व्हियेतनाम: आग्नेय आशियातील एक देश

व्हियेतनाम (लेखनभेद: व्हिएतनाम) हा आग्नेय आशियातील एक देश आहे.

व्हिएतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओस व कंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. २०२० नुसार, सुमारे ९.७८ कोटी लोकसंख्या असलेला व्हिएतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हिएतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: साईगोन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% (८.३१ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध आहे.

व्हिएतनाम
Cộng hòa Xã hội Chủ nghĩa Việt Nam
व्हिएतनामचे साम्यवादी प्रजासत्ताक
व्हिएतनामचा ध्वज व्हिएतनामचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Độc lập - Tự do - Hạnh phúc
"स्वातंत्र - आजादी - सुख"
राष्ट्रगीत:
"Tiến Quân Ca"
"लष्कराची कूच" (first verse)
व्हिएतनामचे स्थान
व्हिएतनामचे स्थान
व्हिएतनामचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी हनोई
सर्वात मोठे शहर हो चि मिन्ह सिटी
अधिकृत भाषा व्हिएतनामी
सरकार मार्क्सवादी-लेनिनवादी साम्यवादी एक-पक्षीय राष्ट्र
 - राष्ट्रप्रमुख ट्रुओंग टॅन सांग
 - पंतप्रधान न्विन टॅन डुंग
महत्त्वपूर्ण घटना
निर्मिती  
 - चीनपासून स्वातंत्र्य इ.स. ९३८ 
 - फ्रान्सपासून स्वातंत्र्य २ सप्टेंबर १९४५ 
 - एकत्रीकरण २ जुलै १९७६ 
 - संविधान १५ एप्रिल १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३१,२१० किमी (६५वा क्रमांक)
 - पाणी (%) ६.४
लोकसंख्या
 -एकूण ९,७७,९०,००० (१३वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता २६५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३२०.८७४ अब्ज अमेरिकन डॉलर (३६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,५४९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.५९३ (मध्यम) (१२८ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन डाँग
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + ७:००
आय.एस.ओ. ३१६६-१ VN
आंतरजाल प्रत्यय .vn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ८४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


व्हियेतनाम: इतिहास, धर्म आणि समाजव्यवस्था, अर्थतंत्र
फोंग न्हा-के बांग हे राष्ट्रीय उद्यान युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

इ.स. ९३८ साली साम्राज्यवादी चीनपासून व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळाले. १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी ह्या भूभागावर आक्रमण करून येथे फ्रेंच इंडोचीन ही वसाहत निर्माण केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या पहिले इंडोचीन युद्धामध्ये हो चि मिन्हच्या नेतृत्वाखाली व्हिएतनामी सैन्याने फ्रान्सचा पराभव केला. १९५४ साली व्हिएतनामचे उत्तर व दक्षिण असे दोन तुकडे करण्यात आले. मात्र एकत्रीकरणावरून पुन्हा झालेल्या व्हिएतनाम युद्धात उत्तरेची सरशी झाली व १९७६ साली व्हिएतनाम पुन्हा एकदा एकसंध बनला. पुढील एक दशक सोव्हिएत संघाच्या छत्रछायेत दारिद्र्य व एकाकीपणात काढल्यानंतर व्हिएतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने अनेक आर्थिक व राजकीय सुधारणा हाती घेतल्या.

इतिहास

    मुख्य लेख: व्हिएतनामचा इतिहास

या देशाची लोकसंख्या ९ कोटी आहे. सुरुवातीचा बराच काळ पारतंत्र्यात असलेला हा देश इस ९३८ मध्ये बाकडाँग नदीवरील युद्धात (Battle of Bạch Đằng River) चीनचा निर्णायक पराभव करून हा देश स्वतंत्र झाला. नंतर त्यावर अनेक व्हिएतनामी सम्राटांनी राज्य केले. आता या देशाच्या ताब्यात आहे त्यापेक्षा अधिक प्रदेश काबीज करून एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत राज्य केले. त्यानंतर युरोपियन सत्तांचा त्या भागांत शिरकाव होवून तो फ्रेंच वसाहतीत सामील झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या (इस १९४० च्या) जवळपास काही काळ तेथे जपानी साम्राज्यही पसरले होते. व्हिएतनामच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात १८५४ साली त्यांनी फ्रेंचांना उत्तर व्हिएतनाममधून बाहेर काढले आणि त्या देशाची उत्तर आणि दक्षिण व्हिएतनाम अशी फाळणी झाली. मात्र पुढेही हे युद्ध कमी अधिक प्रमाणात चालूच राहिले आणि प्रथम फ्रेंच व नंतर १९७५ मध्ये अमेरिकेला दक्षिणेतून काढता पाय घ्यायला लावून उत्तरेतल्या कम्युनिस्टांनी सर्व देश एकसंध केला.

१९७८ मध्ये शेजारी कंबोडियाने व्हिएतनामच्या काही भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. व्हिएतनामने चिनी पाठिंबा असलेल्या कंबोडियाच्या ख्मेर रूज या जुलुमी राजवटीवर हल्ला करून तिचा पाडाव केला आणि कंबोडियाच्या पूर्वीच्या राजाला सत्तेवर आणले. असे वरवर दिसत असले तरी व्हिएतनामला सोव्हिएत संघाचा पाठिंबा होता आणि ख्मेर रुजला चीनचा; त्यामुळे हे युद्ध सोव्हिएत संघ व चीनमधले छुपे युद्ध मानले जाते. व्हिएतनामवर दबाव टाकण्यासाठी चीनने व्हिएतनाम-चीन सरहद्दीवर युद्ध छेडले आणि व्हिएतनामचा काही भागही व्यापला. मात्र चिवट व्हिएतनामने तेथे प्रतिकार तर केलाच पण कंबोडियावरची आपली पकडही कमी केली नाही. यासाठी त्यांना सोव्हिएत संघाचा उघड पाठिंबा आणि सैन्य मदतही मिळाली. शेवटी चीनने आपले सैन्य व्हिएतनामच्या व्यापलेल्या भूमीतून मागे घेतले. मात्र व्हिएतनामी सैन्य कंबोडियात पूर्ण स्थिरस्थावर होईपर्यंत पुढची दोन वर्षे तेथेच तळ ठोकून होते.

भूगोल

दक्षिण चीन समुद्राला लागून असलेली आशियाच्या आग्नेय भूभागाची एक चिंचोळी पट्टी म्हणजे व्हिएतनाम आहे. ३३१,२१० चौ किमी भूभाग असलेल्या या देशाच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी ३,४४४ किमी आहे.

चतुःसीमा

राजकीय विभाग

व्हिएतनाम देश ५८ प्रांत व ५ केंद्रशासित शहरांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे

लोकसंख्येनुसार शहरांची यादी
शहर लोकसंख्या
हो चि मिन्ह सिटी
७३,९६,४४६
हनोई
६४,७२,२००
हाय फाँग
१९,०७,७०५
कान था
११,८७,०८९
दा नांग
८,८७,०६९

धर्म आणि समाजव्यवस्था

एका अहवालानुसार, महायान बौद्ध धर्म हा या देशाचा मुख्य धर्म असून देशाची ८५% (२०२० नुसार, सुमारे ८.३१ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्माची अनुयायी आहे. चीन व जपान नंतर व्हिएतनाम हा सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आज या देशात ७.५ कोटी बौद्ध आहेत. याखेरीज निधर्मी, हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन सुद्धा येथे अल्पप्रमाणात आढळतात.

अर्थतंत्र

१९८६ पर्यंत हा देश अत्यंत मागासलेला, अमेरिकेशी घेतलेल्या पंग्यामुळे जागतिक राजकारणात वाळीत पडलेला आणि कम्युनिस्ट राजसत्तेच्या लोहपकडीत बंद राहिला. मात्र १९८६ मध्ये तेथील राजवटीने उदार राजकीय आणि आर्थिक धोरण राबवायला सुरुवात केली. इस २००० पर्यंत त्या देशाचे जगातल्या बऱ्याच देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित झालेले होते आणि २०११ पर्यंत आर्थिक प्रगतीत जगातल्या पहिल्या ११ देशांत त्याचे नाव नोंदवले गेले होते. २०१३ च्या अंदाजांप्रमाणे तेथिल दर माणशी वार्षिक उत्पन्न २,००० अमेरिकन डॉलर होईल आणि खरेदी क्षमतेच्या दराने (परचेजिंग पॉवर पॅरिटी) ते ४,००० डॉलर होईल. इ.स. २००० सालापासून व्हिएतनाम जगातील सर्वात झपाट्याने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक आहे.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

व्हियेतनाम: इतिहास, धर्म आणि समाजव्यवस्था, अर्थतंत्र 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

व्हियेतनाम इतिहासव्हियेतनाम धर्म आणि समाजव्यवस्थाव्हियेतनाम अर्थतंत्रव्हियेतनाम संदर्भव्हियेतनाम हे सुद्धा पहाव्हियेतनाम बाह्य दुवेव्हियेतनामआग्नेय आशियाआशियाकंबोडियाचीनजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)दक्षिण चीन समुद्रदेशबौद्धबौद्ध धर्मलाओसहनोईहो चि मिन्ह सिटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पाणी व्यवस्थापनशिवम दुबेरणजित नाईक-निंबाळकरशिखर शिंगणापूरज्ञानेश्वरीसांगली लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)गोलमेज परिषदठाणे जिल्हाआंबासदा सर्वदा योग तुझा घडावामहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाबळेश्वरभारतीय अंतराळ संशोधन संस्थासिंहगडवर्णमालाकोरेगावची लढाईटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीपेशवेदिनेश कार्तिकचंद्रआनंदीबाई गोपाळराव जोशीबचत गटसात आसराछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपु.ल. देशपांडेहवामान बदलदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघकुपोषणरायगड (किल्ला)महाराष्ट्रामधील जिल्हेविशेषणसविता आंबेडकरअर्जुन वृक्षगूगलउन्हाळामहाराष्ट्र शासनसहकारी संस्थाकर्म (बौद्ध धर्म)कीर्तनसातव्या मुलीची सातवी मुलगीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभगतसिंगसूर्यमालाजगातील देशांची यादीप्रीमियर लीगभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळबुलढाणा लोकसभा मतदारसंघसंयुक्त महाराष्ट्र चळवळमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभारताच्या राष्ट्रपतींची यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४भारताचा ध्वजभारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासमासअरविंद केजरीवालएकनाथ शिंदेगडचिरोली जिल्हामराठीतील बोलीभाषाभारतरत्‍नबायो डीझेललोकसभानिसर्गनर्मदा बचाओ आंदोलनअभंगसोलापूरतानाजी मालुसरेआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५अथर्ववेदकिरवंतअहमदनगर लोकसभा मतदारसंघपुणे करारगोंधळविष्णुऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघसाडेतीन शुभ मुहूर्त🡆 More