टेक्सास

टेक्सास (इंग्लिश: Texas; टेक्सस स्पॅनिश: तेक्सास) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील क्षेत्रफळ व लोकसंख्या ह्या दोन्ही बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.

देशाच्या दक्षिण भागात मेक्सिकोच्या सीमेवरील हे राज्य एकेकाळी मेक्सिकोचा तेखास प्रांत तसेच अमेरिकन संघात विलिन होण्याआधी काही वर्षे स्वतंत्र राष्ट्र (टेक्सासचे प्रजासत्ताक) होते.

टेक्सास
Texas
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द लोन स्टार स्टेट (The Lone Star State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा अधिकृत भाषा नाही
इतर भाषा इम्ग्लिश, स्पॅनिश
रहिवासी टेक्सन
राजधानी ऑस्टिन
मोठे शहर ह्युस्टन
सर्वात मोठे महानगर डॅलस-फोर्ट वर्थ
क्षेत्रफळ  अमेरिकेत २वा क्रमांक
 - एकूण ६,९६,२४१ किमी² (२,६८,८२० मैल²)
 - % पाणी २.५
लोकसंख्या  अमेरिकेत २वा क्रमांक
 - एकूण (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ३०.८/किमी² (अमेरिकेत २,५१,४५,५६१वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २९ डिसेंबर १८४५ (२८वा क्रमांक)
गव्हर्नर रिक पेरी
संक्षेप TX Tex US-TX
संकेतस्थळ www.texasonline.com/

टेक्सासच्या पूर्वेला लुईझियाना, ईशान्येला आर्कान्सा, उत्तरेला ओक्लाहोमा व पश्चिमेला न्यू मेक्सिको ही राज्ये, दक्षिणेला मेक्सिकोची कोआविला, नुएव्हो लिओनतामौलिपास ही राज्ये तर आग्नेयेस मेक्सिकोचे आखात आहे. ऑस्टिन ही टेक्सासची राजधानी आहे तर ह्युस्टन, डॅलससॅन ॲंटोनियो ही प्रमुख शहरे आहेत.

सध्या टेक्सास हे अमेरिकेतील आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक व राजकीय क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचे राज्य आहे. अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या टेक्सासचा $१.२२८ सहस्त्रअब्ज इतका जीडीपी भारत देशाच्या जीडीपीसोबत तुलनात्मक आहे. कृषी, खनिज तेलविहीरी, संरक्षण, उर्जा हे टेक्सासमधील काही प्रमुख उद्योग आहेत. टेक्सासमधील व्यापार व उद्योगांसाठी पोषक वातावरण, कमी कर, स्वस्त व मोठ्या संख्येने उपलब्ध असणारा मजूरवर्ग इत्यादी कारणांमुळे अमेरिकेमधील इतर राज्यांमधून (विशेषतः उत्तर व ईशान्येकडील) अनेक उद्योग टेक्सासमध्ये स्थानांतरित झाले आहेत व होत आहेत. ह्यामुळे टेक्सासमधील लोकसंख्यावाढीचा दर अमेरिकेमध्ये सर्वाधिक आहे. २००० ते २०१० ह्या दहा वर्षांदरम्यान टेक्सासाची लोकसंख्या २० टक्क्यांनी वाढली.

भौगोलिक दृष्ट्या मेक्सिकोला लागून असल्यामुळे मेक्सिकन व स्पॅनिश संस्कृतीचा टेक्सासवर पगडा आहे. येथील २७ टक्के रहिवासी स्पॅनिश भाषिक आहेत.

जनसंख्या

टेक्सासची लोकसंख्या अमेरिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे (कॅलिफोर्निया खालोखाल). येथील २/३ लोक महानगर क्षेत्रांमध्ये राहतात.

मोठी शहरे

मोठी महानगरे

  • डॅलस-आर्लिंग्टन-फोर्टवर्थ: ६३,७१,७७३
  • ह्युस्टन-शुगरलॅंड-बेटाउन: ५९,४६,८००
  • सॅन ॲंटोनियो महानगरः २१,४२,५०८
  • ऑस्टिन-राउंड रॉकः १७,१६,२८९


गॅलरी

बाह्य दुवे

टेक्सास 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

टेक्सास जनसंख्याटेक्सास गॅलरीटेक्सास बाह्य दुवेटेक्सासEn-us-Texas.oggअमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषाटेक्सासचे प्रजासत्ताकमेक्सिकोस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हिंदू लग्नआयतभारताच्या पंतप्रधानांची यादीशिवाजी महाराजरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबलुतेदारपोलीस पाटीलकार्ल मार्क्सवर्धमान महावीरनवनीत राणाआमदारन्यूझ१८ लोकमतवर्तुळमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीगर्भाशयसूत्रसंचालनधर्मनिरपेक्षतासमाज माध्यमेशुभं करोतिमहाराष्ट्राचा इतिहासइतिहाससुषमा अंधारेपुराभिलेखागारप्रसूतीरावणपुणे करारगांडूळ खतभारतीय प्रशासकीय सेवाकुळीथराज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीराष्ट्रीय कृषी बाजारमानवी विकास निर्देशांकवि.वा. शिरवाडकरबुलढाणा जिल्हाएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)विंचूयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघनिलेश लंकेरशियामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगअर्थसंकल्पसोयाबीनभारतीय संविधानाचे कलम ३७०लातूर लोकसभा मतदारसंघविराट कोहलीधनु रासबिबट्यावसुंधरा दिनजन गण मननामदेवजळगाव जिल्हाभारत सरकार कायदा १९३५कापूसएकनाथलोणार सरोवरदुसरे महायुद्धनीती आयोगउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघतुळजाभवानी मंदिरक्रियापदरामायणअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यातापमानप्रेरणा३३ कोटी देवभारतीय आडनावेमलेरियाअमरावती लोकसभा मतदारसंघ२०१४ लोकसभा निवडणुकालालन सारंगजे.आर.डी. टाटाताराबाईरवींद्रनाथ टागोरपी.एच. मूल्ययूट्यूबभाषा🡆 More