लैंगिक कल

लैंगिक कल म्हणजे, एखाद्या व्यक्तिचे विषमलिंगी व्यक्तीबद्दल किंवा समलिंगी व्यक्तीबद्दल किंवा दोन्हींही व्यक्तींबद्दल वाटत असलेल्या भावनिक आणि/किंवा लैंगिक आकर्षणाचा संग्रह होय.

समलैंगिककता, विषमलैंगिकता, उभयलिंगी लैंगिकता हे लैंगिक कलाचे काही प्रकार आहेत. शिवाय, अलैंगिकता हा ही एक प्रकार आहे ज्यामध्ये कसल्याही प्रकारचे लैंगिक आकर्षण कोणत्याच लिंगाच्या किंवा लिंगभावाच्या व्यक्तिबरोबर वाटत नाही.

लैंगिक कल आणि इतर समान संकल्पना

लैंगिक कलाच्या ह्या वर्गीकरणांमधे लैंगिक अस्मितांविषयी आणखी विस्तृत अशी संकल्पनात्मक मांडणी आहे. जसे की, काही व्यक्ती स्वतःला सर्वलैंगिक(पॅनसेक्स्युयल) किंवा अनेकलैंगिक(पॉलीसेक्सुयल) म्हणून ओळख सांगतील किंवा तसे करणारही नाहीत. अमेरिकन मानसशास्त्र परिषदेच्या मतानूसार, लैंगिक कल म्हणजे, व्यक्तिच्या स्वतःला असलेल्या लैंगिक आकर्षणाच्या प्रकारावर त्याबद्दलच्या वर्तनावर आणि ते कोणत्या समुदायाचा समाजाचा भाग आहेत यावर आधारित अस्मितेवर/ओळखीवर आधारीत स्व: ची कल्पना होय. एंड्रोफिलीया आणि गायनोफिलीया ह्या संकल्पना वर्तनअभ्यास शास्त्रामध्ये व्यक्तीच्या लिंगावर आधारीत लैंगिक कलाच्या व्याख्येला म्हणजेच समलिंगी/विषमलिंगी यांना पर्याय म्हणून वापरल्या जातात, कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीच्या पुरुषांप्रती असलेल्या आकर्षणाला एंड्रोफिलीया म्हणले जाते तर स्त्रीयांप्रती असलेल्या लैंगिक आकर्षणाला गायनोफिलीया म्हणतात. लैंगिक प्राधान्ये आणि लैंगिक कल ह्या दोन्हींही संकल्पना सामान्यपणे एकाच अर्थाने वापरल्या जातात परंतु मानसशास्त्रीय संशोधनांमध्ये मात्र या दोन्हींही संकल्पना वेगळ्या अर्थाने वापरतात. लैंगिक प्राधान्ये म्हणजे एखादा उभयलिंगी लैंगिक कल असलेल्या व्यक्तीने एका लिंगाच्या व्यक्तीपेक्षा दुसऱ्या लिंगाच्या व्यक्तीला जास्त प्राधान्य देणे म्हणजेच लैंगिक प्राधान्य होय. लैंगिक प्राध्यान्य हे व्यक्तीच्या लैंगिक निवडीबद्दलचे आहे, त्याच्याच तुलनेत वैज्ञानिक अभ्यासांमध्ये हे सिद्ध झालेले आहे की, लैंगिक कल(सेक्सुयल ओरियेंटशन) ही निवड नसून ती न बदलण्याच्या पातळीवर व्यक्तीच्या अस्मितेत घडत गेलेली स्थीर बाब आहे.

लैंगिक कलाची जडण-घडण

अनेक अभ्यास झालेले असतानाही शास्त्रज्ञांना लैंगिक कल नक्की कसा निर्माण होतो याचे कोडे पूर्णपणे उमगलेले नाही. तरीही लैंगिक कल घडवण्यामधे जनुकीय, संप्रेरके आणि सामाजिक संदर्भांच्या घटकांचा एकत्रित परिणाम होत असतो. अनेक शास्त्रज्ञ जीवशास्त्रीय अभ्यासांना केंद्रस्थानी ठेवून विचार करतात, त्यामुळे ते फक्त जनुकीय घडामोडी, आईच्या पोटात बाळ असतानाच्या आईच्या मानसिक-शारीरिक आंदोलनांचे तिच्या आसपासच्या परिसराचे, किंवा कधी-कधी इतर सामाजिक घडामोडींचा विचारही या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. बाळ जन्माला आल्या नंतर त्याच्यावर त्याच्या आसपासच्या वातावरणाचा परिणाम होण्याबद्दल खुप कमी शास्त्रीय पुरावे सापडतात. मुलांच्या बालपणातील व वाढीच्या वयातील अनुभवांचा किंवा पालकांच्या काही कृतींचा परिणाम मुलांचा लैंगिक कल घडवण्यात सहभागी असतो असे सिद्ध करणारे पुरावे सापडत नाहीत. लैंगिक कलाचे अस्तित्व हे संख्यारेषेसारखेच असते,ज्यामध्ये कमी लैंगिक आकर्षणापासून अगदी पुर्णपणे आकर्षीत होणे अशा वेगवेगळ्या छटा असलेल्या दिसतात.

संदर्भ

Tags:

अलैंगिकता

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पर्यटनदेवेंद्र फडणवीसऔद्योगिक क्रांतीभारताची संविधान सभाकाळूबाईखनिजवासुदेव बळवंत फडकेरचिन रवींद्रलिंगभावगजानन महाराजपानिपतची पहिली लढाईस्त्री सक्षमीकरणब्राझीलचा इतिहाससावित्रीबाई फुलेतेजश्री प्रधानशिखर धवनगुलाबमहाराणा प्रतापधर्मो रक्षति रक्षितःकादंबरीकळसूबाई शिखरकोविड-१९मानवी विकास निर्देशांकबारामती लोकसभा मतदारसंघसमर्थ रामदास स्वामीसोलापूर लोकसभा मतदारसंघ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाअमेरिकेची संयुक्त संस्थानेराम मंदिर (अयोध्या)भारताचे पंतप्रधानगणपती स्तोत्रेपी.व्ही. सिंधूचिकूभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघहरितक्रांतीकालभैरवाष्टकतोरणाराज्यसभासोलापूर जिल्हाजागतिक रंगभूमी दिनगायपाणीपुरवठासूर्यमालाआंग्कोर वाटसोनम वांगचुकक्रिकेट मैदानभारतीय स्वातंत्र्य दिवसबदकनीती आयोगशिखर शिंगणापूरगोळाफेकमराठावनस्पतीदक्षिण दिशामधुमेहसुतार पक्षीमण्यारमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीअनुदिनीसूर्यविधानसभाछत्रपती संभाजीनगर जिल्हामहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेपाऊसकमळद्राक्षभेंडीअंदमान आणि निकोबार बेटेकोरोनाव्हायरसस्त्रीवादी साहित्यराजा राममोहन रॉयगौतम बुद्धगोपाळ गणेश आगरकरभारतीय संविधानाचे कलम ३७०जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)भारतीय समुद्र किनाराविरामचिन्हेगूगल🡆 More