनारळघोणसमराठाकाळाराम मंदिर सत्याग्रहअतिसारछत्रपती संभाजीनगर जिल्हामराठा घराणी व राज्येनातीहिरडामानवी हक्कनेहरू युवा केंद्र संघटनमहाराष्ट्र विधान परिषदआंबेडकर जयंतीसाताराधर्मआयुर्वेदसंयुक्त राष्ट्रेभारताचे उपराष्ट्रपतीदशरथवारली चित्रकलासाडीशीत युद्धसिंधुदुर्गकांजिण्याभारताचे पंतप्रधानप्रशासनशास्त्रनवरत्‍नेयोनीनक्षत्रकृष्णहनुमानपेशवेमीठजैन धर्मरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघथोरले बाजीराव पेशवेकाळभैरवपुरंदर किल्लामहावीर जयंतीपुन्हा कर्तव्य आहेसुशीलकुमार शिंदेघुबडमांजरअहवाल लेखनगजानन दिगंबर माडगूळकरसावित्रीबाई फुलेमहाड सत्याग्रहखुला प्रवर्गकुळीथदिशाबचत गटआरोग्यलोकसभा सदस्यसज्जनगडलोणार सरोवरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकवसंतराव नाईकम्हणीताराबाई शिंदेमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरपंचशीलकृत्रिम पाऊसबच्चू कडूबाबा आमटेपर्यावरणशास्त्रसर्वनामअकोला जिल्हा🡆 More