अर्थशास्त्र: एक सामाजिक शास्त्र

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते.

इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द (Oikonomia) ओईकोनोमिया पासून आला आहे. ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे. अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात. हे अर्थशास्त्र राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.

आर्य चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर आधारित 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजकारण, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक' असे संबोधले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ १७७६ मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.

अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषांनुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अंशलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अंशलक्षी अर्थशास्त्र विशिष्ट माणूस, विशिष्ट कुटुंब किंवा विशिष्ट आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे. अर्थिक कल्याण याचा पैशाच्या संदर्भातील मोजमापांशी संबध असतो.

सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास ॲडम स्मिथ यांच्यापासून झाला.अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयात अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. कल्याणाबाबत कसोट्या तयार करणे व अर्थिक धोरणास मदत करणे हे विश्लेषणात्मक काम करणाऱ्या अर्थशास्त्राच्या शाखेस कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. कल्याणकारी शास्त्राची सुरुवात पिंगू नावाच्या अर्थतज्ज्ञाने केली. कल्याण हा शब्द पिंगूनेच मांडला. पिंगूच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते..

सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यांदा रॅग्नर फ्रिश यांनी इ.स. १९३३ साली केला.

अर्थतज्ज्ञ मराठी माहिती

बाबासाहेब आंबेडकर, ॲडम स्मिथ, जॉन मेनार्ड केन्स, कार्ल मार्क्स, डेव्हिड रिकार्डो, मिल्टन फ्रिडमन, पॉल क्रुगमन, पॉल सॅम्युलसन, अमर्त्य सेन, जोसेफ स्टिग्लिट्झ इत्यादी अर्थशास्त्रज्ञ प्रसिद्ध आहेत.

ॲडम स्मिथ याच्यापासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात झाली. भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्याने पुरस्कार केला. "बाजारपेठेतील  घटकावर कुठलेही  नियंत्रण ठेवु नये. या घटकावर बाजारच स्वतः नियंत्रण ठेवत असतो" असे मत त्याने मांडले ,जणू काही बाजाराला स्वतःचा एक अदृश्य हात असतो असा सिद्धांत त्याने मांडला. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या १७७६ मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती (इंक्वायरी ॲन्ड कॉसेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स) या ग्रंथात मांडली आणि त्यांच्यामते अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे.

ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येतील महत्त्वाचे मुद्दे:

  1. निर हस्तक्षेपाचे धोरण
  2. भांडवल व संपत्तीचा साठा
  3. आर्थिक घडामोडींमध्ये नैसर्गिक नियम
  4. वृद्धीच्या सिद्धांतामध्ये "श्रमविभाजन" या विशिष्ट पैलूला महत्त्व

सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. मक्तेदारीयुक्त स्पर्धांची संकल्पना व गट संकल्पना या सिंबार्लिनने पहिल्यांदा मांडल्या. माल्थसच्या मते अन्नधान्याचे उत्पादन अंकगणिती श्रेणीने वाढते, तर लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते. प्रा मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे (प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स) हे पुस्तक १८९० साली प्रकाशित केले. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो.

मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे:

  1. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास
  2. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र
  3. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास
  4. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही

शाखा

अर्थशास्त्राच्या काही प्रमुख शाखा :

  1. कृषी अर्थशास्त्र
  2. विकास आणि संशोधन अर्थशास्त्र
  3. आंतराष्टीय  अर्थशास्त्र
  4. स्थूल अर्थशास्त्र
  5. सूक्ष्म  अर्थशास्त्र
  6. सार्वजानिक आयव्यय
  7. गणिती  अर्थशास्त्र
  8. वर्तुणुकीचे  अर्थशास्त्र
  9. पर्यावरणीय अर्थशास्त्र
  10. अर्थमिती
  11. श्रमाचे अर्थशास्त्र
  12. मौद्रिक अर्थशास्त्र

अर्थशास्त्रावरची काही पुस्तके

  • अर्थशास्त्र संज्ञा - सिद्धान्त कोश (डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी) - या कोशात अर्थशास्त्रातील संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्तांचे स्पष्टीकरण वगैरे माहिती दिली आहे. (प्रकाशक - सुनिधी पब्लिशर्स)
  • डायमंड अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - डायमंड प्रकाशन, लेखक व्ही.जी. गोडबोले).
  • अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी, संपादक जी.आर. वर्मा)
  • अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; हिंदी-इंग्रजी. लेखक बारबरा कोल्म, राजपाल प्रकाशन)
  • अर्थशास्त्र शब्दकोश (हिंदी, लेखक - सी.एस. बरला) (प्रकाशक जैन प्रकाशन नंदिर, जयपूर)
  • अर्थशास्त्र एवं वाणिज्यशास्त्र का पारिभाषिक शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; लेखक - राज दत्त आणि रुद्र दत्त; प्रकाशन - एस.चंद पब्लिशिंग)
  • अर्थशास्त्र परिभाषा कोश (हिंदी, लेखक - सुदर्शन कुमार कपूर; प्रकाशक - राजकमल प्रकाशन)
  • डायमंड बँक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
  • सुक्ष्म अशास्त्र {डाॅ. एस व्ही ढमढेरे) micro Economic
  • अर्थक्षेत्रातील मराठी तारे (उदय कुलकर्णी)
  • गुंतवणूक गाथा (गोपाल गलगली)
  • ग्यानवाचे अर्थशास्त्र (न.वि. गाडगीळ)
  • जागतिक अर्थकारणाचे नवे संदर्भ (सी. पं. खेर)
  • नव्या जगाचे अर्थकारण (डॉ. मधुसूदन साठे)
  • पतसंस्था व्यवस्थापन (डॉ. अविनाश शाळीग्राम)
  • डायमंड बँक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
  • बँकिंग जिज्ञासा (वंदना धर्माधिकारी)
  • भटकंती (रमेश पाध्ये)
  • भारतातील बँक कायदे आणि व्यवहार पद्धती (थॉमस दियोग फर्नांडिस)
  • भारतीय अर्थव्यवस्था (सतीश श्रीवास्तव)
  • मैत्री बँकिंगशी (वंदना धर्माधिकारी)
  • शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (प्रा. नामदेवराव जाधव)
  • संघराज्याचा वित्त व्यवहार भाग १, २, ३ (डॉ. मधुसूदन साठे)
  • सी. ई. ओ. भूमिका व जबाबदारी (माधव गोगटे)
  • सूक्ष्म अर्थशास्त्र (डॉ. पुष्पा तायडे)
  • अर्थात (अच्युत गोडबोले  )
  • भारतीय अर्थव्यवस्था (देसाई ,भालेराव)

हे सुद्धा पहा

Tags:

अर्थशास्त्र अर्थतज्ज्ञ मराठी माहितीअर्थशास्त्र शाखाअर्थशास्त्र ावरची काही पुस्तकेअर्थशास्त्र हे सुद्धा पहाअर्थशास्त्रअर्थतज्ज्ञअर्थशास्त्रज्ञग्रीक भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रशासनशास्त्रयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तनक्षलवादम्हणीपृथ्वीच्या अंतरंगाची रचनामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीरामसर परिषदमहाभारतमराठी संतकृष्णतुतारीखो-खोसर्वनामस्वामी समर्थसंवादमूळव्याधरामोशीकावीळरस (सौंदर्यशास्त्र)मराठवाडाज्ञानेश्वरनामदेवनर्मदा नदीभारतीय लष्करसुशीलकुमार शिंदेरामजी सकपाळपांडुरंग सदाशिव सानेबहिणाबाई चौधरीपंचायत समितीराशीनृत्यबडनेरा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रसम्राट अशोकराकेश बापटन्यूटनचे गतीचे नियममहाराष्ट्रातील धरणांची यादीशहाजीराजे भोसलेसमाजशास्त्रमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रशेतीमराठा साम्राज्यभारताचा इतिहासविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीनारळनगर परिषदसुतकनिबंधलावणीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघचक्रधरस्वामीग्राहकमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीरावणदिनेश कार्तिककार्ल मार्क्सबुलढाणा जिल्हाह्या गोजिरवाण्या घरातपरभणी विधानसभा मतदारसंघदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघरामबोधिसत्वकर्जत विधानसभा मतदारसंघमुळाक्षरब्राह्मण समाजनाचणीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाहिमालयमहात्मा फुलेव्यायामआंबेडकर जयंतीमाळशिरस विधानसभा मतदारसंघकाळभैरवजे.आर.डी. टाटासप्त चिरंजीवमुंजअभिव्यक्तीबाराखडी🡆 More