कुष्ठरोग: मोठा आजार

कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे.

याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता , नाकाची अंतत्त्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. चेतांच्या टोकावर परिणाम झाल्याने परिणाम झालेल्या भागाची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता पायाची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. हात पाय विद्रूप होणे हे या रोगात प्रामुख़्याने आढळते. कुष्ठरोगींना सरकार मार्फत सुविधा पुरवल्या जातात.

वर्णन

हॅन्सन या शात्रज्ञाच्या नावावरून कुष्ठरोग ओळखला जातो. 1873 साली त्याने या रोगाचा कारक “मायकोबॅक्टेरियम लेप्रि”चा शोध लावला. या जिवाणूच्या संसर्गाने त्वचेमध्ये अस्वाभाविक बदल होतात. या बदलास विकृतिस्थल म्हणतात. त्वचेवरील हे भाग वेड्यावाकड्या आकाराचे आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यांची कड गडद रंगाची आणि मध्यभाग फिकट रंगाचा दिसतो. मायकोबॅक्टेरियम लेप्रि कमी तापमानास वाढतो. त्यामुळे त्वचा, अंतत्त्वचा आणि चेता यामध्ये तो वाढतो. चेतामध्ये वाढल्याने चेता नष्ट होतात आणि त्या भागाची संवेदना नाहिशी होते. हातापायांच्या बोटांची संवेदना नाहिशी झाली म्हणजे त्याना इजा होण्याची शक्यता वाढते. इजा झाल्यास जखमामध्ये जिवाणू वाढतात आणि उघड्या जखमा होतात. उघड्या जखमांचे पर्यावसान गॅंग्रीनमध्ये झाल्याने उती मृत होतात. अशाने अवयव विद्रूप होतात. शरीर विद्रूप झाल्याने दोन हजार वर्षापूर्वी बायबल काळात कुष्ठरोग हा ओंगळवाणा रोग अशी त्याची ख्याती होती. बायबलच्या जुन्या काळात याचा उल्लेख आहे. या काळात कुष्ठरोगाचे रुग्ण समाजापासून वेगळे ठेवले जात. त्यांच्यासाठी वेगळ्या वस्त्या असत. अजून समाजात या रोगाबाबत हिन भावना आहे. हा रोग वेगाने पसरणारा संसर्गजन्य नाही. त्याची वाढ अत्यंत सावकाश होते. घरामधील रुग्णाचा वावर आणि कुष्ठरोग्याची तपासणी करणारा वैद्यकीय कर्मचारी यांच्यापासून तो पसरत नाही. तो पूर्णपणे बरा होतो. कुष्ठरोगावरील उपचार दीर्घ मुदतीचे आणि बहु उपचारी आहेत.

रुग्ण संख्या

इ.स. २००० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार कुष्ठरोग्यांची संख्या सहा लाख आहे. यातील सत्तर टक्के रुग्ण भारत, इंडोनेशिया आणि म्यानमार मध्ये आहेत. कुष्ठ रोग हा सततच्या संपर्काने एकापासून दुसऱ्यास होतो. पश्चिमी देशात काहीं ठिकाणी याचा प्रादुर्भाव आहे. अनेक वर्षे फक्त मानवामध्ये आढळणारा हा रोग 15 टक्के आरर्मॅडिलो नावाच्या अंगावर खवल्यांच्या सात किंवा नऊ ओळी असलेल्या सस्तन प्राण्याना एम लेप्रिची लागण झाल्याचे आढळले आहे.

कारणे

कृष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्रि नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा जिवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलिसारखा आहे. मा. ट्युबरक्युलिमुळे क्षय होतो. हे दोन्ही जिवाणू सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्यासाठी असिड फ़ास्ट विरंजक वापरावे लागते. त्यामुळे यास असिड फास्ट जिवाणू असेही म्हणतात. मायकोबॅक्टेरियम लेप्रीचा शरीरात शिरकाव झाल्याच्या दोन प्रतिक्रिया होतात. यातील ट्युबरक्युलिड लेप्री हा तुलनेने सौम्य रोग आहे. शरीराची प्रतिकार यंत्रणा ज्या ठिकाणी मा. ट्युबरक्युलिड लेप्रीचा शिरकाव झाला आहे त्या ठिकाणी त्यास अटकाव करते. त्याचा प्रसार शरीरात इतर ठिकाणी होणार नाही यासाठीची ही उपाययोजना आहे. ही यंत्रणा शरीराच्या त्वचेमध्ये खोलवर कार्य करीत असल्याने केसांची मुळे, घाम येणा-या ग्रंथी, आणि संवेदी चेता यांचा नाश होतो. परिणामी त्वचा कोरडी आणि रंगहीन बनते. त्वचा संवेदनहीन झाल्याने स्पर्शज्ञान होत नाही. चेहरा, हात आणि पायाच्या चेता आकाराने मोठ्या होतात. डॉकटराना त्या जाणवतात. चेता हातास जाणवणे हे टीटी (ट्युबरक्युलिड लेप्रसी)चे लक्षण आहे. या प्रकारात टीटी जिवाणूंची संख्या कमी असल्याने यास पॉसिबॅसिलरी लेप्रसी असेही म्हणतात. सत्तर टक्के कृष्ठरोगाचे रुग्ण या प्रकारातील आहेत.

लेप्रोमॅटस कुष्ठरोग (एलएल) हा रोगाचा दुसरा प्रकार अधिक संसर्गजन्य आहे. प्रतिकार यंत्रणा या रोगापासून बचाव करण्यास अपुरी पडते. त्यामुळे कृष्ठारोगाचे जिवाणू त्वचेमध्ये वाढतात. या प्रकारास बहुजिवाणूजन्य कृष्ठारोग म्हणतात.(एम बी- मल्टिबॅसिलरी) . कृष्ठरोगाचे वैशिष्ट्य म्हणजे शरीरात उत्पन्न होणाऱ्या गाठी. सर्व शरीरभर आणि चेह-यावर या गाठी येतात. कधीकधी डोळे, नाक आणि घशामधील अंतत्त्वचेवर गाठी येतात. चेह-यावर आलेल्या गाठीमुळे चेहरा सिंहासारखा दिसायला लागतो. एमबी कृष्ठरोगामुळे अंधत्व, आवाजात बदल, नाकाचा आकार बदलणे होऊ शकते. एमबी कृष्ठरोगाचा संसर्ग एका रुग्णापासून दुसऱ्याकडे केंव्हाही होऊ शकतो. लहान मुलामध्ये याची लागण लवकर होते.

लक्षणे

त्वचेवरील चट्टे संवेदनाहीन होणे हे कुष्ठरोगाचे पहिले लक्षण आहे. एलएल कुष्ठरोगामध्ये नाकाचा आकार मोठा होतो. नाकाच्या अंतत्त्वचेमध्ये कुष्ठरोगाच्या गाठी आल्याने हा परिणाम होतो. चेह-यावर आणि शरीरभर गाठी हे दुसरे लक्षण. कुष्ठ रोग्याना वेदना होत नाहीत असा सर्वसाधारण समज असला तरी परिघवर्ती चेतांच्या टोकांचा दाह होणे ही बहुतेक रोग्यांची नेहमीची तक्रार आहे. दाह कमी करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉइड्स द्यावी लागतात. कुष्ठरोगाच्या जिवाणूचा अदृश्यता कालावधी सहा महिन्यापासून दहा वर्षे असू शकतो. सरासरी चार ट्युबरक्युलर कुष्ठरोगाची लक्षणे सरासरी चार वर्षामध्ये दिसू लागतात. त्या मानाने एलएल कुष्ठरोग सावकाशपणे पसरत असल्याने त्याची लक्षणे दिसायला सात-आठ वर्षे लागतात.

कुष्ठरोगाचा जिवाणू एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये कसा पसरतो हे अजून नीट्से समजले नाही. पन्नास टक्के व्यक्तीमध्ये कुटुंबातील एका व्यक्तीपासून दुसऱ्यास कुष्ठरोग झाल्याचे आढळले आहे. उपचार न घेतलेल्या रुग्णाच्या नाकातील स्त्रावामध्ये मोठ्या संख्येने एम लेप्रि असतात. त्यामुळे नाकातील स्त्रावामधून जिवाणू संसर्ग होतो. सौम्य कुष्ठरोगाचे जिवाणू कीटकामार्फत अथवा दूषित मातीमधून पसरत असावेत. कुष्ठरोगाचे प्रमाण आणि गरिवी यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे अनारोग्य, गर्दी आणि कुपोषण यामुळे कुष्टरोग्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. कुष्ठरोग होण्याचे जनुकीय कारण असावे असे वाटते. मोठया व्हिएतनामी कुटुंबाचा जनुकीय अभ्यास केल्यानंतर सहाव्या गुणसूत्रावरील मोठ्या भागावरील क्यू 25 या ठिकाणी कुष्ठरोग प्रवण जनुक सापडले आहे. यापुढील अभ्यासात कुष्ठरोग प्रवणता कंपवाताच्या (पर्किनसन) आनुवंशिकतेबरोबर कार्यरत आहे असे आढळले.

निदान

कुष्ठ रोगाचे जिवाणू असिड फास्ट बॅसिलस त्वचा, नाकातील स्त्राव, किंवा उतींच्या स्त्रावामध्ये रंजक पट्टी चाचणीमध्ये दिसतात. एल एल जिवाणू सहज चाचणीमध्ये दिसतात. पण टीटी जिवाणूंची संख्या अत्यंत कमी असते. ते सहजासहजी ओळखता येत नाहीत. अशा वेळी वैद्यकीय लक्षणावरून निदान करावे लागते. त्वचेवरील चट्ट्यांची स्थिति आणि रुग्णाचा कुष्ठरोग प्रवण भागात असलेला सहवास याची खात्री करून घेतात. कुष्ठरोगाची लक्षणे आरोग्य कर्मचा-याना थोड्या दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सहज ओळखता येतात. अगदी थोड्या रुग्णाना प्रयोगशाळेत निदान करून घ्यावे लागते. कुष्टरोग प्रवण भागामध्ये ॲेसिड फास्ट बॅसिलस काचपट्टी परीक्षण, त्वचेवरील चट्टे , चट्ट्याच्या मध्यभागी असलेला फिकट रंग आणि चट्ट्याची संवेदन हीनता हे लक्षण मानण्यात येते. जाड झालेल्या चेता आणि स्नायू दौर्बल्य हे कुष्ठरोगाचे नेमके लक्षण असते. कुष्ठरोग्याना खाली सोडलेले पाऊल वर उचलता येत नाही तसेच चालण्यात दोष उत्पन्न होतो.

उपचार

सर्वात प्रचलित कुष्ठरोगावरील उपचारामध्ये डॅप्सोन हे औषध दिले जात असे. जेंव्हा हे औषध नव्याने वापरात आले त्या वेळी त्याची परिणामकता उत्तम होती. पण काहीं वर्षामध्ये डॅप्सोन प्रतिकार जिवाणू आढळल्यानंतर बहु उपचार पद्धती वापरण्यात येऊ लागली. या उपचार पद्धतीचे लघुरूप एमडीटी (मल्टि ड्र्ग थेरपी) असे आहे. एमडीटी मध्ये डॅप्सोन, रिफांपिन (रिफंमिसिन) आणि क्लोफॅझिमिन (लॅम्प्रीन) या तीन जिवाणूप्रतिबंधक औषधांचा उपयोग करण्यात येतो. एमबी कुष्ठरोगावर तीनही औषधे देण्यात येतात. पीबी कुष्ठरोगावर मात्र फक्त रिफांपिन आणि डॅप्सोनचा वापर करण्यात येतो. तीन महिन्यांच्या उपचारानंतर रुग्णाचा संसर्ग कमी व्हायला लागतो. उपचार चालू करण्याआधी बरेच रुग्ण संसर्गजन्य असत नाहीत. कुष्ठरोगाच्या प्रकारानुसार सहा महिने ते दोन वर्षे कुष्ठरोगावर उपचार घ्यावे लागतात. कुष्ठरोगाच्या दोन्ही औषधांचा थोडा पार्श्व परिणाम होतो. डप्सोनमुळे मळमळ, गुंगी, हृदयगति वृद्धि, कावीळ आणि अंगावर पुरळ येऊ शकतात. पुरळ आल्यास त्वरिय वैद्यकीय सल्ला घ्यावा. डॅप्सोनची रिफांपिन बरोबर आंतरक्रिया होते. रिफाम्पिन डॅपसोनच्या शरीरातील चयापचयाचा वेग वाढवते. त्यामुळे डॅपसोनचा डोस ॲयडजेस्ट करावा लागतो. रिफांपिन मुळे स्नायूदुखी आणि मळमळ सुरू होते. कावीळ किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. तिसरे औषध क्लोफॅझिमिन मुळे पोटात तीव्र वेदना आणि अतिसार होतो. कधी कधी त्वचेचा रंग बदलतो. तांबडा ते काळसर बदललेला त्वचेचा रंग पूर्ववत होण्यास औषध बंदा केल्यानंतर बरीच वर्षे लागतात. थॅलिडोमाइड नावाचे जन्मजात दोष उत्पन्न होण्याबद्दलचे कुप्रसिद्ध औषध सध्या कुष्ठरोगाची गुंतागुंत कमी करते. थॅलिडोमाइड शरीरातील ट्यूमर विघटन यंत्रणा नियंत्रित करते. कुष्ठरोगाच्या रुग्णाना उपचार चालू असता गंभीर प्रतिकार यंत्रणा होण्यास तोंड ध्यावे लागते. याला लेप्रि रिॲ.क्शन असे म्हणतात. प्रतिजैविकामुळे एम लेप्रि जिवाणूच्या पेशीपटलावरील प्रथिनामुळे शरीराची प्रतिकार यंत्रणा कार्यांवित होते. काहीं व्यक्तीमध्ये प्रतिपिंड आणि एम लेप्रिच्या प्रतिजनाबरोबर एकत्र येतात त्यामुळे त्वचेवर नव्याने चट्टे येणे आणि चेता तंतूंची टोके नष्ट होणे असे होऊ शकते. या प्रकारास इरिथेमा नोडोसम लेप्रोसम म्हणतात. कॉर्टिसोन औषधांचा वापरआणि थॅलिडोमाइडचा वापर केल्यास लेप्रा रिॲेक्शन आटोक्यात येते. काहीं रुग्णामध्ये उअपचारादरम्यान झालेले तीव्र आंत्र व्रण त्वचा रोपणाने बरे होतात.

पूर्वानुमान

कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. चेतामध्ये आणि अवयवामध्ये झालेले बदल प्रत्येक वेळी दुरुस्त करता येत नाहीत. कुष्ठरोग्याचे पुनर्वसन हा कुष्टरोगाच्या उपचारचा अविभाज्य भाग आहे. पुनरर्चना शस्त्रक्रिया, बिघडलेले अवयव दुरुस्त करणे हे अवघड कार्य शल्यतज्ञाना करावे लागते. कधी कधी अवयव पुन्हा कार्य करण्यापलिकडे गेलेले असल्याने शस्त्रक्रियेचा उपयोग होत नाही. सर्वकष उपचारामध्ये रुग्णास स्वावलंबी बनविण्यावर भर दिलेला असतो. चेता मध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला असल्यास अवयवामध्ये विकृती येण्याची शक्यता असते. संवेदना रहित अवयवाची काळजी घेणे याचे प्रशिक्षण रुग्णाना द्यावे लागते. (मधुमेही रुग्णामध्ये पायाची काळजी घेण्यास शिकवले जाते) हातापायांच्या जखमा असल्यास त्यावर त्वरित उपाययोजना करावी लागते. पायाच्या जखमेकडे दुर्लक्ष केल्यास जखमा जिवाणुसंसर्गाने चिघळतात. भौतिक चिकित्सा उपायाने हाता पायाची बोटे कार्यक्षम ठेवण्यास मदत होते. भारतात अशा रुग्णाना हातमागाचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे हात आणि पाय कार्यक्षम राहण्यास मदत होते. हात आणि पायाना आधार देण्यासाठी पूर्वरचित भाग बांधल्याने अवयवामधील सामान्य बिघाड आटोक्यात येतात. कुष्ठरोग्यासाठी खास पद्धतीची पादत्राणे बनवली आहेत. त्यामुळे पायास व्रण होणे टळते. प्रतिबंध: त्वरित निदान आणि उपचार केल्याने इतिहास काळातील या रोगावर मात केली आहे. कुष्ठरोग्याशी संपर्क आलेल्या व्यक्तीची तपासणी हा नवे रुग्ण होण्याचे थांबवण्याचा उत्तम मार्ग आहे. अशा व्यक्तींची सतत पाच वर्षे तपासणी करणे गरजेचे आहे. काहीं ठिकाणी रुग्णाच्या सहवासातील व्यक्तीना प्रतिबंधक उपाय म्हणून डॅपसोन उपचार दिले जातात.

इतर माहिती

बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न केले.

Tags:

कुष्ठरोग वर्णनकुष्ठरोग रुग्ण संख्याकुष्ठरोग कारणेकुष्ठरोग लक्षणेकुष्ठरोग निदानकुष्ठरोग उपचारकुष्ठरोग पूर्वानुमानकुष्ठरोग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय लष्करमटकाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेक्रियापदजिल्हा परिषदस्वामी विवेकानंदप्राणायामलहुजी राघोजी साळवेजळगाव लोकसभा मतदारसंघथोरले बाजीराव पेशवेभारताची फाळणीमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीमराठी भाषासंगीत नाटकबहिणाबाई पाठक (संत)नितंबसमर्थ रामदास स्वामीएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)म्हणीकुत्रातानाजी मालुसरेगोविंद विनायक करंदीकरजैन धर्मबीड जिल्हानांदेड लोकसभा मतदारसंघसंगणक विज्ञानमहिलांसाठीचे कायदेमृत्युंजय (कादंबरी)मुळाक्षरसप्त चिरंजीवविठ्ठल रामजी शिंदेआमदारराज ठाकरेपरभणी जिल्हाभिवंडी लोकसभा मतदारसंघसज्जनगडमुखपृष्ठगोलमेज परिषदबीड विधानसभा मतदारसंघछावा (कादंबरी)राजगडकुणबीपांढर्‍या रक्त पेशीभारतातील शेती पद्धतीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रज्ञा विवर्धन स्तोत्ररत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघशुभेच्छाकरजागतिक दिवसविष्णुभारतातील सण व उत्सवसावित्रीबाई फुलेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीभारताचे पंतप्रधानस्त्री सक्षमीकरणसम्राट अशोकमारुती स्तोत्रजिजाबाई शहाजी भोसलेसातव्या मुलीची सातवी मुलगीसंत तुकारामरामकापूसहनुमान चालीसाराजगृहबाळशास्त्री जांभेकरबहावाखंडोबाजगदीश खेबुडकरपरभणी विधानसभा मतदारसंघरावेर लोकसभा मतदारसंघ३३ कोटी देववर्तुळभाषालंकारकोकणनैसर्गिक पर्यावरणकृष्णा नदी🡆 More