सोल

सोल (कोरियन: 서울) ही पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

१ कोटीहून अधिक शहरी व सुमारे २.५ कोटी महानगरी लोकसंख्या असलेले सोल हे ओईसीडी सदस्य देशांमधील सर्वाधिक तर जगातील १२व्या क्रमांकाच्या लोकसंख्येचे शहर आहे. तसेच सोल महानगर तोक्योखालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महानगर आहे.

सोल
서울
दक्षिण कोरिया देशाची राजधानी
सोल
सोलचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 37°34′08″N 126°58′36″E / 37.56889°N 126.97667°E / 37.56889; 126.97667

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
स्थापना वर्ष १० जून १५७४
क्षेत्रफळ ६०५.२ चौ. किमी (२३३.७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५२ फूट (१६ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,०५,२८,७७४
  - घनता १७,२८८ /चौ. किमी (४४,७८० /चौ. मैल)
  - महानगर २,५६,२०,०००
प्रमाणवेळ यूटीसी +
seoul.go.kr

कोरियन द्वीपकल्पाच्या मध्य-पश्चिम भागात हान नदीकाठी वसलेल्या सोलला २००० पेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आहे. चोसून तसेच कोरियन साम्राज्याच्या काळात सोल हे कोरियाचे राजधानीचे शहर होते. कोरियन युद्धामध्ये बेचिराख झालेल्या सोलने १९६० ते २००० ह्या ४० वर्षांच्या काळात लक्षणीय प्रगती केली. सध्या ७७३.९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी उलाढाल असलेले सोल हे तोक्यो, न्यू यॉर्क शहर व लॉस एंजेल्सखालोखाल जगातील चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे शहर आहे. तंत्रज्ञानामध्ये जगात आघाडीवर असणाऱ्या सोलमध्ये सॅमसंग, एलजी, ह्युंडाई इत्यादी महा-कंपन्यांची मुख्यालये आहेत.

सोलमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट पायाभुत सुविधा असून येथील वाहतूक व्यवस्था अव्वल दर्जाची आहे. सोल महानगरी सबवे ही जगातील सर्वाधिक लांबीची शहरी भुयारी रेल्वे आहे व येथील इंचॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ जगात सर्वोत्तम मानला जातो.

सोल हे १९८६ आशियाई स्पर्धा, १९८८ उन्हाळी ऑलिंपिक तसेच २००२ फिफा विश्वचषक स्पर्धांचे यजमान शहर होते. सोल महानगरामध्ये युनेस्कोची ४ जागतिक वारसा स्थाने आहेत

इतिहास

सोल मधल्या ५ राजवाड्यापैकी ग्येओंगबुक्गुंग हा मुख्य राजवाडा आहे.

सोल 
Gyeongbokgung Palace main gate

बाह्य दुवे

सोल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आर्थिक सहयोग व विकास संघटनाकोरियन भाषातोक्योदक्षिण कोरियापूर्व आशियामहानगरराजधानीशहर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघप्रदूषणमहाराष्ट्र शासनवि.स. खांडेकररमाबाई आंबेडकरमाळशिरस विधानसभा मतदारसंघवाल्मिकी ऋषीपंढरपूरसुशीलकुमार शिंदेसापचैत्रगौरीगुढीपाडवामाण विधानसभा मतदारसंघसमाजशास्त्रफकिराचवदार तळेमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमाद्रीकेंद्रीय लोकसेवा आयोगइतिहासपहिले महायुद्धदिशाउष्माघातउद्योजकछगन भुजबळविंचूमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीमूकनायकचिमणीमण्यारलोकसभा सदस्यबुद्धिमत्तामानसशास्त्रगोत्रचेतापेशीसम्राट अशोक जयंतीचैत्र पौर्णिमाअण्णा भाऊ साठेरत्‍नागिरी जिल्हासोनारअर्थशास्त्रक्रिकेटचा इतिहासतुळजाभवानी मंदिरसंयुक्त महाराष्ट्र समितीपु.ल. देशपांडेसईबाई भोसलेगजानन महाराजमतदानसम्राट हर्षवर्धनसनातन धर्मकुळीथभारतातील सण व उत्सवमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारताचे राष्ट्रपतीसरपंचआलेप्रेरणाभीमा नदीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघभारताचा इतिहासयेसूबाई भोसलेमृत्युंजय (कादंबरी)चाफेकर बंधूवेदखडकवासला विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघउन्हाळारामदास स्वामींनी रचलेल्या आरत्याराम सातपुतेमूलद्रव्यलोकमान्य टिळकमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीअहमदनगर लोकसभा मतदारसंघराजकीय पक्षमाळीउंबर🡆 More