हान्स झिमर

हांस फ्लोरियन झिमर (जन्म १२ सप्टेंबर १९५७) हे जर्मन संगीतकार आहेत.

पारंपरिक वादन पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करून ते संगीत लिहितात. १९८० सालापासून झिमर ह्यांनी एकूण १५० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. द लायन किंग (ह्या चित्रपटासाठी त्यांना १९९५ साली सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतकाराचा ऑस्कर पुरस्कार मिळाला), क्रिमसन टाईड, ग्लॅडीयेटर, द पाईरेट्स ऑफ द कॅरीबियनची मालिका, द डार्क नाईट, इंसेप्शन, इंटरस्टेलार, डंकर्क, ब्लेड रनर २०४९ आणि ड्युन हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. त्यांना चार ग्रामी पुरस्कार, तीन क्लासिकल बीआरआयटी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत.दिग्दर्शक रिडली स्कॉट, रॉन हाउवर्ड, गोर वर्बीनस्की, माईकल बे, गाय रिची आणि क्रिस्टोफर नोलॅन ह्यांच्या बरोबर झिमर ह्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे.

हांस झिमर
हान्स झिमर
२०१८ मध्ये झिमर
जन्म नाव हांस फ्लोरियन झिमर
जन्म १२ सप्टेंबर १९५७
फ्रँकफर्ट, जर्मनी
कार्यक्षेत्र संगीत, वादन, पार्श्वसंगीतकार
पुरस्कार ऑस्कर पुरस्कार, ग्रामी पुरस्कार
संकेतस्थळ http://hanszimmer.com

सुरुवातीचे आयुष्य

झिमर ह्यांचा जन्म फ्रँकफर्ट, जर्मनी येथे झाला. त्यांनी लहान वयातंच पियानो शिकायला सुरुवात केली. पण काही दिवसांनंतर त्यांचे पियानो शिक्षण थांबले. स्वीत्झर्लंड देशातील कॅन्टन बर्न ह्या शहरातील ईकोल दी ह्युमनीटी ह्या आंतरराष्ट्रीय शाळेत त्यांना पाठवण्यात आले. त्यानंतर ते लंडनमधील हर्टवूड हाउस ह्या शाळेत शिक्षण घेतले. लहानपणीच ते एनियो मोरीकॉन ह्यांच्या संगीताने प्रभावीत झाले आणि वन्स अपॉन अ टाईम इन वेस्ट ह्या चित्रपटाच्या संगीताचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.

गौरव आणि पुरस्कार

डिसेंबर २०१० मध्ये हॉलीवूड वॉक ऑफ फेम मध्ये झिमर ह्यांना एक स्टार देण्यात आला.
२०१८ पर्यंत झिमर ह्यांना अकरा अकादमी पुरस्कारांची नामांकने मिळाली आहेत.
२०१९ मध्ये झिमर ह्यांचा डीझनी लेजेंड म्हणून गौरव करण्यात आला.
अकादमी पुरस्कार
१९९४: द लायन किंग (सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत)
गोल्डन ग्लोब
१९९५: द लायन किंग (सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत)
२००१: ग्लॅडीयेटर (लिसा जेरार्ड ह्यांच्याबरोबर)
ग्रामी पुरस्कार
१९९५: द लायन किंग (सर्वोत्कृष्ट सांगीतिक रचना)
१९९५: द लायन किंग (लहान मुलांसाठी सर्वोत्कृष्ट अल्बम)
१९९६: क्रिमसन टाईड
२००९: द डार्क नाईट (जेम्स न्यूटन हाउवर्ड ह्यांच्याबरोबर)

संदर्भ आणि नोंदी

Tags:

ऑस्कर पुरस्कारक्रिस्टोफर नोलनगोल्डन ग्लोब पुरस्कारग्रॅमी पुरस्कारग्लॅडियेटर (चित्रपट)द लायन किंग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाटकखरीप पिकेक्रिकेटचा इतिहासभारतीय राष्ट्रीय काँग्रेसग्राहकए.पी.जे. अब्दुल कलामशिवाजी महाराजांची राजमुद्राक्षय रोगबारामती लोकसभा मतदारसंघश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघभारतातील जागतिक वारसा स्थानेसोळा सोमवार व्रतप्रकाश आंबेडकरबोधिसत्ववर्धमान महावीरपृथ्वीचे वातावरणबासरीमहाराष्ट्रातील किल्लेसेंद्रिय शेतीशिवसंत तुकारामचंद्रपूर लोकसभा मतदारसंघलोकसभेचा अध्यक्षसूत्रसंचालनवासुदेव बळवंत फडकेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीराष्ट्रीय सेवा योजनाबृहन्मुंबई महानगरपालिकाआणीबाणी (भारत)कन्या रासजवकोंडाजी फर्जंदगोपाळ गणेश आगरकरहॉकीहनुमान चालीसाचिपको आंदोलनगूगल२०१९ लोकसभा निवडणुकामराठाभरड धान्यमीठसुजय विखे पाटीलरामप्रशासनशास्त्रकृष्णनिबंधमूळव्याधसम्राट अशोक जयंतीखो-खोमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीबच्चू कडूगोपीनाथ मुंडेसुभाषचंद्र बोससातारा लोकसभा मतदारसंघव्यवस्थापनसात बाराचा उतारादौलताबाद किल्लामहाराष्ट्र विधानसभाआंबेडकर कुटुंबमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)समाजशास्त्रभारतीय प्रजासत्ताक दिनकाळूबाईईमेलकासाररक्तगटगोंधळभारतातील जातिव्यवस्थाकालभैरवाष्टकनिलेश लंकेकार्ल मार्क्सउपभोग (अर्थशास्त्र)भारताचे पंतप्रधानक्लिओपात्रामहाराष्ट्र लोकसेवा आयोग🡆 More