कापूस: प्रमुख नगदी पीक

कापूस हा वनस्पतीपासून मिळणारा आणि सेल्युलोजयुक्त तंतू पूर्वापार मोठय़ा प्रमाणात वापरला जाणारा धागा आहे.

कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो.कापसाला पांढरे सोने (white gold) म्हटल्या जाते. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याला 'पांढऱ्या सोन्याचा जिल्हा' म्हणून ओळखल्या जाते.

कापूस: इतिहास, उत्पादन, भारत
पेरणीसाठी वापरण्यात येणारे कापसाचे बियाणे
कापूस: इतिहास, उत्पादन, भारत
कापसाचे झाड
कापूस: इतिहास, उत्पादन, भारत
कापसाचे बोंड
कापूस: इतिहास, उत्पादन, भारत
बोंडातुन निघालेला कापूस

कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य व्यवसायांत वापर होतो.

कापसामध्ये जवळपास ९५% सेल्युलोज (Cellulose) असते.कपसाच्या एका नवीन जातीचा शोध लागला आहे नाव आहे सावरी.

मराठी-हिंदीमध्ये कापसाला रुई अस प्रतिशब्द आहे. मात्र रुई (Calotropis Procera) या विषारी वनस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही. असे असले तरी रुईच्या झाडापासूनही एक प्रकारचा अतिशय मऊ कापूस मिळतो, त्याच्या गाद्या-उश्या करतात. रुईच्या झाडापासून निसटलेला हा मऊ कापूस दशदिशांना उधळत असतो.

इतिहास

साधारणत: इसवी सन पूर्व ७००० वर्षापूर्वीपासून भारतीय उपखंडात कापसाची शेती केली जाते. याचा पुरावा पाकिस्तानातील मेहरगढ या ठिकाणी झालेल्या उत्खननातून मिळाला. हजारो वर्षांपूर्वी प्राचीन भारत, चीन आणि इजिप्तमध्ये कापसाच्या धाग्यांपासून कपडे तयार केले जात.

कापसापासून मिळणारे धागे पाच प्रकारचे असतात - अतिशय लांब (१-३/८ इंच आणि त्याहून लांब), लांब (१-१/८ इंच ते १-११/३२ इंच, Gossypium barbadense), मध्यम लांब (१-१/३२ इंच ते १-३/३२ इंच), मध्यम (१३/१६ इंच ते १ इंच) आणि आखूड-(१३/१६ इंचापेक्षा कमी, Gossypium herbaceum)..

कापूस: इतिहास, उत्पादन, भारत 
कापूस-वेचणी

उत्पादन

अमेरिका, अर्जेंटिना, उजबेकिस्तान, ऑस्ट्रेलिया, चीन, तुर्कस्थान, तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान, ब्राझील, भारत या देशांमध्ये कापूस पिकतो. अमेरिकेच्या राष्ट्रीय कापूस परिषद २०११ च्या अहवालानुसार जगातील पाच अग्रेसर कापूस उत्पादक : १. अमेरिका २. भारत, ३. ब्राझील, ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. उझबेकिस्तान हे होत.

कापूस: इतिहास, उत्पादन, भारत 
गुजरातमधील कापूस उत्पादन

भारत

जगातील कपाशीखालील क्षेत्राच्या एक चतुर्थांश क्षेत्र भारतात कापूस लागवडीखाली आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतात. तसेच गुजरात, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांतही कापसाची लागवड केली जाते

कापसाच्या जातीचे शास्त्रीय नाव गॉसिपियम आहे. व्यापारी तत्त्वावर वापरला जाणाऱ्या कापसाची झाडे बहुधा गॉसिपियम हिर्सुटमगॉसिपियम बार्बाडेन्स या दोन उपजातींची असतात.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. विदर्भात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार मृदा व कोरडे हवामान असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणतात. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. महाराष्ट्रात अकोला येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.[ संदर्भ हवा ]

कापसाच्या आधुनिक जाती

  • Bacillus thuringiensis Cotton-B.T. Cotton. जेनेटिकली माॅडिफाईड-जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेल्या कापसाला बी.टी. काॅटन म्हणतात. इजिप्शियन

कापूस या पिकावरील रोग

  • मूळकूज
  • दह्या
  • कवडी
  • पानावरील काळे ठिपके
  • बोंडावरील काळे ठिपके
  • करपा

शेवटचे तिन्ही रोग कवकजन्य आहेत.

अर्थकारण

सहकार

सहकारी संस्थामुळे कापसाच्या अर्थकारणाची वाट लागली

कापूस या विषयावरील मराठी पुस्तके

  • कापूस उत्पादन आणि उद्योग (भा.अ. फडणीस)
  • कापूस खोडवा (ना.धों. महानोर)
  • कापूस लागवड तंत्र बी. टी. कॉटनसह (रवींद्र काटोले)
  • कापूस-सरकीपासून सुतापर्यंत (लेखक : राजीव जोशी)

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

कापूस इतिहासकापूस उत्पादनकापूस भारतकापूस कापसाच्या आधुनिक जातीकापूस या पिकावरील रोगकापूस या विषयावरील मराठी पुस्तकेकापूस संदर्भकापूस बाह्य दुवेकापूस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नांदेडपुणेज्योतिबासामाजिक कार्यनिबंधपंचायत समितीतानाजी मालुसरेमहाराष्ट्र शासनसंजय हरीभाऊ जाधववसुंधरा दिनभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्ह२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकायशवंतराव चव्हाणराणी लक्ष्मीबाईमराठी भाषेमधील वृत्तपत्रेगुढीपाडवामौर्य साम्राज्यराज्य निवडणूक आयोगखरबूजरायगड जिल्हागर्भाशयराजगडफेसबुकबाळ ठाकरेसाखरयवतमाळ जिल्हापर्यावरणशास्त्रधर्मो रक्षति रक्षितःनागपूर लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळप्रसूतीलता मंगेशकरशिर्डी लोकसभा मतदारसंघपंजाबराव देशमुखभारतीय रेल्वेस्वादुपिंडयकृतकालभैरवाष्टकजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)अमरावतीबाळशास्त्री जांभेकरकोल्हापूर जिल्हाभारतीय संस्कृतीतुकडोजी महाराजजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)कावीळहस्तमैथुनसचिन तेंडुलकरखासदारपथनाट्यसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअजिंठा लेणीभारताचा इतिहासआयुर्वेदव्यंजनपवनदीप राजनदिवाळीराजगृहसंशोधनभारतातील राजकीय पक्षप्रकाश आंबेडकरसामाजिक समूहनामदेवस्त्रीशिक्षणअर्जुन वृक्षसंस्कृतीविराट कोहलीबुद्ध पौर्णिमात्र्यंबकेश्वररेणुकागोलमेज परिषदमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीजागतिक तापमानवाढपारनेर विधानसभा मतदारसंघगोत्रचैत्र पौर्णिमाऋग्वेदज्योतिबा मंदिर🡆 More