पापुआ न्यू गिनी: ओशिनियामधील देश

पापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य (हिरी मोटू: Papua Niu Gini, टोक पिसिन: Papua Niugini) हा ओशनिया खंडातील एक देश आहे.

पापुआ न्यू गिनी नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला न्यू गिनी बेटाच्या पूर्व भागात व इतर काही छोट्या बेटांवर वसला आहे. न्यू गिनीच्या पश्चिम भागात इंडोनेशिया देशाचे पापुआपश्चिम पापुआ हे दोन प्रांत स्थित आहेत. पोर्ट मॉरेस्बी ही पापुआ न्यू गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

पापुआ न्यू गिनी: ओशिनियामधील देश
पापुआ न्यू गिनी
Independen Stet bilong Papua Niugini
Independent State of Papua New Guinea
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Unity in diversity" (वैविध्यामधील एकता)
राष्ट्रगीत: "O Arise, All You Sons"
पापुआ न्यू गिनीचे स्थान
पापुआ न्यू गिनीचे स्थान
पापुआ न्यू गिनीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पोर्ट मॉरेस्बी
अधिकृत भाषा हिरी मोटू, टोक पिसिन, इंग्लिश
सरकार संसदीय एकाधिकारशाही
 - राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ दुसरी
 - पंतप्रधान पीटर ओ'नील
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १६ सप्टेंबर १९७५ (ऑस्ट्रेलियापासून
क्षेत्रफळ
 - एकूण ४,६२,८४० किमी (५६वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ७०,५९,६५३ (१०२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९.८२८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,८३४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.४९१ (कमी) (१५७ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन पापुआ न्यू गिनीयन किना
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व ऑस्ट्रेलियन प्रमाणवेळ (यूटीसी+१०:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ PG
आंतरजाल प्रत्यय .pg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६७५
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


पापुआ न्यू गिनी: ओशिनियामधील देश
पापुआ न्यू गिनीमधील एक स्थानिक अदिवासी

पापुआ न्यू गिनी जगातील सर्वाधिक सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशांपैकी एक असून येथे एकूण ८४८ भाषा वापरात आहेत. तसेच येथील ग्रामीण व अदिवासी लोकवस्तीचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. पापुआ न्यू गिनीमधील केवळ १८ टक्के रहिवासी शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच येथील अनेक दुर्गम भागांमध्ये कित्येक अज्ञात वनस्पती व प्राणी असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

न्यू गिनी बेटावर अनेक सहस्त्रकांपासून कृषीप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. अनेक दशकांदरम्यान हा भूभाग युरोपीय शोधकांसाठी पुष्कळसा अज्ञात होता. १८८४ साली पापुआ न्यू गिनीच्या उत्तर भागावर जर्मन साम्राज्याचे अधिपत्य होते (जर्मन न्यू गिनी) तर दक्षिणेकडे ब्रिटनची सत्ता (ब्रिटिश न्यू गिनी) होती. इ.स. १९०४ मध्ये ब्रिटनने सत्ता ऑस्ट्रेलियाकडे सुपुर्त केली व १९०५ मध्ये ब्रिटिश न्यू गिनीचे नाव टेरिटोरी ऑफ पापुआ असे ठेवले गेले. पहिल्या महायुद्धादरम्यान ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीवर कब्जा केला. पुढील अनेक वर्षे पापुआ व न्यू गिनी हे वेगळे प्रशासकीय प्रदेश होते. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४९ साली ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून टेरिटोरी ऑफ पापुआ ॲन्ड न्यू गिनी नावाचा प्रदेश स्थापन केला गेला ज्याचे नाव पुढील काळात केवळ पापुआ न्यू गिनी असेच राहिले. १६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनीला स्वातंत्र्य मिळाले.

सध्या पापुआ न्यू गिनी राष्ट्रकुल क्षेत्रामधील एक देश असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे. येथील प्रचंड मोठ्या खाणकाम उद्योगामुळे २०११ साली पापुआ न्यू गिनी जगातील सहाव्या क्रमांकाचा झपाट्याने प्रगती करणारा देश होता. परंतु येथील अर्थव्यवस्था कमकूवत असून पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

बाह्य दुवे

पापुआ न्यू गिनी: ओशिनियामधील देश 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंडोनेशियाऑस्ट्रेलियाओशनियादेशन्यू गिनीपश्चिम पापुआपापुआपोर्ट मॉरेस्बीप्रशांत महासागरराजधानी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

फुटबॉलऔरंगजेबवर्णनात्मक भाषाशास्त्रकार्ल मार्क्समहालक्ष्मीपुणेमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतूळ रासवित्त आयोगकन्या रासकापूसमराठी भाषा गौरव दिनमेळघाट विधानसभा मतदारसंघदूरदर्शनभारतीय लोकशाहीपोहणेभाषालंकारस्थानिक स्वराज्य संस्थानागपूरशेतकरी कामगार पक्षमहाराष्ट्रसम्राट अशोकआंतरराष्ट्रीय नाणेनिधीगर्भाशयफुफ्फुसदशावतारनवनीत राणामराठा साम्राज्यज्योतिबाराजगडजालियनवाला बाग हत्याकांडवृषभ रासचाफानक्षलवादसुभाषचंद्र बोसअहिल्याबाई होळकरमराठी लिपीतील वर्णमालाराजगृहनृत्यमहाराष्ट्र भूषण पुरस्काररोहित पवारमोरपोक्सो कायदाव्यवस्थापनमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळकावीळधोंडो केशव कर्वेजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमूलद्रव्यहिंदू धर्मातील अंतिम विधीसंदिपान भुमरे३३ कोटी देवभाषापंजाबराव देशमुखचीनजालना लोकसभा मतदारसंघचंद्रहिमोग्लोबिनवसुंधरा दिनराजदत्तविष्णुसहस्रनामईशान्य दिशावसंतराव दादा पाटीलत्रिरत्न वंदनाभारतातील समाजसुधारकजिल्हा परिषदभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभारताच्या राष्ट्रपतींची यादीव्हॉट्सॲप२०१९ पुलवामा हल्लालोकसभामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीकुष्ठरोगविधान परिषदझाडबाळ ठाकरेखरबूजपुरंदरचा तहलक्ष्मी🡆 More